STORYMIRROR

Kalyani Kurundkar

Abstract Others

4.0  

Kalyani Kurundkar

Abstract Others

माझ्या मनातली वटसावित्री पौर्णिमा

माझ्या मनातली वटसावित्री पौर्णिमा

2 mins
209


It is a content not a story --- but kindly consider it for competition, it's my own creation ...या आधुनिक युगात सगळेच नवरे सत्यवान नसतात आणि सगळ्याच बायका सावित्री सुद्धा नसतात. त्यामुळे हेच पतीदेव मला जन्मोजन्मी लाभो आणि दिर्घायुषी होवो अशी मंगलकामना मनामध्ये ठेऊन वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या बायकांचे मला कौतुक वाटते. खरंच किती भोळ्या असतात ह्या बायका. पारंपारिक किंवा सामाजिक बंधनांमुळे असे करावे लागते हे मी समजू शकते. सर्वांनाच बंधने झूगारुन, स्वतंत्र विचार करणेही जमत नाही. 

मी पण मागच्या वर्षापर्यंत ह्याच भोळ्या कल्पनेत जगत होते. पण ह्या वर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत दूरदर्शन वरील "उपनिषद गंगा" हि सिरीयल बघितली. सत्यवान तिच्या कुशीत वडाच्या झाडाखाली मृत्यू पावला. यमराज सत्यवानाचे प्राण नेण्यास आला असतांना सावित्रीने पतिव्रतेच्या व्रताचे महत्व यमराजांना सांगितले. यमराजांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देखील सावित्रीने चाणाक्षपणे दिली. आणि यमराजाने खूश होऊन तिला तिच्या सासऱ्याचे गेलेले राज्य, तिच्या वडिलांचा वंश पुढे चालावा म्हणून त्यांना एक पुत्र आणि तिच्या पतीचे प्राण परत वरदान म्हणून देऊन गेला. खरोखरच सावित्री मुळातच हुशार होती, त्याचसोबत तिच्या निश्चयामूळेच हे शक्य झाले. 

आताही सत्यवान कोणीही किंवा कसाही असो, सावित्रीच्या पातिव

्रत्यामुळे त्याचे आयुष्य सुरळीत चालू राहते. दरवर्षी स्त्रिया वटसावित्री पौर्णिमा साजरी करतात, करावीच. कारण ह्या व्रताच्या मागे दृढ निश्चय आहे सावित्रीचा. जो प्रत्येक युगातल्या सत्यवानाला संकटातून वाचवणारा आहे.आयुष्यात संकटांवर मात करण्याची शक्ती देणारा आहे.

हे व्रत करतांना वडाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालताना म्हणतो '' माझ्या पतीला सुरक्षित ठेव आणि हाच पती मला सात जन्म मिळू दे'' याऐवजी आपण असे म्हणावयास पाहिजे की "हे वडाच्या वृक्षा मला पण तुझ्याप्रमाणेच दृढ, खंबीर बनव. कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची शक्ती दे. तुझ्यासारखेच मला आणि माझ्या नवऱ्याला दिर्घायुषी बनव. तुझ्या पारंब्या, पाने, लाकूड सगळेच लोकांच्या कामात येते (औषधे, बांधकाम ई . साठी), तसेच माझे संपूर्ण आयुष्य इतरांचे भले करण्यासाठी कामात येऊ दे. तू जसा अफाट पसरतोस, तशीच माझी-माझ्या कुटुंबाची किर्तीसुद्धा पसरू दे. तुझ्या पारंब्यांचे जमिनीत जाऊन परत वृक्षात रूपांतर होते, आणि मूळ वटवृक्ष अजूनच मोठा दिसायला लागतो; तसेच मी माझ्या माहेरच्या आणि सासरच्या मूळ वटवृक्षाला मोठा मजबूत आणि अफाट करण्यास कारणीभूत होवो, हीच तुला प्रार्थना" असे म्हणत घातली पाहिजे असे मला वाटते. म्हणजेच ह्या विज्ञानयुगातसुद्धा नवीन पिढीला, वटपौर्णिमा, हि केवळ काल्पनिक गोष्टींवरून सुरु करण्यात आलेले व्रत नसून, एक मजबूत समाज घडवण्यासाठीचा पारंपरिक ठेवा आहे असे वाटेल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract