माझी ओळख...हाच माझा दागिना...४
माझी ओळख...हाच माझा दागिना...४


देशमुख मॅडम स्टेज वर जाऊन घोषणा करत होत्या....आता आपण आपल्या प्रमुख पाहुणे आले आहेत त्यांना बोलावूया.... आणि जोरात स्वागत करूया एक लेखिका, चित्रकार, गरजुंना अन्न पुरवठा करणारी.. अन्नपुर्णा सावी सागर गायकवाड यांचे.....ज्यांनी सकाळ पासून आपल्या प्रत्येक कार्यक्रमात खूप उत्साहाने भाग घेतला...कसला हि गर्व न बाळगता..... जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया.....
अंकीता बघत बसली....सुधा काकूंचा उर अभिमानाने भरून आला.....
बायकांची कुजबुज वाढते....सगळ्या एकमेंकीकडे बघत असतात.....
देशमुख मॅडम थोडक्यात सावीची ओळख करून देतात....तिच्या जखमेवर मीठ न चोळता खूप छान आणि कमी शब्दांमध्ये.... आणि दोन शब्द बोलण्या साठी सावीला माईक देतात.....
सावी सगळ्यात आधी देशमुख मॅडम चे आभार मानते....आणि म्हणते खरच मी एवढी मोठी व्यक्ती नाही की मला एवढा मोठा मान मिळावा, म्हणूनच मी लपवून ठेवायला सांगितले होते मॅडम ना कारण मला आजचा हा दिवस सगळ्यांसोबत एन्जॉय करायचा होता....आणि आधीच समजले असते तर माझी ओळख आज जशी झाली तशी झाली नसती...मी आता जे काही बोलणार आहे त्यातून मला कोणाला कमी लेखायचे नाही आहे, कोणाचे मन दुखावले गेले तर....म्हणून मी आधीच माफी मागते.... आणि माझे मनोगत व्यक्त करते...
मी सावी माझे लहानपण याच सोसायटी मध्ये गेले, तेव्हा हि सोसायटी एवढी मोठी नव्हती.....तरी बाकीच्या सोसायटी पेक्षा वेगळी आहे तेव्हा आणि आताही....तर काही जुनी माणसे आहेत त्यांनी मला ओळखले पण ओळख दिली नाही, आणि काही नवीन आहेत ज्यांना माझ्या हातात असलेली सायकल बघून माझ्याशी ओळख करून घ्यावी असे वाटले नाही...असो माझा मुद्दा हा नाही...
मला एवढंच म्हणायचं की आपण एखाद्या व्यक्तीला लगेच जज करून मोकळे होतो की ती अशीच अन ती तशीच....तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक स्त्री ही दुसऱ्या स्त्री ची शत्रु आहे...तेवढे दुसरे कॊणी नाही....ती कधीच दुसऱ्या बाईचे कौतुक करत नाही किंवा तिला प्रोत्साहन देत नाही....आणि हे जेव्हा बदलेल तेव्हा तो दिवस खरा महिला दिन असेल....
जोरात टाळ्या वाजतात....सुधा काकू कौतुकाने ऐकत असतात...
सावी पुढे बोलते, मी घरच्या लोकांच्या मना विरुद्ध लग्न केले आणि ह्या सोसायटी चा आणि माझा संबंध कमी झाला.... म्हणून काही जणी मला हसत होत्या तर काहि एवढी जुनी सायकल आणली म्हणून....पण ही तीच सायकल आहे जिच्या मुळे आज आमचा संसार उभा आहे...म्हणूनच ती आम्हाला सोन्या पेक्षा अनमोल आहे.....एवढेच बोलेन मी बाकी माझे कर्तॄत्व मी सांगणार नाही मला तें आवडत नाही...
आज मी जे काही आहे तें माझा नवरा आणि माझ्या सासूबाईंमुळे. गेल्या महिन्यात त्या आम्हाला सोडून गेल्या आणि मी खूप हताश झाले.. म्हणून माझ्या Mr. नी माझे लहानपण जिथे गेले तिथे आणले मला....आणि देशमुख मॅडम सोबत ओळख झाली....आणि मला हा कार्यक्रमासाठी त्यांनी बोलावले...
माझे वडील खूप शिस्तबद्ध त्यामुळे लहान असल्या पासूनच प्रत्येक चांगली सवय आई लावत गेली...त्यामुळे त्यांना सुद्धा मी श्रेय देईन....माझे दादा आणि वहिनी नेहमीच माझे कौतुक करून प्रोत्साहन देत आले होते....पण मधल्या काही काळात माझे माहेर पूर्ण तुटले होते तेव्हा मला आधाराची गरज होती आणि तो दिला माझ्या सासूबाईंनी.....
मी खूप मोठी झाले....पण कायम अज्ञात राहणे पसंत केले...पण देशमुख मॅडम नि माझी खरी ओळख शोधून काढली....आणि आज सर्वांसमोर ती करून दिली.....
आता काहीना प्रश्न पडला असेल???मी अशी का आले दागिने न घालता तर लहान असल्या पासून पण जशी मोठी होत गेले तसे समजत गेले की दागिने म्हणजे घराण्याची शान....जेवढे त्या बाईच्या अंगावर दागिने जास्त...तेवढे घराणे मोठे.... पण मोठी होत गेले तसे मी ठरवले...
कोणाच्या तरी ओळखीचे ओझं घेऊन नखशिखांत दागिने घालून नटलेली बाहुली होण्यापेक्षा, स्वतः स्व बळावर निर्मांण केलेली स्वतःची वेगळी ओळख हाच खरा दागिना....
आणि आज खूप मोठा दागिना मी मिळवला आहे.... जोरात टाळ्या वाजतात... अंकीता धावत जाते स्टेज वर आणि सावी ला मिठी मारते....सर्वांसमोर माफी मागते....आणि कार्यक्रम संपल्यावर तिला सन्मानाने घरी नेले.....
बाप लेकीची गळाभेट होते... सुरेश काकाना खूप अभिमान वाटतो लेकीचा.... सुधा काकूंच्या डोळ्यात आनंदाश्रु येतात....समीर ला खूप आनंद होतो....
आणि खर्या अर्थाने महिला दिन साजरा होतो.....
आवडली का कथा? नक्की सांगा....
अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका..... लाइक आणि कंमेंट करत रहा..... सूचनांचे स्वागत....