मागे वळ ना ... !
मागे वळ ना ... !
राहुल ला घरी यायला अतीच उशीर झाला होता.. तसा तो रोजच रात्री 12 ते 12:30 च्या दरम्यान येत असे... पण आज जरा 1 झाला होता...
राहुल शहरात जात असे कामाला तिथून रात्री 9 ला कामं आटपून वापस बस घेऊन गावी येत होता आणि बस स्थानकावरून रिक्षा घेऊन घरी येतांना त्याला उशीर होत होता.
विद्या ताई राहुल च्या आई त्याची वाट बघत होत्या. तो आल्यावर प्रमुख दाराला कडीकुलूप लावून झोपणे... आज जरा त्यांचा कधी नव्हे तर 12:30च्या दरम्यान राहुल ची वाट पाहता पाहता डोळा लागला होता... बाकी घरचे सगळे झोपी गेले होते.
आज राहुल ला कामं आटपायला 10:30 झाले होते कशीतरी धावत धावत शेवटची बस सुटलेली पकडली आणि दम टाकला. बस मधे अगदी काहीच मंडळी उरलेली असल्याने बस रिकामी रिकामी वाटत होती... काळोख पसरलेल्या त्या अमावसेच्या रात्री तो घरी पोहोचण्याची वाट पाहत होता...
बस चालत होती पण कदाचित नेहमी पेक्षा जास्त वेळ लागतोय असं राहुल ला जाणवत होत....
आणि...
..........
आणि...
एकदाची बसस्थानकावर बस पोहोचली.... अगदीच शांत आणि किर्रर्र रात्रीचा रातकिड्यांचा आवाज... गार गार वारा सुटलेला... जवळ जवळ एक - दीड वाजले होते. राहुल पटकन बस खाली उतरला. त्याची नजर एखादा रिक्षा मिळतो का साठी धावली... पण एकही रिक्षा जवळ पास नव्हता. त्याने पटापट वाटेने चालायला सुरुवात केली....
त्याला मनोमन चुकल्यासारखं वाटत होते... अगदीच शांतता होती. राहुल झपाझपा पाऊल टाकत होता.
अचानक काही दूरवर काही कुत्री भुंकू लागली. त्याला जरा अस्वस्थ विचित्र वाटत होतं. तितक्यात त्याला मागून आवाज आला "भाऊ , थांबा की ... कुठं जायचंय...? "
..राहुल जरा दचकलाच. तो आवाज रिक्षेवाल्या दादाचा होता. रिक्षा पाहून जरा याला बर वाटलं. राहुल पटकन रिक्षात बसला आणि म्हणाला.. "सावंतवाडी चला दादा... लवकर जरा.. "
रिक्षेवाला म्हणाला, " हो भाऊ...रस्ता,रात्र आपलीच आहे "....
त्या काळोख्या रात्री फक्त रिक्षा चा आवाज आणि अधून मधून कुत्री भूंकण्याचा आवाज च येत होता... रस्ता तोच होता.. जरा जास्तच उशीर झाला होता एवढंच.. पण कुत्र्याचे भुंकणे आणि राहुलच्या मनात लागलेली हुरहूर... कदाचित भिती... काही तरी विचित्र होत होते हे नक्की .....
......
रिक्षा हळू चालतोय असं सतत राहुल ला जाणवत होते... जरा वेळच लागत होता... तो मनात विचार करत होता, "कां, आज बस, रिक्षा इतका वेळ लावताय कुणास ठाउक... "
तो म्हणाला, "पटापट घ्या भाऊ जरा "...
रिक
्षेवाला नुसता हसला...
राहुलला आता जरा धास्ती वाटत होती....
......
....
आणि...
एकच राहुल च्या मनात धडकी भरली होती. खुप लांब लांब रस्ता वाटत होता त्याच लक्ष त्याच्या हातावरच्या घड्याळीवर गेलं. काटा एक च्या पुढे हललेला च नव्हता.... आता मात्र राहुल अधीर झाला. रिक्षे वाल्या ला म्हणाला, " लवकर हो भाऊ, घ्या पटकन. ".... तर रिक्षेवाला हसत हसत म्हणतो कसा, "रस्ता, रात्र आपलीच आहे "....
......
......
दुरून आता राहुल च्या नजरेत त्याच घर दिसू लागलं.राहुलने रिक्षेवाल्याला विचारलं, " भाऊ, किती पैसे झालेत? "...
तो म्हणाला, "द्या, 60-70 रुपये ".....
राहुल ने घाईत पैसे काढले. रिक्षा घरासमोर उभी होताच लगेच उडी घेतली. पैसे दिले.....
......
लगेच दारावर ची कडी वाजवली.. त्याच्या आईला झोप लागली होती... राहुल ने आणखी जोराने दाराची कडी वाजवली.. अजून जोराने वाजवली...
अधून मधून मागे वळून पाहत होता..तो रिक्षा आणि रिक्षेवाला तिथेच होता... हळू हळू तो रिक्षेवाला हसत होता...... राहुल जोराने कडी वाजवू लागला...
...
काकांना जाग आली.. काका उठले आणि दार उघडायला आले. काका दरवाजा उघडत होते.......
तितक्यात.......
तितक्यात......
राहुलला मागून एका बाईनं आवाज दिला,
"राहुल.. राहुल.. मागे वळ ना.. मागे वळ ना ".............
..........
..........
राहुल ला घाम फुटला... हृदयाचे धडधड ऐकू येऊ लागली.. .. तो मागे वळला तर रिक्षेवाल्या च्या जागेवर एक हिरवा नव्वार नेसून, बांगड्या घालून नटलेली बाई जोरात हसत उभी होती... काकाने दरवाजा उधडला होता.. हे दृश्य काकाही पाहू लागले....
ते विचित्र दृश्य पाहून ... त्यांनी झटकन थरथरणाऱ्या राहुल चा हात पकडून त्याला घरात ओढलं.... दाराची खुंटी घट्ट केली...
.... राहुल जमिनीवर कोसळला...
.....
काकांना काही वेळ काही सुचेना.. फक्त कानावर त्या बाईच्या हसण्याचाच आवाज येत होता....
.....
कोण होती ती नटलेली बाई? ... तिला राहुल च नाव कसं कळलं?... ती रिक्षा घेऊन का उभी होती?...काय होतं हे?...
अनेक प्रश्न होते
......
काकांनी घरच्यांना जागवले.. घरचे उठले... राहुल बेशुद्ध होता.. अंग तापत होतं... दुसऱ्या दिवशी सक्काळी त्याला जाग आला... आणि डोळ्यासमोर तेच दृश्य आणि आवाज होता...
" राहुल... राहुल... मागे वळ ना... मागे वळ ना. "....
.....