लोकशाही .... म्हणजे काय रं ...??
लोकशाही .... म्हणजे काय रं ...??
सुयश आणि त्याचे मित्र बऱ्याच वर्षानंतर भेटणार होते हि भेट तशी अगदी साधीच असली तरी काही साधीसुधी नव्हती या सर्वांसाठी . त्याचे कारण हे सर्व शहरी भागात राहणारे सुशिक्षित तरुण , सुयश च्या गावी भेटणार होते तेही शेतात . त्या चांदण्या रात्रीत गप्पची मैफील रंगवयची आणि मस्त चुलीवर च्या वशाटावर ताव मारून रातभर गप्पा मारत अगदी शाळा ते कॉलेज पर्यंत चे किस्से सांगून मौज करायची असा सगळ नियोजन होतं. ठरल्याप्रमाणे , सर्व जण वेळेआधीच आले आणि गप्पाची मैफील देखील रंगू लागली . त्या सुन्न अश्या अंधारात यांच्या जवळच्या शेकोटीचा उजेड आणि यांच्या आवाजाने , हसण्याने , त्या काळोखातील भय नाहीस करून गेलेला होता .
या सर्व मौजेमध्ये मात्र अचानक स्तब्धता आली कारण, अंशुल ने अचानक आलेल्या आपल्या देशातील परिस्थितवर बोट ठेवले. आणि त्या भयाण काळोखातील शांतता प्रकर्षाने जाणवू लागली . तेवढ्यात , त्याच घोळक्यातून पुन्हा एक आवाज आला ... मालक रश्यात तिखट किती घालू ?? तो आवाज सुयश च्या सालगडी शामुमामा यांचा होता .. वयाने मोठे, स्वभावाने अगदी निर्मळ आणि शांत, अगदी प्रामाणिक असे हे व्यक्तिमत्व... पुनः त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन सर्व जण पुन्हा एकदा आपल्या स्तब्धतेतून बाहेर आले आणि सुयश चा आणखी एक जोडीदार जो खूप मोठया कंपनी मध्ये उच्चपध्दस्त आहे तो बोलू लागला .... तो म्हटला कि भारतात आता लोकशाही नावाला हि उरणार नाही ... लवकरच तीचं अस्तित्व धोक्यात येणार. हे ऐकून सुयश सकट सगळेच स्तब्ध झाले कारण असे झाले तर मग आपण जगणार कसं ? हा प्रश्न होताच .
काही जण तर चक्क लोकांच्या अडाणीपणाला नांव ठेवू लागले आणि बोलू लागले की आता बस्स !!! या अडाणी लोकांनीच अंधपणे, पैशासाठी केलेलं मतदान याला कारणीभूत आहे असे जाहीर करून मोकळे देखील झाले. एक आर्धा घटका गुजरला असेल, सर्वांचं लक्ष त्या चुलीवरच्या वशाटावर होतं आणि तोच पुनः एकदा शामुमामा चा आवाज आला आणि त्यानी एक प्रश्न केला ... हि लोकशाही.... म्हंजी काय रं बाबा ?? आणि सर्वजण पुन्हा एकदा सुन्न झाला .
ज्या लोकांना आपलं घर, पोट कसं भागवायची याची चिंता दिवसरात्र लागून असते अश्या लोकांना आपण इतके वेळ दोष देत होतो याचं कदाचित भान हरपलेल्या तरुणाईला भान आले असावे.... इतका वेळचा गोंगाट पुन्हा एकदा शांततेत बदलून गेला आणि सर्व जण मुकाट जेवू लागला . सर्वच्या मनात एकच एक विचार घोळत होता की आपण खरच कोणत्या दिशेने जातो आहोत ? लोकशाही ने दिलेले मूल्य आपण कितपत जपतो . ... सर्वाना सोबत घेऊन चला हे फक्त बोलण्यापूरतं मर्यादित राहिलं आहे का ? घरात मखमली सोफा त्याच्या समोर लावलेला तो टीव्ही पाहून एखादी घटना घडली कि आपण फक्त चू..चू...चू करणार आणि चॅनेल बदललं कि सर्व काही तिथेच सोडणार ... हीच का आपली संवेदनशीलता ?? काही झालं की आडण्याच्या आडणीपनावर बोट ठेवायचं आणि सर्व गोष्टींना त्याना कारणीभूत ठरवून नामानिराळे व्ह्याच ...?? असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत होते सर्वांना ....
इतक्यात तिथे नुकतीच सत्तरी ओलांडलेलं तरी सुरकतल्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे नाना मास्तर ... (त्या काळचे मास्तर म्हणून ही मिळालेंली उपाधी ..) तिथे आले तसं ते खूप वेळ झाले तिथंच बसून हे सर्व संभाषण ऐकत होते ... त्यांनी या सुटाबुटात वावरणाऱ्या , गार वाऱ्यात बसून लोकशाही आणि तिचे अस्तित्व यावर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या तरुणाईला जागं करण्याच चंगच बांधला होता जणू ... ते बोलू लागले ... अरे बाबांनो लोकशाही म्हणजे कोणतं खेळणं नाही की कोणी मनात आनलं आनं मोडून टाकल .. ते मिळवायचं म्हणून लई लोकांनी आपलं घरदार सोडलं , आपलं जीवन संपवलं , रगात वाहिलं तवा कुठं जाऊन हे स्वातंत्र्य मिळालं , लोकांचं राज्य आलं ... आणि आज ते जगात सर्वात मोठं झालं ... ते पुढं बोलत गेले सर्व जण अगदी भान हरपून ऐकत होते ... नाना मास्तर पुढे बोलु लागले .. लोकाशाही आता जरी संकटात असल तरी पण बाबांनो ती नष्ट कधीच हुनार नाही कारण त्याचा पाया हा त्याच्या मधली लोक हायती ... आज जरी लोकांमधी जातीय तेढ असल आणि अनेक समस्या असतील तरी एक दिस असा बी उजडल ... तेव्हड्यात एक प्रश्न आला की पण लोकशाही एवडी भक्कम आहे तर मग कुमकुवत का झाली ??
नाना मामांनी स्मित हास्य केलं आणि बोलू लागले की , अंधार झाला म्हणून काय उद्या सूर्य उगवायचा राहुतय का कधी ?? आन..हे बगा बाबानो आपल्या जवळ असलेल्या गोष्टीचं महत्व कितिबी अनमोल असू द्या, आपण ते विसरतो आणि म्हणून हे गरजेच हाय ... ह्याची जाणीव व्हायला पाहिजे जेव्हा आपल्याकडं ती गोष्ट नसल तर काय होईल ?? आणि म्हणून हे व्हतंया ...अन एक ना एक दिस तिबी जाणीव होईल ... फकस्त ती लवकरात लवकर व्हाया हवी ... सर्व जण अगदी हरखून गेला होता विचारच काळोख नाहीसा होऊ लागला तस्स बाहेरही उजाडू लागलं होतं ... अक्खी रात्र गुजरली होती आणि कोणाला त्याचा मागमूस हि नव्हता इतकं सर्वजण त्यात बुडाले होते ..
जो मित्र बोलत होता की आता लोकशाही संपली तो बोलू लागला की , खरच आपण आपलं आपलं करत इतक जगतो कि आपल्यातील आपलेपणा आपण कधी विसरून जातो हे कळतही नाही ... त्याला त्याच्या आधीच्या वक्तव्यावरून स्वतःचीच कीव येत होती .... नाना मास्तरांनी मात्र सर्वांच्या डोळयांत झणझणीत अंजन घातले होते .. आणि सर्व जण पुन्हा एकदा उभ्या असलेल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीचे जिचे अस्तित्व हे एकात्मतेच्या , शांततेच्या , सहिष्णुतेच्या , निरपेक्ष देशप्रेमाच्या आणि त्यात असणाऱ्या सर्व नागरिकां च्या मजबूत अश्या पायावर उभे असलेल्या देशाचे स्वप्न पुनः एकदा जगू लागला ......
