STORYMIRROR

Sourabh Bhasme

Inspirational Others

2  

Sourabh Bhasme

Inspirational Others

मार्चींग : एक आठवण _ भाग -२

मार्चींग : एक आठवण _ भाग -२

9 mins
163

आता २६ जानेवारी तर झाली होती आणि आता पुढे काय असा प्रश्न होता कारण , या अश्या स्पर्धेत सहभाग घेऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असं आमच्या घरच्यांना वाटत होतं आणि आम्ही म्हणत होतो की , एकदा का प्रथम क्रमांक आला की यांना पटेल की आम्ही टाइम वेस्ट नाही केला . पण , सर्व फासे उलटे पडले होते आणि आता आम्हाला वाटलं होत तसं काहीच घडलं नव्हत...


वार्षिक परीक्षा निकाल आणि नवीन सुरूवात


हळू हळू वार्षिक परीक्षा जवळ येऊ लागली होती आणि मग मी हे सर्व विसरून पुन्हा अभ्यासाला लागलो . परीक्षा पार पडली निकाल देखील आला परूंतू तिथेही अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क्स मिळाले होते . किंबहुना मला पुढच्या वर्गात ढकलण्यात आले होते आणि अश्या प्रकारे सहावी आणि मारचिंग दोन्ही मध्ये अपयश घेवून मी सातवी मध्ये प्रवेश केला.


सातवी आणि मारचिग ची पुढची वाटचाल ...


अशा प्रकारे सातवी मध्ये आलो आणि पाहता पाहता पुन्हा एकदा नोव्हेंबर आला . साधारणत या महिन्यात शेवटी शेवटी आमच्यातला ट्रुप तयार व्हायचा परुंतु , त्या वर्षी मात्र असे झाले नव्हते . तेव्हा पुन्हा एकदा मागील वर्षात आलेल्या अपयशाची आठवण झाली आणि मन भरून आल. वाटल की बहुदा यावेळी आम्हाला त्यात घेणार नाहीत आम्ही सर्व मित्र यावर बोललो देखील परूंतु तेव्हा त्या गोष्टीचं गांभीर्य ते काय असणार...😀 आणि मग यायचं डिसेंबर उजाडला खरतर आतापर्यंत आमचे ट्रुप बनून सराव सुरू व्हायला हवा होता पण असा काहीच घडत नव्हतं आणि आम्ही थोडेसेच अस्वस्थ होत होतो ...

पुढे अचानक डिसेंबर च्या मध्यात अमाचे पावले सर आले आणि आमचा अख्खा वर्ग पुन्हा एकदा मैदानात नेला गेला आणि अचानक कदम ताल चालू केले झालं . आम्हाला काही समजायला मार्ग नव्हता असेच पुढचे चार पाच दिवस गेले .. तोच लीडर तीच टीम आणि कदम ताल असं सगळ चालू होते . आणि त्या चार पाच दिवसांनंतर पुन्हा एकदा एक ट्रुप तयार झाला त्याचा लीडर ही तोच होता जो मागच्या वेळी होता आणि अश्या प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला पुन्हा एकदा . पुन्हा एकदा तोच जोश, तीच आशा आणि तीच उमेद घेवून . पण नशिबात काहीतरी वेगळं च होते . अचानक दुसऱ्या दिवशी सर आले आणि असं समजल की आमचा लीडर ला सरांनी बाजूला सारलं होतं आणि आता वेळ होती ती एक नवीन लीडर नेमायची . 3-4 लीडर पुढच्या दोनच दिवसात बदलून गेले आणि अचानक एक संधी समोरून येवून दार ठोठावते तशी संधी मला मिळाली . पावले सरांनी मला लीडर होण्याची संधी दिली आणि सुरुवातीला मला काहीच समजलं नाही की काय होतंय. परुतू , या माझ्या अचानक लीडर होण्याने पुढे खूप काही बदलणार होते याची सुतराम कल्पना आम्हाला कोणालाही त्या क्षणी नव्हती . सर्व माझे सहकारी मित्र खूप खूष झाले ... परंतु माझ्यासाठी तो काळ खूप अवघड आणि कसोटीचा होता. मनात त्यावेळी आपसूकच एक वादळ उठलं की खरच मी कॅपाबेल आहे ? ही जबाबदारी पेलू शकतो ? पण लहानच वय जास्ती काळ विचारणपुढे काय तग धरणार मी उठलो तसा ताडकन सराना जाऊन बोललो की सर मला नाही वाटत मी हे करू शकतो मला तुम्ही लीडर नका करू .... आणि तसाच जोरात एक फटका पाठीत बसला... आणि मी गुमान जाऊन उभा राहिलो पुन्हा पोझिशन घेवून ....आणि एक अनामिक भीती देखील होतीच सोबतीला...


लीडर आणि पुढचा प्रवास...


लीडर बनल्यावर खांद्यावर खूप जबाबदारी येते आपली स्वतःची आणि पूर्ण ट्रुप ची देखील . पण तेव्हा हे काही समजत नव्हतं तेव्हा भीती होती की नंबर आला नाही तर काय ? 😂😂 त्या वयात अजून अपेक्षा तरी काय करणार दुसरी किंबहुना आमच्या सर्वांची अवस्था अशीच होती ... आणि मग यासोबतच आम्ही रोज २ तास संध्याकाळी सराव सुरू केला ... तुम्ही बोलाल की आता त्यात काय नुसता चालायचं तर असत यात एवढा मोठं काय सराव करण्याजोगा ... पण , नजरेपासून ते पायापर्यंत अगदी बारीक सारीक गोष्टी देखील यात चुकवून चालत नाही . खरतर या मार्चीग ने आम्हाला त्या वेळी कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही त्यासाठी मेहनत करावीच लागते हे शिकवलं म्हणायला हरकत नाही .

आमचा ट्रुप तसा हा नवीन नव्हताच मागच्या वर्षीचा एक अनुभव गाठीला होताच आणि पुढे पुढे थोडे बदल देखील करण्यात आलेले पण सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट माझ्यालेखी ही होती की , आम्ही सगळे मित्र एकत्र येऊन तो ट्रुप बनलेला होता. आणि तीच एक लीडर म्हणून माझ्यासाठी खूप मोठी ताकद होती.


अशा प्रकारे ट्रुप तयार झाला आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला ... पुढचं भविष्य कोणालाच सांगता येत नाही आणि माहितीही नसतंच आणि त्या वयात ते आम्हालाही माहिती होणं शक्य नव्हतं. आमची प्रॅक्टिस चालूच होती आणि पुढच्या २६ जानेवारी पर्यंत चालूच राहणार होती . जसं जसं हा दिवस जवळ येत होता तसे तसे मनातील विचार , भावना , भीती सगळं काही खूप आवेगाने वाढत होतं . मनात एकच वेळी खूप विचार देखील यायचे आणि हरलो तर काय याने खूप भीती ही वाटायची . पण जस मागे बोललो की , प्रत्येकाला आपल्या शाळेचा , मातृभूमी , आणि जन्मस्थान याचा एक अभिमान असतो च आणि तो तसा आमच्यात ही ठासून भरलेला होता .. काहीही झालं तरी आपण यावेळी विजय मिळवून द्यायचा हे जणू आम्ही चंगच बांधला होता. प्रवास हा एक महिन्याचा जरी असला तरी तो खूप खडतर होता एकीकडे घरचे ओरडायचे की नसते धंदे कशाला गपचुप अभ्यास करा आणि दुसरीकडे जरा जरी चुकल तरी मार सहन करावा लागायचा. अशा प्रकारे हे सर्व अडथळे जरी आता अडथळे वाटत नसतील तेव्हा खूप मोठे वाटायचे आणि ते पार करत शेवटी पुन्हा एकदा २६ जानेवारी हा दिवस उगवला . तो दिवस आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा दिसतो खरतर तो दिवस अतिशय अविस्मरणीय असा दिवस होता ..


वॉर झोन वन्स अगेन


सकाळ सकाळी डोक्यावर भगवा फेटा , पायात पांढरे शुभ्र बूट , स्वच्छ आणि इस्त्री केलेला गणवेश, कमरेला बेल्ट ( शाळेने दिलेला नावाचा) आणि मी लीडर म्हणून खांद्यावरून तो एक बेल्ट ज्यावर V.V.V.P असं लिहिलं होतं अर्थात आमच्या शाळेचा नाव ... आणि मग हा ठरलेला ड्रेस कोड आणि आमचा भला मोठ्ठा लवजमा पुन्हा एकदा मैदनात उतरला होता. माहिती नाही कसं , माहिती नाही का पण जेव्हा मी माझा ट्रुप घेवून जागेवर उभा राहिलो तेव्हा पुढची काही मिनटे तरी मी फक्त आणि फक्त त्या निळ्याशार आकाशात , मुक्तपणे , गर्वाने , आणि आभिमनाने फडकणारा ध्वज आणि सोबतच चालणार वंदे मातरम् ... हे गीत यामध्ये पूर्णपणे हरवून गेलो होतो ... आणि नंतर मग एक घोषणा झाली की राष्ट्र गीतासाठी आपले आपले ट्रुप जागेवर उभे करा . आता थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होणार होती. राष्ट्रगीत पूर्ण झाले होते आणि आता अजून थोडा अवकाश होता स्पर्धा सुरू व्हायला ... त्यावेळी आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे काही प्रतिस्पर्धी शाळांमध्ये उगाच एक सिव्हिल वॉर चालूच असायचं . आणि आम्ही ही त्याला अपवाद नव्हतोच.. 


आमचं आणि एका शाळेचं खूप वाकड असायचं मुद्धम येथे नाव घेणं टाळतो कारण ते फक्त आम्हा मुलांमध्ये च होतं प्रत्यक्षात दोन्ही शाळा या एक मेकांना खूप आदर सन्मान द्यायच्या. तर त्या दिवशी नेमका त्यांचा ट्रुप हा माझ्या पुढेच होता आणि मला स्पष्ट ऐकू आलेला की , तो लीडर असं बोलत होता की काही झालं तरी आपल्या प्रतिस्पर्धी संघाला विजय मिळवू द्यायचा नाही. मग आपला आला नाही तरी चालेल . एक प्रकारचं छोटंसं राजकारण च म्हणा ना ... मग त्यांच्यातले काही लोक मुद्दाम मला माझ्या उंचीवरून , आम्हाला आमच्या पेहरावावरून चिडवून बघू लागले . तेव्हा एक लीडर काय असतो , त्याचे कर्तव्य काय असतात यच्याशी माझा तीळ मात्रही संबंध नव्हता . पण का कोण जाणे मी मागे वळून पाहिले आमच्या ट्रुप मध्ये एक अस्वस्थता दिसली आणि मी ऑर्डर दिली ट्रुप नंबर २४ विश्राम... आणि मी त्यांच्या मध्ये जाऊन उभा राहिलो . मी त्यांना इतकचं बोललो की , मला तुमची साथ हवीय .. मला कोणाला हरवायच वगेरे नाहीये.. फक्त आपल्याला आपल्या शाळेसाठी आज आपल्यातलं बेस्ट व्हर्जन इथे लॉन्च करायचे आहे . आणि आपण मिळून ते करू . पण जेव्हा तुमच्या सोबत जीवाला जीव देणारे मित्र असतात तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नसते आणि तोच अनुभव मला तेव्हा आला. तसे मित्र होते आणि त्यांना मला कोणी काही बोललं की सहन नव्हत व्हायचं आणि त्यामुळे ते तेव्हा खूप चिडले होते पण शांत देखील होते .स्पर्धा सुरू झाली आणि एक एक

लीडर आपला ट्रुप घेवून मार्च करू लागला राष्ट्र ध्वजाला सलामी ( मानवंदना) देत पुढे जायचे होते . आणि मागे कॉमेन्ट्री चालू होती . माझा ट्रुप टर्न घेवून पुढे आला सलामीच्या वेळी खरी कसोटी होती आणि मी ऑर्डर दिली ट्रुप नंबर २४ दहिने.... देख आणि एक साथ सर्वांनी उजवीकडे पाहिले मी लीडर म्हणून सलामी देत होतो आणि मागून असं सांगत होते "सौरभ भस्मे हा विद्यार्थी या ट्रुपचे नेतृत्व करतो आहे अतिशय सुरेख असं संचलन करत आपल्या राष्ट्र ध्वजाला सलामी देत आगदी दिमाखात हा ट्रुप पुढे जातो आहे " आणि एकच टाळ्यांचा आवाज शिट्ट्या या सगळ्यात मी मात्र अगदी स्थिर नजर ठेवून चेहऱ्यावर कोणतेही भाव ना दिसू देता पुढे जात होतो अभिमानाने छाती ५६ इंच झालेली पण ते दाखवता नव्हतं येत आणि ती योग्य वेळ ही नाही वाटली मला ... काही करून प्रथम क्रमांक हवा होता. खूप साऱ्या भावना मनात एकाच वेळी येत होत्या आणि शेवटी पुन्हा एकदा आम्ही आमच्या जागेवर आलो आणि मग थांबलो .या सर्व १५-२० मिनटात खूप काही शिकायला मिळालं होतं. जसं मी माझा ट्रुप घेवून थांबलो माझा एक मित्र पळतच आला आणि बोलला की , अप्रतिम ... आणि पावले सर देखील आले जवळ पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले की शाब्बास रे माझ्या पोरांनो... पण आम्हाला आतुरता होती ती निकालाची ...


आता माझ्या त्या इतके वेळ शांत असलेला माझ्या साथीदारांचा संयम मात्र सुटला आणि मला आधी ज्यांनी चिडवल होतं त्यांचा खरपूस समाचार देखील यांनी माझ्या नकळतच घेतला होता . आता त्याचा प्रकार आणि तीव्रता इथे न संगतलेलीच बरी.


तर अशा पद्धतीने पुढे निकालाची वेळ आली आम्ही आमच्या जागेवर स्तब्ध होऊन उभे होतो वाट बघत होतो की कधी एकदा आमचं नाव जाहीर होतं . उत्तेजनार्थ झाला, तिसरा झाला , दुसरा झाला आणि आता एकच नंबर आणि बाकी होत्या तब्बल ३० शाळा ... कोण पटकावणार प्रथम क्रमांक याची उत्कंठा खूप वाढत होती आणि शेवटी उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच नाव जाहीर झाले. विवेक वर्धीनी विद्यालय , ट्रुप क्रमांक २४ ज्याचे नेतृत्व करत होता सौरभ सुभाष भस्मे.... हे ऐकताच एकच एक जल्लोष सुरू झाला आणि आम्ही पळतच समोर गेलो ... नियमाप्रमाणे तो आधी मला मिळणार होता आणि सोबत आमच्या शिक्षकांना आणि नंतर तो घेवून आम्ही टीम सेलिब्रेशन करू शकणार होतो .... त्याप्रमाणे मी समोर गेलो लीडर म्हणून सर्टिफिकेट ने भरेलेला तो envolop मी स्विकारला आणि मला त्या सगळ्यात काही interset नव्हता मला तो क्षण लवकरात लवकर माझ्या मित्रांसोबत शेअर करावायाचा होता आणि म्हणून मी पळतच पुन्हा एकदा माझ्या टीम जवळ आलो तो envolop त्यांच्या हातात सुपूर्द केला. सर्वजण खूप खुश झाले होते आम्ही शेवटी जे अशक्य वाटत होतं ते करून दाखवलं होतं. हा माझा लीडर म्हणून जेवढा विजय होता त्याहीपेक्षा आमच्या एकीचा आमच्या मैत्रीचा तो विजय होता आणि म्हणूनच तो खूप स्पेशल होता ... मला सर्वांनी उचलून घेतलं आणि एकच एक घोषणा चोहिकडे घुमू लागली ... येवून येवून येणार कोण .. विवेक वर्धीनी शिवाय आहेच कोण आमचा प्रतिस्पर्धी संघ हा तिसऱ्या स्थानी होता ...


आणि मग आम्ही सगळे त्यांच्या समोरून घोषणा देत हा विजय डोक्यावर मिरवत तिथून निघालो ... यांनी मला आजूनही खाली उतरू दिला नाही रेल्वे मैदान ते आमची शाळा असे अंतर माझ्या मित्रांनी मला खांद्यावर घेवून आणि घोषणा देत आणल ... आयुष्यातला पहिला विजय तोही इतका सुरेख झाला तो माझ्या या जीवाला जीव देणाऱ्या माझ्या मित्रांमुळेच हे मी कधीच नाकारू शकणार नाही आणि नकार नार ही नाही कारण ते होते म्हणूनच हे शक्य झालं होतं ...आणि म्हणूनच की त्या विजयाचं श्रेय हे नेहमीच त्यांनाच देतो ... दुसऱ्या दिवशी सकाळी पावले सरांनी मला पूर्ण शाळेत फिरवलं... आणि माझी एक नवीन ओळख करून दिली ... कॅप्टन सौरभ भस्मे... आणि ही विजयपताका इथेच थांबली असं नाही नंतर पुढे सलग २ वर्ष आम्ही माझ्या टीम ने सुदैवाने माझ्याच leadership मध्ये शाळेला नंबर मिळवून दिला आणि सौरभ भस्मे चा कॅप्टन सौरभ भस्मे झाला ... त्यात वरती काल ज्यांची नाव घेतली त्या सर्वांचा मोलाचा वाटा होता आणि आजूनही ती साथ तशीच कायम आहे ... आणि म्हणूनच मला कधी हार या शद्बाची अजिबात भीती वाटत नाही ... पुढे दहावी होती आणि अभ्यासाशी असलेला आमचं नातं पाहता आता यात पडण शक्य नव्हतं. म्हणून लीडर म्हणून चालू झालेला ३ वर्षाचा प्रवास १० वी मध्ये येवून संपला खरा . पण पुढे ११- बी. ए. एका वेगळ्या रूपात तो चालू झाला यावेळी लीडर म्हणून नाही तर पुढचे लीडर घडवायला म्हणून ... अश्या प्रकारे माझ्या मित्रांसोबत अभिमानाने मिरवलेल्या या क्षणांनी आयुष्यातला एक वेगळीच दिशा दिली.... मला साथ देणाऱ्या आणि कायम सोबत उभे राहणाऱ्या अशा ह्या माझ्या मित्रांसाठी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून हा लेखनप्रपंच.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational