Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Siddhi Chavan

Others


2.5  

Siddhi Chavan

Others


मोगरा

मोगरा

2 mins 794 2 mins 794

मोगरा... नावातचं सुहास, शितलता आणि प्रसन्नता जाणवते. फक्त मोगरा अस मनातचं म्हणा... कसा कोण जाणे त्याचा वास आजूबाजूला जणवायला लागतो. (माझ्या बाबतीत तरी असंच होतं बऱ्याचवेळेस) मन त्याच्या आठवणीचं गुलाम आहे, नसतानाही त्याचं अस्तित्व जाणवतं. तो सुगंध मनामनात भरलाय. नुसतं डहाळी अन् डहाळी भरुन यायचं, उमलणं तेही शुभ्रधवल, दुसऱ्या रंगाचा नावालाही स्पर्श नाही. जणू तयाचा रंगच न्यारा.


हिरव्या गर्द साडीतील शुभ्र कांतिमय कन्या जणू, पण उमलताना येणार आपल्या सख्यांचा गोतावळा घेऊनच, मोगर्‍याला एकटं-दुकटं वेलीवर कधी पाहिल्याचं आठवत नाही मला. कळ्यांचे घोसच्या घोस दिसतात. मस्त दिमाखदार, पण सौंदर्याचा जराही अभिमान नाही. उलट शीतल, सज्जन, आणि खानदानीपणाचा झाक घेऊनच याचा जन्म होतो, आणि आपल्या सुहासाने सारा आसमंत व्यापून टाकतो.


लतादीदींचं हे अजरामर गाणं म्हणजे मोगर्‍याच्या सौंदर्याच अचूक वर्णन आहे.

इवलेसे रोप लावियेले द्वारी

इवलेसे रोप लावियेले द्वारी

तयाचा वेलु गेला गगनावेरी ।

फुले वेचिता बहरू कळियांसी आला

मोगरा फुलला मोगरा फुलला।।


तर असा हा मोगरा.. मोगऱ्याची एक पोस्ट वाचल्यापासून काही लिहावंसं वाटत होतं. वेळेअभावी जमत नव्हतं. Finally आजचा मुहूर्त मिळालाय. मी खूप कमी नाटकं बघते, कारण खूप वेळ लागतो ना नाटक करायलाही आणि बघायलाही. त्यातीलच एक काही वर्षांपूर्वी दिलीप प्रभावळकरांचं "वाह गुरू" नाटक पाहिलेलं. त्यात स्वतःचं मरण समजलेले एक प्रोफेसर आणि त्यांची बायको मिळून एक समारंभ ठरवतात ज्यात त्यांचे आप्त, विद्यार्थी, मित्रपरिवार असे सगळे जमा होतात. कार्यक्रम छान आनंदात पार पडतो. समारोपाला सर सगळ्यांना ती बातमी सांगतात, स्वतःच्या मरणाबद्दल... "की आपल्याला स्वतःचं मरण केव्हा हे समजलेलं आहे आणि अमूकअमूक या दिवशी मी मरणार." मग स्वतःच्या 3 शेवटच्या इच्छा ही सांगतात. हे सारं ऐकून काहीजण हळहळतात. प्रोफेसर खूप चांगले सज्जन गृहस्थ असतात. भावनाविवश होऊन काहीजण तर रडूच लागतात. तेव्हाचं त्यांचं एक वाक्य "ईश्वराने मला थोडीतरी कल्पना दिली आहे की माझ्या हातात किती दिवस आहेत जगण्याचे, ते सत्कारणी आणि आनंदी घालवावे की कमी दिवस आहेत म्हणून रडत बसावे?"


दोनदा पाहिलं हे नाटक... जाम रुजलंय खोलवर मनात कुठेतरी. वाटतं खरंच आपण आपली शेवटची इच्छा कुठेतरी लिहून ठेवायला हवी किंवा कुणाला तरी सांगून ठेवायला हवी. जो दिवस मिळतो तो भरभरून जगायला आवडतं. इतर कोणत्या इच्छा पूर्णत्वास जातील की नाही माहीत नाहीत. पण एक हमखास इकडे तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटत आहे. ती म्हणजे ओंजळभर का होईना मोगऱ्याची फुलं माझ्या आजूबाजूला पसरवून ठेवा. हा प्रवास कसा चाललाय माहीत नाही. कित्ती सरलं आयुष्य कित्ती उरलं याची काहीच कल्पना नाही. आपलं आयुष्य इतरांना किती सुगंध देउन गेलं याची गणना करणंसुद्धा जमत नाही. पण तो प्रवास तरी सुगंधित आणि मनमोकळा व्हावा एवढीच इच्छा.


(माझे कोणतेही लिखाण इतरस्त्र कोठेही पोस्ट करताना या नावासकट टाकावे ही विनंती - सिद्धि चव्हाण - https://siddhic.blogspot.com)


Rate this content
Log in