S Ingle

Others

2  

S Ingle

Others

प्रवास विचारांचा

प्रवास विचारांचा

1 min
48


(त्या दिवशी तो त्याच्या तुटलेल्या मनात खूप विचार करत होता...) जीवनाचे नाणे नशीब आणि संपत्ती या दोन बाजूंशिवाय व्यर्थ आहे. एक दिवस प्रयत्न करून यश नक्की मिळेल, पण तोपर्यंत प्रयत्न करून ही ही वेळ थांबवता येणार नाही.


प्रकाशाचा शोध घेऊन थकल्यावर अंधाराशिवाय दुसरा विसावा नाही. प्रकाशाच्या उष्णतेत जळण्यापेक्षा अंधार जास्त सुरक्षित वाटतो.


अंताशिवाय परिपूर्णतेची भावना नाही. उपहासाच्या हास्यात, शुद्ध पाण्यासारखा मनाचा आवाज नेहमी दडपला जातो. (त्याच्या विचारांच्या चक्रात तो वेडा झाला होता, पण त्याच क्षणी त्याचा आत्मा त्याला सांगू लागला…)


कधी कधी मरुन जगण्यापेक्षा जगुन मेलेले बरे. जगण्याची हौस नाही, पण भगवंताने दिलेल्या जीवनाच्या वरदानाचाही अपमान होता कामा नये.


परिस्थितीच्या पाण्यात उपहासाचे विष प्यायचे की त्यात स्वतःचा आवाज उठवायचा हा आपला निर्णय आहे, पण पाण्याचा प्रवाह थांबवून उपयोग नाही. वाहते पाणीच नेहमी शुद्ध असते.


प्रकाशाचा शोध घेण्यापेक्षा स्वतःच प्रकाश बनायचे किंवा स्वतःमध्ये प्रकाश निर्माण करणारी अग्नी प्रज्वलित करायची हा आपला निर्णय आहे, परंतु आपण अंधारालाही विसरता कामा नये.


वेळ थांबत नाही, कितीही वेळ लागला तरी तो बदलतोच. मन आणि सन्यासा समोर संपत्ती आणि नशिबाची किंमत नसते. नाणे म्हणून विकल्या जाण्यापेक्षा किंवा सजावट म्हणून ठेवल्या गेल्या पेक्षा दगड बनणे चांगले निदान ते मूर्ती घडवण्यासाठी तरी उपयुक्त ठरते.


(म्हणून तो मनाच्या विचारांमध्ये फाशी घेण्याऐवजी आत्म्याच्या विचारांना दोरी बनवून तुटलेले मन जोडू लागला...) शेवटी आत्महत्येला नकार द्यायला हवा.


Rate this content
Log in