लव्ह इन क्युबेक - ४ (शेवट)
लव्ह इन क्युबेक - ४ (शेवट)
' चला उठा... तयारीला लागा, फॉर्मल शर्ट, विथ टाय अॅन्ड ब्लेझर.
आज ऑफिसला नाही गेलो तर टर्मिनेशन लेटर घरी येईल, सुट्टी संपली. मी रेडी झालो, एवढ्यात नजर मोबाईलवर पडली, ' किवीचे १२ मीस्डकॉल, ते पण मला ? का ? हा मला कॉल का करतोय ? रात्री काही गडबड झाली नाही ना ! डोक्याला थोडा ताण दिला तेव्हा आठवल, अरे आपण याला भेटायला बोलावल होत ! कालरात्री नशेत असताना कॉल केला करत होतो, मग नंतर मेसेज केला असावा . आज ०१ जानेवरी त्यांच्या एन्गेजमेंटची डेट म्हणुन कदाचित कॉल करत असेल. शिट्ट ! काहीही झाल तरी मला जायच नाहीये. ' काय करु ? या विचारात मी होतो, आणि परत एकदा रिंग वाजली . शेवटी मी फोन उचलून कानाला लावला. बघुया तरी काय म्हणतो ते !
" हॅलो "
" हॅलो सिध्द, मला तुझी मदत हवी आहे, तुला ठाऊक झाले का?, आमचा साखरपुडा रद्द झाला आहे."
" काय ? पण, का ? "
"मला काही सुचत नाहीये, मी काय करू ते.. मला काहीच उमजतच नाहीये रे "
दोन मिनिटांसाठी तर मी सुन्न झालो....काय बोलावं कळेना, तसाच कॉल कट करुन मी जाईचा नंबर डाईल केला.
" गुड मॉर्निंग सिद्धु. ट्रिपवरुन केव्हा आलास ? "
" गुड मॉर्निंग ? जाई, तू, बरी आहेस ना, आज तुझी एन्गेजमेंट होती, ती तू कॅन्सल केली. का ? आणि मला कळवलही नाहीस."
आता ऑनलाईन नविन कोण सापडल की काय ? की डॅडनी दुसरा एखादा मुलगा पसंत केला ? मी पुन्हा प्रश्नार्थक.
" अरे हो ! तुला सांगणारच होते. बट यु आर बिझी. फोन स्विच ऑफ होता. यु नो...? मॅडीने मला परत अॅड केल आहे. तू म्हणलास ते खरं झालं. मी त्याला ईग्नोर केल ते त्याला अपेक्षित नसावं. त्याला ब्लॉक केल होत, आणि काल सहज परत चॅट बॉक्स ओपन केला तर पाहिल की, त्याने मला पुन्हा अॅड केलय, चक्क मेसेज ही पाठवला आहे. ' मला तुला भेटायचं आहे, जेव्हाही मेसेज पाहशील मला उत्तर दे' म्हणुन, मी खूप खूश आहे. सिद्धु. तो जसा असेल...जसा दिसेल... खरा की खोटा, मला त्याला एकदा भेटायचंय
" ओके... ओके.... बट किवीच काय ? "
" त्याला मी याची आधीच कल्पना दिली होती. ' जर लग्नाच्या आधी मॅडी तुझ्या आयुष्यात परत आला तर मी तुमच्यामधे येणार नाही. हे किवीने मला दिलेल प्रॉमीस आहे. ' आणि या एका प्रॉमीसमुळे मी त्याला माझा होकार कळवला होता. मी माझी एन्गेजमेंट फक्त पुढे ढकलली आहे, कॅन्सल केलेली नाही. आज मी काय तो फायनल डिसीजन घेणार आहे. let see. and thanks. "
" एक... एक मिनीट जाई.... कॅन आय कॉल यु लेटर.... एक महत्वाचा कॉल आहे. "
" ओके, बाs बाय. अरे मला ऑल द बेस्ट वीश तरी कर ना !
" ऑल द बेस्ट ! " म्हणत मी पुन्हा कॉल कट केला.
दुसर्याच क्षणी माझा मेसेज बोक्स ओपन... पाहतो तर काय मी (म्हणजे मॅडीने) खरच तिला मेसेज केला होता. ' म्हणुन... पण केव्हा ? आणि या चुकून केलेल्या मेसेज मुळे तिने स्वतःची एन्गेजमेनंट पुढे ढकलली. ' खुदा मेहरबान तो गधा पहलवान, ' अशी माझी अवस्था झाली होती.
म्हणजे काल मला थोडी जास्त चढली होती. आणि मी चक्कर येऊन खाली पडलो, तेव्हा किवीला पाठवत असलेला मेसेज चुकून त्या डेटींग साईटवर जाईला गेला होता. काल जरा जास्तच झाली होती. नंतर मला शुद्ध राहीली नाही. उठलो ते डायरेक्ट आत्ता... सकाळी.
जो भी होता है, अच्छे केलिये होता है. लेट्स गो... ऑफिसच काय करायच ते नंतर बघू, म्हणत मी उठलो... जाईला भेटण्याचे ठिकाण मेसेज केल.
परफ्यूम, प्रॉपर शेवींग, ब्रॅन्डेड वॉच यापैकी आज कशाचीही गरज नव्हती. गरज होती ती, आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती याची. होईल ते अॅक्सेप्ट करण्याची तयारी ठेऊन मी बॅटलफील्ड पार्कचा रस्ता धरला.
" हाय ! "
" सिद्धु, तू आणि इथे ! कसा काय ? जाई फार आश्चर्याने बघत म्हणाली.
" इथे कोणालातरी भेटायचं ठरल होतं, म्हणून आलोय. बाय द वे, तू सुद्धा इथे ? " मी खुर्चीवर बसत विचारले.
" मी सुद्धा भेटायलाच आले, ते जाऊ दे, तुझ आधी सांग. न्यू इयरच्या सकाळी-सकाळी कोण येणार आहे , ते पण तुला भेटायला. समथिंग स्पेशल ?
" या... एव्हरिथिंग ईज स्पेशल." माझी नजर अगदी तिच्यावर रोखलेलीच होती. फ्लोरल व्हाईट, लेअर-लेअरचा नी-लेन्थ फ्रॉक आणि लाईट मेकअप ... कसली दिसते यार ही.
" वॉव एव्हरिथिंग ईज स्पेशल...हाऊ क्युट, बायद वे पहिल्यांदा तुला फॉरमलमध्ये बघते... लुकींग हॅंन्डसम ह ! "
" ओ रिअली ? थॅंक्स. सोड, तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर एक सजेशन पाहीजे होत." मी हातातला Eris च्या फुलांचा गुच्छ तिच्या हातात देत म्हणालो.
गुच्छ हातात घेऊन ती माझ्याकडे पहायला लागली. तिच्या चेहर्यावरचे आश्चर्य अगदी स्पष्ट दिसत होते.
" सिद्ध्यु, तू अस का बोलतोयस आज ? काही प्रॉब्लेम झालाय का ? हेल्प पाहीजे का ? बोल ना ! "
" एक मुलगी आहे . मी तिला ओळखतो , ती सुद्धा मला चांगलंच ओळखते. आम्ही चांगले मीत्र आहोत अस समज. आम्हा दोघांच्या आवडी-निवडी, विचात, थोडेसे ड्रेसिंग स
ेन्स, खाण्या-पिण्याच्या गोष्टी वैगेरे अगदी बर्याच गोष्टी मिळत्या-जुळत्या आहेत. खुप आधीपासून मला आवडते ती... आज तिला प्रपोज करायच ठरवलंय .....काय होईल ? ती मला होकार देईल ? " मी अगदी श्वास रोखुन तिचाकडे बघत होतो.
" का नाही हो म्हणणार ? तू वेल सेटल आहेस, हॅंन्डसम आहेस, चांगली पर्सनॅलिटी आहे . महत्वाच म्हणजे तू अॅॅॅॅज अ पर्सन खुप चांगला आहेस.... आणि तुझ प्रेमं, ते तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. या आधी मी तुला एवढा सिरिअस केव्हाच पाहिला नाहिये सिद्ध्यु. ती मुलगी नक्की हो म्हणेल बघ." ती एका क्षणात सार काही बोलुन गेली.
" नक्की ?" मी मोबाईल वर मेसेज सेन्ट करत पुन्हा प्रश्न केला.
" हो रे ! का नाही...एका परफेक्ट लाईफ पार्टनर म्हणुन मुलींना अजुन काय हवं असत. चला निदान तुझ मिशन लव्ह इन क्युबेक तरी सक्सेसफुल होणार...ऑल द बेस्ट. "
दोन मिनिटात तिच्या मोबाइलवर मेसेज अलर्ट वाजला होता. तिच्या मॅडीने म्हणजेच मी पाठवलेला मेसेज तिला मीळाला होता.
' लेट्स फॉल इन लव्ह अगेन, बट इन रियल ...
तुझाच मॅडी / सिद्धान्त / सिद्ध्यु. '
एक क्षणभर ती शांत झाली. आणि माझ्याकडे एकटक बघत राहिली. " कान्ट बिलीव्ह सिद्ध्यु ! म्हणजे तू... तुच मॅडी आहेस तर ? माझा विश्वासच बसत नाहिये." जाई विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होती. ती कन्फ्युज झाली होती.... काय बोलावते तिला सुचेना.
मी मोबाईल तिच्या समोर दाखवत म्हणालो, " हो मीच तो. मग तुझा होकार पक्का समजु ना ? "
" नाही... मला थोडा वेळ पाहीजे, मी काहिही ठरवलेल नाहिये. आणि तू चिटीन्ग केलीस ? "
" चिटीन्ग तू पण केलीस ना . तू पण फेक आयडी, मी पण फेक . आता रियल बनायला काही हरकत नाही." मी मात्र मिश्कीलपणे हसत तिला विचारल. ती अजुनही शॉक मध्येच होती.
" नाही सिद्ध्यु . मला थोडा वेळ पाहीजे. असा अचानक कोणताही निर्णय नाही घेऊ शकत मी. "
" कशासाठी वेळ ? फक्त विचार करायला ? यामध्ये विचार करण्यासारख खरच काही आहे का जाई ? तुच म्हणालीस ना मला, ' तू वेल सेटल आहेस , हॅंन्डसम आहेस , चांगली पर्सनॅलिटी आहे . महत्चाच म्हणजे तू अॅॅॅॅज अ पर्सन खुप चांगला आहेस.... आणि तुझ प्रेमं, ते तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. या आधी मी तुला एवढा सिरिअस केव्हाच पाहिला नाहिये. ती मुलगी नक्की हो म्हणेल बघ.' मग आता काय झालं ?
दातओढ खात जाईने तो फुलगुच्छ सरळ माझ्या अंगावर फेकुन मारला. " तू .... तू ना... एक नंबर चालू आहेस. माझ्याच शब्दांत मला पकडतोस."
" बरं, मग मी होकार समजु का ? तसही इथे तुला भेटायला मॅडी आता केव्हाच येणार नाही . आणि तो किवी तर तुझ्यासाठी ऑप्शनल होता. त्या डेटिंग अॅपवर परत कोणी फेक आयडी भेटण्याच्या आधी, आपण आपली रियल रिलेशनशीप कन्फर्म करुयात. काय ? मिशन लव्ह इन क्युबेक इज सक्सेसफुल. " मी भिवया उडवत तिला प्रश्न केला. ती बाकी मस्त लाले-लाल गाल फुगवुन, नजर चोरुन कधी माझ्याकडे, कधी उगाचच इकडे-तिकडे बघत होती.
" नाही. तुझा फोन दे इकडे .... पासवर्ड काढुन ! " एवढा वेळ शांत राहिलेल्या मॅमनी शेवटी ऑर्डर सोडली.
मी आज्ञाधारक मुलासारखा मोबाईल तिच्याकडे दिला.
टिक...टिक...टिक... सगळे डेटिंग अॅप क्षणात डिलीट केले होते तिने. तिरपा कटाक्ष टाकुन तिने मोबाईल माझ्याकडे सरकवला.
" सिद्ध्यु, तू परत ते अॅप डाउनलोड केलेसना तर बघचं." तिच्याकडून परत एक चेतावनी आली होती.
" हो , मी नाही करत डाउनलोड . आणि तुमच काय मॅम ? आधी मॅडी, मग किवी आणि आता तू काय सिताफळ वगैरे शोधत बसु नको तिथे म्हणजे झाल." मी उगाचच तिला चिडवण्याच्या स्वरात म्हणालो.
" मला....मला नाही बोलायच तुझ्याशी. जा !" जाई थोडी रागवली होती.
" ऐक ना ! एक सजेशन पाहीजे होत.... त्या मुलीला प्रपोज करायच होत, पण ती माझ्याशी बोलत नाही....मग मेसेज करु का ? त्या डेटिंग अॅपवर. "
" नाही. ती मुलीने डेटिंग अॅप डीलीट केल आहे." हाताने मोबाईल नाचवत, जाई गालातल्या-गालात हसली.
मी सरळ उभा राहीलो. छोट्याशा लालसर डबीतील एक छोटीशी हिर्याची अंगठी जाईसमोर धरत, एक हलकीशी स्माईल दिली. " जाई, अगदी कॉलेज पासुन तू मला आवडतेस, माझ प्रेम आहे तुझ्यावर. will you marry me ? "
तिने क्षणाचाही विलंब न करता हात पुढे करत, नजरेनेच होकार दिला.
बाहेर मस्त भुरभुरणारा बर्फ, रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली परपल अलीयुम्स ची जांभळी-गुलाबीसर फुले,
पांढ-याशुभ्र घरांच्या खिडकीतून डोकावणारे लव्हेंडर फुलांचे बॉक्सेस, सगळ्यांवर ऋतुराजाने शिंपडलेले शुभ्र हिमबिंदू. आणि यावर चार चांद लावलेली ती घराघरांवर आणि चोहीकडे सोडलेली सोनेरी-चंदेरी लाईटींग..... दृष्ट लागावी असे ते क्युबेकचे सौंदर्य.
कोणी Pouding Chômeur , तर कोणी Grands-Peres a L’erable याचा आस्वाद घेत होते.
घराबाहेर रस्त्यावर येऊन लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते.