Nandini Menjoge

Children Stories Inspirational

3.6  

Nandini Menjoge

Children Stories Inspirational

'फुल ना फुलाची पाकळी'

'फुल ना फुलाची पाकळी'

1 min
587


मोबाईलमध्ये डोळे खुपसले असतांना बाबा जोरदार ओरडले,"दिवा लाव देवाजवळ तिन्हीसांजेला लक्ष्मी येण्याची वेळ झालीय." तशीच पटकन उठले आणि दिवा लावला देवाजवळ तुळशीजवळ आणि 'शुभंकरोती' म्हटली... आईबाबा थोड्या वेळाने कामानिमित्त बाहेर गेले आणि मी शांत मंद वाऱ्याचा आणि एकांताचा आस्वाद घेत अंगणात पायरीवर बसले एकटीच.

'रविवार' माझा आवडता दिवस आणि एकांतात स्वतःशी संवाद आवडता छंद...


अचानक समोरून काही लहानलहान मुलं आली... आजूबाजूला पडलेला कचरा उचलू लागली... प्लास्टिकच्या थैल्या प्रत्येकाच्या हातात होत्या आणि मी पुसट ऐकलं की काहीतरी मंद नारेही लावत होती... अगदी कौतुकाने आणि कुतूहलाने मी त्यांना निरखत होते... शेवटी न राहवून मी त्यांना विचारलंच "कोणी सांगितलं तुम्हाला का स्वतःहून करताहात तुम्ही?"


त्यातली ती एक मुलगी म्हणाली, "ताई, आजतर रविवार आहे न आणि आमचं खेळूनही झालंय म्हणून आम्ही स्वच्छता करतोय." काही क्षण अगदी निःशब्द केलं त्यांनी... मग मी आणि शेजारच्या काकू आम्ही दोघींनीही त्यांचं कौतुक केलं आणि लगेच त्याचा फोटो घेतला... त्या केवळ आमच्या शब्दांनी त्याचा उत्साह इतका द्विगुणित झाला की तो मंद नारा स्पष्ट आणि कणखर दणाणला "GREEN INDIA CLEAN INDIA"


मनात म्हटलं, "आता खऱ्या अर्थाने स्वछतेनंतर घरात लक्ष्मी येईल." आज ही छोटी पावलं परिसर स्वच्छता संकल्प शिकवून गेली... सांगून गेली की आपण कुठेतरी चुकतोय... आज ह्या छोट्या कळ्यांनी खूप मोठा स्वच्छतेचा संकल्प करवून घेतला.


Rate this content
Log in