STORYMIRROR

Sourabh Bhasme

Others

2  

Sourabh Bhasme

Others

मार्चींग : एक आठवण (भाग १)

मार्चींग : एक आठवण (भाग १)

4 mins
178

मार्चींग खूप लोकांना हे काय आहे ते माहीत नसेल खरतर माहिती आहे परंतु यालाच मार्चींग म्हणतात ते माहिती नसते . तर हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून २६ जानेवारी ला जशी दिल्ली मध्ये परेड होते अगदी तशीच पंढरपूरला असताना व्हायची . तर अश्या या मार्चींग ची एक अनोखी स्पर्धा आमच्या इथे असायची आणि मग जो ट्रुप उत्तम परेड करेल त्याला साशनाकडून सर्टिफिकेट देखील दिलं जायचं.


हे सगळ मांडण्याचं कारण ?

तर हे सगळं सांगण्याचा प्रबंध काय असा प्रश्न पडला असेल. खरतर प्रबंध वगेरे काही नाही अगदी मनापासून वाटलं की याबद्दल ही काही लिहावं कारण ही एक स्पर्धा जरी असली तरी ह्या एका गोष्टीने माझं आयुष्य खूप बदलून टाकलं . ते कसं हे नंतरच सांगेन पण म्हणतात की कठीण प्रसंगी आपण आपला चांगला काळ आठवला तर तो खूप बळ देवून जातो ... सोबतच या मार्चींग ने जे काही मित्र मिळवून दिले किंबहुना या सर्व मित्रांनी मला या मार्चींग शी जोडलं ते म्हणजे अक्षय पवार , निखिल ढवण, धनंजय गायकवाड ,पुंडलिक रोपळकर , गणेश निंबाळकर , साजिद बागवान, फारुक पठाण, असिफ आतार , समाधान नवले, अजय हुलवडे , हरिभाऊ भोसले , दिग्विजय राजमाने, असे एक ना अनेक मित्र यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा एक छोटासा केविलवाणा प्रयत्न...


या सर्व खटाटोपास प्रारंभ...

तर या सगळ्याची सुरवात झाली ती म्हणजे , मी सहावी मधे असताना. तेव्हा मी एक ट्रूप मेंबर होतो . साधारणतः दोन महिने अगोदर पासून प्रॅक्टीस ला सुरुवात व्हायची ती २६ जानेवारी पर्यंत चालूच असायची आणि मग २६ जानेवारी हा एक प्रकारे परीक्षेचा दिवसच म्हणता येईल तसा असायचा . खूप जास्त प्रेशर , मनावर दडपण कारण समोर एक दोन नाही तर तीस एक शाळा आणि त्यातून विजयी व्हायचं. नाही झाला तर आपल्या शाळेचं नाव खराब होईल अशी उगाच एक भीती मनाला लागून असायची . एक खूप मोठी जबाबदारी आमच्या त्या छोट्याशा खांद्यांवर येवून पडलेली . आता तुम्ही म्हणाल की मग sportingly वगेरे घ्यायचं ना कशाला इतका तान पण त्या वयात हे सारं कळून येणं थोड कठीणच होतं. साहजिकच तो एक आपल्या आपल्या शाळेचा अभिमान आपल्याला वाटत असतो आणि तो तसा वाटायला ही हवा आणि तोच आम्हाला त्या क्षणी वाटत ही होता. आमच्या शाळेच्या प्रांगणात आमच्या सरांनी एक एक करून बेस्ट टीम निवडली होती आणि त्यात नशिबाने मीही होतो. सर्व प्रकारे उत्तम तयारी झाली देखील होती आणि आता आमच्या सर्वांची नजर होती ती प्रथम क्रमांकावर ... त्यापासून अता आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असच एक मत आमचं होतं त्याला आपण अती आत्मविश्वास म्हटले तरी काही हरकत नाही....


वॉर झोन...

पाहता पाहता २६ जानेवारी हा दिवस आला . भारत प्रजासत्ताक झाला तो हा दिवस आणि तो प्रत्येक भारतीय व्यक्ती साठी अत्यंत महत्वाचा असा दिवस. परंतु माझ्या किंबहुना आमच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण दिवस ठरणार होता. आम्ही सर्व जण सकाळ सकाळीच तयार होऊन शाळेच्या आवारात जमलेलो मनामधे एक उत्सुकता होती कारण ती माझ्यासाठी प्रथम वेळ होती जेव्हा मी अश्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी झालो असेल. पुढे काय होणार कोण प्रथम क्रमांक पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष होते. सर्वजण मैदानात उतरले आणि आपल्या ट्रूपला घेवून लीडरने सावधान स्थितीत एका हाताने अंतर घेवून उभे राहण्याची आर्डर दिली . तसे सर्वजण एका लयीत सावधान स्थितीत उभे राहिले आणि पायाचा एकच एक आवाज झाला . काही ऑर्डर्स देवून पुन्हा एकदा विश्राम स्थितीत येण्याचे ऑर्डर्स दिले गेले . देशभक्तीपर गीते , आपला तिरंगा या सगळ्याकडे पाहून मन अगदी हरखून गेले होते . स्पर्धा सुरू झाल्या त्यानुसार आपल्या जागेपासून मार्च करत आपल्या तिरंगा ध्वजला सलामी देत पुढे यायचं आणि मग पुन्हा मार्च करत लीडर आपला ट्रूप पुन्हा जागेवर उभा करेल हे दिसायला जरी सोपं वाटत असलं तरी प्रत्यकषात मात्र खूप अवघड होतं. लीडर सकट सर्वांना समन्वय राखत एक सारखे पाऊले टाकत स्टार्ट टू एंड हे सर्व पार पाडयचं होते कारण प्रत्येक बारीक बारीक गोष्ट जशी की बूट, बेल्ट, कपडे, केस , अंतर, पाऊले , या सर्व गोष्टींचं मूल्यमापन केले जायचे आणि मगच अंतिम नंबर घोषित केले जायचे ....


रिझल्ट आणि निराशा

मार्चींग तर झाले आता सर्व जण वाट पाहत होते ती रिझल्ट ची ... आमचे काही मित्र प्रेक्षक म्हणून बसले होते ते आले आणि आम्हाला असं सांगतील की आमचा परफॉर्मन्स खूप बेसुमार झाला. आमचा लीडर नेमका सलामीच्या वेळी खूप पुढे निघून गेला होता आणि ट्रूप मागेच होता आणि ते ऐकून मात्र सर्वांची निराशा झाली . दोन महिन्यांची मेहनत वाया च गेली होती म्हणता येईल. तेवढ्यात आमचे सर तिथे आले आणि तेही लीडर सकट सर्वांना खूप ओरडले आणि आश्या प्रकारे आमची बेस्ट टीम फक्त उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते ठरली ... निराश चेहऱ्याने आम्ही सर्वांनी ते पारितोषिक घेतले पुन्हा शाळेत आलो ... सर्व काही संपल्यात जमा होतं आणि पदरी होती ती निराशा आणि ती पाहून सरांनी धीर दिला की असो हे ही नसे थोडके आणि आम्ही सर्वांनी घर गाठले....

(क्रमशः)


Rate this content
Log in