STORYMIRROR

Sourabh Bhasme

Others

2  

Sourabh Bhasme

Others

सोशल मीडिया, माहिती,आणि आपण.

सोशल मीडिया, माहिती,आणि आपण.

3 mins
178

सुबोध आणि त्याचे कुटुंब नुकतेच कामानिमित्त शहराच्या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते. चांगल्या पगाराची नोकरी आणि मुलांना उपलब्ध असलेले सुयोग्य शिक्षण यामुळे सुबोध आणि त्याची सुविद्य पत्नी योगिता अगदी खुश होते. इतके दिवस एकटा सुबोध शहरांत राहत होता आणि त्याची पत्नी आणि मुलगा गावाकडं. गावाकडची माणसं, गावाकडच खुशाल आणि मोकळं वातावरण याची तशी सवय झालेली ही दोघे या सिमेंट च्या जंगलात पहिल्यांदाच आलेली त्यामुळं त्यांना खूप उत्साह आणि अप्रूप वाटणं साहजिकच होतं आणि तसं ते त्यांना वाटत ही होतं. अशा या वातावरणात अगदी आनंदात दिवस जात होते. परंतू, एक दिवस योगिताच्या असं लक्षात आलं की तिच्या आजूबाजूला राहणारी मंडळी खासकरून काही मोठी मंडळी बसून नेहमीच राजकीय, सामाजिक गोष्टींवर चर्चा करायची. योगिता देखील चांगलीच शिकलेली होती आणि मोकळ्या वेळेत ती अफाट वाचन देखील करायची. अगदी तिच्या घरापासून जवळच ह्या मंडळीचा घोळका बसून चर्चा करत असे आणि योगिताच्या कानावर देखील ह्या गोष्टी अधूनमधून पडत असत. ती त्याकडे कानाडोळा करे पण नेहमी काही वेळा त्याचा विचार देखील करे. बरीचशी माहिती तिला खटकत असे आणि तिला प्रश्न पडे की ह्या लोकांना ही माहिती जी चुकीची आहे ती मिळते तरी कुठून? याचे उत्तर तिला लवकरच मिळालं जेव्हा तिने काही लोकांनी दिलेलं संदर्भ कानावर पडले जसं की बहुतांशी संदर्भ हे शोसिअल मीडियावरचे होते आणि म्हणून तिने मनाशी निर्धार केला की आपण हे गैरसमज मोडीत काढले पाहिजे.त्यासाठी सुबोध चा मित्र सुयश जो शोसिअल मीडिया चे मानसिक रोगी नीट करण्यासाठी एक NGO चालवतो तो अगदी उत्तम होता.तिने एक दिवस सोसायटी मॅनेजर ची भेट घेऊन तिची ही इच्छा म्हणजेच सुयशचे एक सेमिनार घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि मॅनेजर ने देखील समाजभान दाखवत तात्काळ ती मान्य केली. सर्वांनाच या सेमिनार बद्दल उत्साह होता असं नाही बरेच जण नाराजीच्या सुरात बोलले देखील की, कशाला हवेत हे नसते उद्योग?परंतु, सेमिनार च्या दिवशी नेमकं काय बोलणार येणारी व्यक्ती हे पाहण्यासाठी तरी जाऊ म्हणून हे आले खरं... सुयश देखील वेळेत आला आणि शेवटी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आणि सेमिनार एकदाचा सुरु झाला. सुयश बोलू लागला तसं सर्वांनी लक्षपूर्वक ऐकू लागले... 


नमस्कार माझ्या मित्र - मैत्रिणी आणि सर्व ज्ञानी आणि वयस्कर मंडळीनो आज सकाळी सकाळी फेसबुक उघडताच समोर एक बातमी दिसली की   भारतमातेच्या लेकीने  कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णंपदक मिळवून दिले.  आता तुम्ही म्हणाल की बाबा मग यात वावगं ते काय? ते अगदीच मान्य आहे की यात काहीच वावगं नाही की अगदी तो पर्यंत नाही जोवर या भारत भूच्या लेकीने ऑलिम्पिक मध्ये सुवर्णंपदक मिळवून दिले असे सोसिअल मीडिया वर पसरल नाही... हो सोसिअल मीडिया वर अश्या चुकीच्या बातम्या पसरल्या आणि एकच एक गोंधळ उडाला.. खरं तर  सुवर्णंपदक मिळवून देणे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे त्यावर टीका वगैरे करण्यासाठी म्हणून मी आज इथे उभा नाही तर फक्त ह्यातून हेच दाखवू इच्छितो की सोशिअल मीडिया वर आपण टाकत असलेला अतिविश्वास कसा धोक्याचा ठरू शकतो याचे हे एक सौम्य उदहारण म्हणता येईल. आजकाल आपण जे दिसेल ते अगदी जे दिसेल ते त्याची खातरजमा न करून घेता शेअर करणे हा आपला धर्म मानतो आणि सरळ शेअर करत सुटतो. आता म्हणाल की यात काय झालं मग? तर त्याचे उत्तर असे की आपण जेव्हा असं कृत्य करतो तेव्हा कळत नकळत आपण ते आभासी जग, माहिती खरी मानायला लागतो आणि ही खोटी माहिती मग आपल्या मेंदूचा आपसूक ताबा घेते.. आणि मग आपले विचार आपण खरे मानायला लागतो.. भले ते चुकीचे असोत (यालाच अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे म्हणत असावेत! )आणि याचा परिणाम वैचारिक, सामाजिक, राजकीय पातळीवर होत असतो जे पूर्णतः आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकते..असो तर मुद्दा हा आहे की आपण सोशिअल  मीडिया च्या हातचे बाहुले बनत चाललो आहोत जे आपल्याला जाणवत नाही त्यामुळं 

सोशिअल  मीडिया चा वापर करताना आपण नेहमीच सतर्क असणे गरजेचं आहे आपण वाचलेली पाहलेली माहिती ही खरी आहे का? त्याचा स्रोत कोणता? माहिती जुनी आहे की नवी आहे? अश्या प्रकारे आपल्याला त्या असणाऱ्या माहितीची खातारजमा(थोडक्यात पोस्टमार्टम! )करणे गरजेचं आहे. आता कोणाला तरी वाटेल की याचा उपयोग काय? तर याचे अनेक फायदे आहेत त्यातले काही मोजके फायदे आपण इथे पाहू.. तसा लोकांमधून आवाज आला की कोणते  फायदे? तसा सुयश हसून म्हणाला सांगतो.. 


पहिला फायदा हा की तुम्ही माहिती तपासून पाठवत असाल तर एक वैचारिक दृष्टीने सक्षम असा समाज घडवण्यासाठी योगदान देत आहात.म्हणजेच तुम्ही "राष्ट्रीय कार्य"करत आहात. 


दुसरा फायदा असा की योग्य माहिती किंवा तिचे स्रोत जाणून घेण्यासाठी तुमच्या ठायी "शोधक वृत्ती" निर्माण करत आहात. तसंच तुम्ही स्रोत शोधत असताना अनेकविध पुस्तके, वृत्तपत्र किंवा जे काही उपलब्ध साधन असतील त्यातून जात आहात म्हणजेच तुमची वाचन क्षमता अफाट होण्यास याची मदत होईल. 


तिसरा फायदा असा की तुम्ही योग्य मार्गाने विचार करण्यास प्रवृत्त व्हाल जेणेकरून एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही इतरांना देखील प्रवृत्त कराल. म्हणजेच एक आदर्श समाज निर्माण कराल 


चौथा फायदा असा की तुम्ही एक आदर्श समाज तर घडवालंच परंतू, आज माझ्यासारखी तरुण मंडळी जी सोसिअल मीडिया वर भरकटली आहे तिला योग्य मार्गांवर आणाल तसंच सोशिअल मीडिया चा योग्य वापर देखील त्यामुळे शक्य आहे... 


सर्वजण अगदी आवडीने आता हे ऐकत होता अगदी कान देऊन आधी ज्यांना हे सगळं निरर्थक वाटत होतं ते सुद्धा.. आणि इतक्यात सुयश नी आपले बोलणे थांबवत बोलू लागला की, बघा जमलं तर विचार करा आणि हा विचार इतरांपर्यंत पोहचवा कारण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे ध्यानात असू द्यात..आता तुम्हीच ठरवा अर्ध्या हळकुंडात पिवळे व्ह्याचं की खरंच ज्ञानी व्ह्याचं.. निर्णय तुमचा आहे... 


शेवटी सर्वांनी एकत्र एका दमात ही प्रतिज्ञा केली आणि वचन दिलं आपण सर्व योग्य माहितीचे अदानप्रदान करूयात आणि एक सक्षम, समृद्ध आणि वैचारिक समाज घडवूयात..


Rate this content
Log in