दिपमाला अहिरे

Inspirational

4.0  

दिपमाला अहिरे

Inspirational

मातृभाषेचे महत्व.

मातृभाषेचे महत्व.

2 mins
174


" अगं मीना माझा चष्मा इथेच होता कुठे दिसत नाहीये,

आणि आजचा पेपर कुठेय केव्हा पासून शोधतेय मी "

सासुबाई मीनाला आवाज देत होत्या.. मीना किचनमध्ये चहा बनवत होती." आई तिथे ड्रावर मध्ये चष्मा आहे.आणि पेपर तिथे टिपॉय वरच असेल बघा."

 मीना हातात चहाचा ट्रे घेऊन आली."आई चहा घ्या.पेपर मिळाला का?"

"मीना काय गं हे सगळे इंग्रजी पेपर आहेत.. मराठी वर्तमानपत्र एकही नाही.. अगं तुम्ही मुलांना काळाची गरज म्हणून इंग्लिश मिडीयम मध्ये शिकायला टाकले ते ठिक आहे पण, घरात, बाहेर प्रत्येक ठिकाणी इंग्रजी बोलली पाहिजे असं काही आहे का? अगं तु,मी, आपण मराठी शाळेत शिकलो पण तरीही इंग्रजी चांगल्याप्रकारे बोलु शकतो ना? तसंच मुलांना आपली मायबोली स्पष्ट आणि शुद्ध बोलता यायला नको का?

मुलांना मराठी भाषा शिकवणं ही आपलीच जबाबदारी आहे नाही का? मराठी आपली मातृभाषा आहे.ति बोलण्यात कसली आली लाज? याच कारणामुळे आदीला परीक्षेत मराठी विषयातच कमी मार्क पडतात..कारण वाचन कमी पडते.. मुलांना

 मराठी वर्तमानपत्रे वाचायला दिली पाहिजे, मराठी पुस्तके दिली पाहिजे.. मराठी भाषेला जपणं,टिकवणं, संवर्धन करणं ही आपलीच जबाबदारी आहे.त्याशिवाय पुढच्या पिढीला मराठी चे महत्व कसे समजणार?? मीनाच्या सासुबाई शिक्षीका होत्या.त्यापण मराठी विषयाच्या आई आणि आजीचे संभाषण आदित्य केव्हा पासून ऐकत होता.. तो आता आजीशी बोलत होता.

"आजी एक महिन्यात माझे पेपर सुरू होताय.मराठी विषयात मला नेहमीच कमी मार्क मिळतात..पण आता तु आली आहेस ना? यावेळी तुच माझा मराठीचा आभ्यास करुन घे." आजी म्हणाली

"नक्कीच आदी बेटा.पण फक्त चांगले मार्क्स पाडण्यापुरता मराठीचा आभ्यास करावा.हा विचार डोक्यातुन काढून टाक.. मराठी ही आपली मायबोली आहे.मातृभाषा आहे.आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे.."

आदीला ही आता मराठी चे महत्व पटले होते.

दुसऱ्या दिवसापासून घरात मराठी वर्तमानपत्रे ही येऊ लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational