S Ingle

Horror Crime

4.0  

S Ingle

Horror Crime

काळ्या मातीचा पाऊस

काळ्या मातीचा पाऊस

2 mins
255


      माती जशी जीवनज्योत तशीच मृत्यू-चिन्ह. काळी माती जणू भय, डोळे उघडे असतानाही गर्द अंधार. समोर थोडं दुर चंद्राच्या प्रकाशात दिसणारं एक मोठ झाड आणि त्या झाडाला बांधलेला फासाचा दोर एका वेदनादायी मृत्यूची आठवण करून देत होता. 

डोळ्यासमोर अधुन मधुन त्या झाडाला प्रेत लटकतानाचे दृष्य आणि त्या जिव हेलावून टाकणाऱ्या आरोळ्या मनात भितीचा थरकाप उडवत होते. चेहर्‍यावर पावसाच्या सरी प्रमाने गळणारा घाम त्याच्या स्पर्शाने मृत्यूची अनुभुती देत होता. 

त्या गर्द काळ्या मातीत पाय रोवून उभा असलेल्या युवकाने ने खाली जमिनीवर नजर टाकली. खाली गड्ड्यात रक्तबंबाळ होवून पडलेले आणि घामाने पुर्ण भिजलेले सदानंदराव आपल्या थरथरत हाताने त्या युवकाकडे इशारा करत म्हणाले,

“शाम्या, तू पण मरशील.........तू पण.”

चेहऱ्यावर लाल अग्नी प्रमाणे भडकणारा क्रोध शाम च्या डोळ्यात शिरलेला होता. तिरपी मान करत सदानंदरावांकडे डोळ्यांची पापणी ही न हलवता एकटक बघणारा शाम बोलु लागला, 

“तुमची भिती खुप आहे प्रत्येकाच्या मनात. तुम्हाला समजणे कठीण होईल पण सांगु इच्छितो, मला मारणारे तुमच्याच भितीने गाव सोडून पळाले आहेत.” 

हे ऐकुन सदानंदराव आश्चर्याच्या नजरेने डोळे लहान करत शाम कडे बघु लागले. 

“तुम्हाला ही माती हवी होती आणि कदाचित हिच तुमची शेवटची इच्छा असेल जिला मी नक्कीच पुर्ण करेल.” 

सदानंदरावांच्या बुद्धीला काहीच सुचत नव्हते, आयुष्याचा प्रवास आणि भविष्याचा ठिकाणा त्यांच्या बुद्धी सोबत खेळत होता. 

“माझ्यावर विश्वास ठेवा. मला वाटते तुम्ही पण घ्यावा अनुभव, अनुभव एका सत्याचा.” 

सदानंदरावांचा विद्युत गतीने वाढणारा श्वास त्यांच्या शरीराच्या हालचाली वरुन स्पष्ट पणे दिसत होता. 

“बुद्धी खरचं खूप चतुर असते म्हणून मृत्यू दिसताच जिवापेक्षा आधिच साथ सोडते.” 

आणि हे एवढे ऐकून त्याक्षणी, त्या दिवशी सदानंदरावांच्या भयभीत आणि निःशब्द झालेल्या डोळ्यांनी काळ्या मातीचा पाऊस पडताना बघितला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror