Shivam Madrewar

Abstract Fantasy Others

3.5  

Shivam Madrewar

Abstract Fantasy Others

मागेल त्याला गतिरोधक...

मागेल त्याला गतिरोधक...

4 mins
140


आपल्या महाराष्ट्रामध्ये एक उपक्रम राबवला गेला होता, “मागेल त्याला शेततळे”, हा उपक्रम किती अपयशी ठरला किंवा कितपट त्याला यश मिळाले हे मला माहिती नाही. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा सारासार विचार करुन हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे “ मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली. योजना तर सुरूवात सुध्दा झाली, व अनेक शेततकऱ्यांनी त्या

योजनेचा लाभ देखील घेतला.


मी सुट्टी साजरा करण्यासाठी बाहेर राज्यांमध्ये गेलो होतो, श्रीशैलम, तिरुपती हे देवस्थानाचे दर्शन घेतले व माझ्या गावी परतलो. मला जातानाही व येतानाही कर्नाटक राज्य लागले. मी त्या राज्यातील जवळपास दहा ते बारा मोठ्या शहरांममधुन गेलो असेन. प्रत्येक शहरांमधुन जाताना, मी राष्ट्रीय महामार्ग तथा राज्य महामार्गाचाच वापर केला. ज्या पध्दतीने महाराष्ट्रामध्ये “मागेल त्याला शेततळे” योजना मोठ्या प्रमानावर राबवली जात आहे त्याच अगदी त्याच पध्दतीने कर्नाटक राज्यामध्ये “मागेल त्याला गतिरोधक” ही योजना चालू आहे असा मला अंदाज आला. मी माझा प्रवास विजापुर नावाच्या जिल्ह्यापासुन सुरू केला, तो पुढे बागलकोट, रायचूर,बेल्लारी ह्या मुख्य शहरांमधुन जात होता. येतानाही हेच शहरे लागले आसावीत. ह्या मुख्य शहरांमधुन जवळपास दहा एक राष्ट्रीय व राज्य महामार्ग जातात, पण त्या महामार्गावर रस्ता कमी व गतिरोधक जास्त आहेत असे बोलण्यात व लिहिण्यात मला काहीच विरोध वाटत नाही.


जसे माझ्या महाराष्ट्रामध्ये “मागेल त्याला शेततळे” योजने अंतर्गत,जो व्याक्ती अर्ज करतो व काही नियम अटी पुर्ण करतो त्याला सरकार तर्फे शेततळा उभा करण्यासाठी मदत केली जाते अगदी त्याच प्रकारे कर्नाटकामध्ये “मागेल त्याला गतिरोधक” योजने अंतर्गत फक्त अर्ज जरी केला तर कुठे आणि किती गतिरोधक पाहिजेत हे तर तेथील सरकारच करत असावी. तेथील वैशिष्ट्य असे की त्या गतिरोधकाच्या आसपास काहीतरी असतेच. उदाहरण घ्यायचे म्हटले तर उदाहरण घेण्यापेक्षा सर्वे केला तर उदाहरणाचा अंदाजच खरे ठरेल अशी गोष्ट. कर्नाटकातील प्रत्येक गतिरोधकापाशी काही ना काही असतेच कारणच असे की तेथे “मागेल त्याला गतिरोधक” ही योजना चालू आहे. एखाद्या गतिरोधकाच्या बाजूला हॅाटेल अर्थात पंचतारकी भोजनालय असते, एखाद्या गतिरोधकाच्या बाजूला प्रसिध्द व्यापाराचे दुकान किंवा फ्रेंचाईज असते. ह्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारणे असतातच. गतिरोधक वैज्ञानिकदृष्ट्या आपल्या वाहनांचा वेग कमी करून अपघात टाळण्यासाठी केला जातो परंतु येथे मात्र वाहनांचा वेग कमी करुन आजूबाजूस पाहुन काही तरी खरेदी करावे हा त्यामागचा दृष्टिकोन.


बरं ठीक आहे आम्ही सर्व लोक मान्य करतो, तुम्ही ह्या अनोख्या कामासाठी गतिरोधकांचा वापर करता; मग तिथे एक गतिरोधक ठेवा, एक नव्हे दोन नव्हे तीन-तीन गतिरोधक तेथे असतात राव. अहो, त्या गतिरोधकांपासुन रस्त्यावरचे अपघात टाळतां येतील परंतु त्या वाहनांमध्ये बसलेल्या माझ्यासारख्या अतिसामान्य व तुमच्यासारख्या अनन्यसाधारण लोकांच्या मनामध्ये अपघात होतात ते टाळतां येतील, याचे मात्र उत्तर मला मिळाले नाही. आश्चर्य म्हणजे असे की आपण जर  पहायला गेले तर गावामध्ये किंवा शहरामध्ये अनेक हौसी-गौसी असतातच, खुप सारा पैसा खर्च करतात व मोठा बंगला बांधतात. आता एवढा मोठा बंगला बांधला मग रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना तर समजायला हवे, तर काही हौसी लोक “मागेल त्याला गतिरोधक” योजनेअंतर्गत आपल्या बंगल्याच्या सुरवातीस व शेवटी दोन-दोन किंवा तीन-तीनच्या सेटने गतिरोधक तयार करून घेतात. असे अनेक थरारक प्रयोग पाहून त्या नासा मधील किंवा डीआरडीओ मधील शास्त्रज्ञाचे सुध्दा भान ठिकाणावर राहणार नाही, असे तर मला वाटते.


ह्या महान व्यक्तींचे प्रयोग पाहुन मी अक्षरश: थक्क झालो. खरंच, एखाद्या गतिरोधकाचा अशा अनेक रितीने वापर करता येतो हे मला आजच समजले. फक्त काही क्षण विचार करा, आपला व्यवसायामधील विक्री वाढविण्यासाठी किंवा आलिशान बंगल्यासमोर असे गतिरोधक उभे करणे कितपत योग्य आहे. तुमच्या त्या रस्त्यावरून जाणारे फक्त वेगवान वाहन नाहीये त्या रस्त्यावरून रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या वाहनेसुध्दा जाणार आहेत, त्यांना काही सेकंदही उशीर झाला तर एखाद्या व्यक्तीचे जीवनाची किंमत कोणाला तरी मोजावी लागते.

 

हो मी हे मान्य करतो की कर्नाटक राज्या मध्ये “मागेल त्याला गतिरोधक” योजना राबवली नाही, पण मी हे मान्य करणार नाही की ते गतिरोधक कामाच्या ठिकाणी आहेत; एक मजेशीर लेख म्हणून हा लिहिला गेला, परंतु का? “गतिरोधक का तयार करावे लागतात ?” या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्हालाच शोधावे लागेल. भविष्यात खरंच का “मागेल त्याला गतिरोधक” योजना द्यावी लागेल. 

स्वत: विचार करा आणि उत्तर नक्कीच कळवा. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract