akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

4.2  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy Inspirational

माझा देश

माझा देश

2 mins
656


देसाईंची मीनल नुकतीच बारावी पास झालेली तशी ती हुशार शाळेत हि ती अव्वल असायची आई वडिलांना हि तिचे कौतूक त्याच्या घरी त्याचे एक नातेवाईक आलेले त्यांनी मीनल च्या बाबांना विचारले "काय सुहास पोरगी बारावी झाली आता काय "?

"ती आर्मी मध्ये जाणार "

"काय आर्मी अरे मुलगी ती तिला कशाला हवं आर्मी वैगरे आणि काही वर्षांनी लग्नच तर करायचं आहे "

"तिला आवड आहे आर्मी ची आणि आम्हला हि तिचे देशाप्रती विचार पटतात "

"तुम्ही ना तिला लाडावून ठेवले आहे ती करेल ते होय "

हे सारे मीनल आतून ऐकत होती तिला हे सर्व ऐकून राग आला ती बाहेर आली आणि म्हणाली "माफ करा काका पण तुम्ही चे बोलता ते बरोबर नाही मुलींनी आर्मीत जाण्यात काय चूक आहे आणि लग्न काय हो ते करावाच लागणार त्यासाठी आपली जिद्द सोडता कामा नये मला माझ्या देशासाठी काही करायचं आहे देशाची सेवा करायची आहे त्या साठी मला आर्मीत जायचं आज ते तिथे देशाचे रक्षण करतात म्हणून आपण इथे आनंदात राहतो आणि काका तुम्ही नेहमी बढाया मारतात ना कि तुमचा मुलगा परदेशी नोकरी करतो म्हणून पण काय फायदा तो तर तिथली आर्थिक रक्कम वाढवत आहे त्याचा माझ्या देशाला काय फायदा तो जर इथे राहून काम करत होता आणि आर्मी मध्ये असता तर ठीक होत पण तसा कोणी विचार नाही करत ह्या देशात उन्नती नाही म्हणून बाहेर जातात पण कधी तरी हा देश ह्या नजरेने न पाहता माझा देश कसा सक्षम होईल हे पहिले तर बरेच होईल 

आई बाबा दोन्ही मीनला कौतुकाने पाहू लागले आलेले पाहुणे मात्र खजील होऊन आपल्या घरी निघाले 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy