" लव्ह इन क्युबेक - २ "
" लव्ह इन क्युबेक - २ "
(भाग एक - https://storymirror.com/read/story/marathi/i0qv3f76/love-in-quebec/detail )
रात्री बेडवर पडून मी विचार करत होतो . ' जाई आणि मी कॉलेज फ्रेंड . ३ वर्षा पुर्वी जॉब साठी कॅनडाला आलो . खुपदा भेटत असतो आणि इन्डियन म्हणुन आपुलकी ही आहे . माझ मात्र तीच्यावर एकतर्फी प्रेम आहे . गम्मत अशी की, तीला हे कधी समजल नाही . आणि मी केव्हा सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. मी फक्त वाट बघत राहीलो , for perfect time आणि आता इकडे माझी वाट लागायची वेळ आली आहे .
तीने सकाळी हॉटेल मध्ये असताना जे काही सांगीतले त्याने माझी झोपच ऊडाली . मागच्या एका वर्षांपासून ती कोणाच्या तरी प्रेमात आहे . ते पण कॅनडीयन ऑनलाईन डेटिंग साईडवर....तीच्या मते हे अगदी सिरियस मॅटर आहे . मेसेजेस, चॅट वगैरे सगळेच ऑनलाईन... प्रत्यक्षात कधी भेटलेच नाहीत.... पण हे मॅटर एवढ पुढे गेल की, आता तीला त्या मुलाची सवय झाली आहे.... तो मुलगा ही सिरिअस होता म्हणे.... तो जर्मनीला असतो म्हणुन भेटायचा योग आला नाही. पण दोघानी आपापल्या प्रेमाची कबुली दिली.
पण खरा सिन तर वेगळाच झाला. आता जेव्हा जाईने एक स्टेप पुढे घेत भेटण्याची गळ घातली तर तो तीचा ऑनलाईन बिएफ वेळ नसल्याच कारण देत असतो . आणि आता तो मुलगा चक्क तीला ईग्नोर करायला लागलाय. मेसेज , कॉलला रिप्लाय करत नाही . म्हणुन ही बाई रडुन-रडुन लाल झाली होती . वरती म्हणते , रडुन मन हलक झाल म्हणुन . हे मॅटर एवढ पुढे गेल , तेव्हा कुठे मॅडमना आमची आठवण झाली . माझ्या तर स्वप्नात सुद्धा तीच्या बद्दल असा काहीही विचार केव्हा आला नाही . किती साधी भोळी ती अगदी नावाप्रमाने होती. तीच्याबद्दल वाईट वाटाव, की स्वतःबद्दल हेच मला कळेना . एक मात्र खर की , माझ्या आजच्या हॅपी संन्डेची तर पद्धतशीरपणे वाट लागली होती . तरीही डोक्यातील विचार स्वस्थ बसु देईनात आणि जाईला अश्या सिचुएशनमध्ये पहावत नव्हत.
शेवटी न रहावुन मी तीचा नंबर डाईल केला .
" हॅलो , how are you जाई ? "
" i'm ok सिद्धु ... सध्यातरी ठीक आहे."
" take care "
" नाही रे सिद्धु , माझच चुकल ना ? मी अस कोणत्याही ऑनलाईन साईडवर कोणावर विश्वास ठेवायला नको होता . माझ्याच चुकीमुळे मी फसले.
तीचा आवाज अगदी कापरा झाला होता .
" जाई ऐक ना | नाव किवा त्याचा पत्ता असेल तर मला शेअर करु शकतेस का ? मी कॉन्टाक्ट करतो आणि ...."
माझ वाक्य पुर्ण व्हायच्या आतच तीने सुरुवात केली.
" सिद्धु तुला काय वाटत ? मी काही शोधण्याचा प्रयत्न केला नाही का ? आयरा आणि मी गेल्या काही दिवसात खुप शोधाशोध केली . त्याने दिलेली सगळीच माहिती खोटी निघाली , तो काम करत असलेल्या कंपनीच नाव देखिल कुणी ऐकले
ल नाहीय. त्याच्या स्वत:च्या नावा पलिकडे मला काहीही माहीत नाही. कदाचित तेही खोट असाव. पुढे काय शोधणार आपण ? पण.... पण तो खुप छान बोलायचा रे .... आमचे बरेचसे विचार जुळायचेही . माझ्या साधेपणाचा फायदा घेतला, त्यामुळेच त्याने मला सहज चिट केल. काल तर शेवटी त्याने मला ब्लॉकच केल रे ....आणि... आणि... "
जाईला पुढे बोलवेना . ईतका वेळ अडवून ठेवलेले तीचे अनावर हुंदके शेवटी बाहेर आलेच.
' २१ व शतक आहे . जग एवढ पुढे गेलय . पण हे लोक .... असे ऑनलाईन प्रेमात पडतात आणि लग्नाचे डिसिजन्स ही घेउन मोकळे होतात. ते पण प्रत्यक्ष एकदाही न भेटता.... प्रगती म्हणावी , की अधोगती ?
इकडे साला आपण आत्तापर्यंत मुलींच्या मागे-पुढेच करत राहीलो. ४ -५ वर्षात एकदाही सांगण्याची हिम्मत नाही, की माझ तुझ्यावर प्रेम आहे.
आयला हे लोक पोहोचले चंद्रावर आणि आम्ही अजुन बंदरावरच आहोत. '
मी स्वतःच्याच विचारात मग्न होतो , आणि पलिकडून जाई राहुन-राहून सारखी रडत होती .
" जाई प्लिज शांत हो . मी काही मदत करु शकतो का ? तु लवकरात लवकर या सगळ्यातुन बाहेर निघ . हव तर त्याला ब्लॉक कर . म्हणजे तुला याचा त्रास होणार नाही . जर तो मुलगा खरच तुझ्या बाबतीत सिरीअस असेल, तर तो स्वत:हुन तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल ."
बास्स मी एवढच बोललो आणि कल्याण झाल . आता तिच्यामुसुमुसु रडण्याचा भोंगा झाला होता .
" अॅ....ह्या ..... मॅडी ने काल रात्रीच मला ब्लॉक केलय सिद्धु . आणि मी सुद्धा त्याला माझे खर नाव सांगीतले नाहीय . मी सुद्धा खोट्याच नावाने चॅट करायची . but i am so serious about him त्याला सगळ खर सांगायच होत म्हणुन भेटायला बोलावत होते . पण त्याने मला ब्कॉक केल रे ." ( परत भोंगा चालू)
मला त्याच नाव ऐकुनच ४४० चा करंट लागला.
"व्काय नाव म्हणालीस ? मॅडी ? पुढे काय ? "
" मॅडी बिच...पण इट्स ओके सिद्धु... मी यातुन बाहेर पडायच ठरवलय... तु नको टेन्शन घेऊ .... माझा डीसिजन झाला आहे. "
मॅडी बिच नाव ऐकुन मला एक क्षण वाटल, माझ्या मेंदूचा थंड गोळा होतो का काय . ती पुढे काय बोलली ते मी ऐकलच नाही.... मी पुन्हा तीला प्रश्न केला.
" आणि तु मघाशी म्हणालीस की, तु सुद्ध्या त्याला फेक नावाने डेट करत होतीस, आय मीन चॅट करत होतीस ( मी माझ सेंटेंस करेक्ट केल ). ते नाव कोणत ? "
" मी पॉला नावाने. बट दॉट्स इनफ....नो मोअर डिस्कशन....मी माझा डिसीजन घेतलाय रे...."
पुढे ती काय बोलते मी ऐकलेच नाही माझ्या हातातून फोन गळून पडला....उभ्याउभाच मी सरळ खाली कोसळलो . भोगा आता आपल्या कर्माची फळ.
(हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा..... तुमच्या सुचना देखील कळवा.)
(क्रमश)
(माझे कोणतेही लिखाण इतरस्त्र कोठेही पोस्ट करताना या नावासकट टाकावे ही विनंती - सिद्धि चव्हाण - https://siddhic.blogspot.com)