दिवस 2-
दिवस 2-
Dear diary,
आज लॉक डाऊन होऊन दुसरा दिवस होता. सगळी मंडळी आम्ही घरीच आहोत. बरेच दिवसांत हा निवांत वेळ घरच्यांसोबत मिळालाय. जरा उशिरा उठणे, जेवण मग पत्ते, लुडो, झोप आणि सायंकाळी शुभंकरोती असा दिवस छान आरामाचा जातोय. यात एक गोष्ट मघाशी घडली. सुमारे 10 वाजता खुप कुत्रा भुंकू लागली. सुरवातीला सगळं साहजिकच वाटलं परंतु नंतर आवाज तिव्र होऊ लागला. आमची जेवण नुकतीच आटोपली होती. आईने भावाला उरलेली पोळी आणि भात दिला आणि बाजूच्या गाईला द्यायला लावला. लगोलग मी मागे दारावर जाऊन त्याला बोलली, "ती एक पोळी कुत्र्याच्या दिशेला टाक रे "...कुत्रा वेगानं धावलीत आणि भाऊही धावत दारात आला. लगेच भुंकणे थांबले.
कदाचित हा काही दिवसांतला बदल जसा आपल्याला कठीण जातोय तसाच तो त्यालाही कठीण जात असावा..