लव्ह इन क्युबेक - ३

लव्ह इन क्युबेक - ३

6 mins
736


(भाग दोन - https://storymirror.com/read/story/marathi/12ndvwxs/lvh-in-kyubek-2/detail )' माझ ब्लडप्रेशर वाढत चालल होत, आणि डोक्याला मुंग्या यायला लागल्या. गेले काही दिवस डोक्यात चक्राप्रमाने विचार चालू होते.'

एका मित्राची गाडी घेऊन मी १२० च्या स्पीडने Spice of India कडे निघालो होतो. आठवडा झाला कामात लक्ष लागेना. आज काहीही करुन जाईशी बोलायच होत, एवढ्यात तिचा फोन आला. आणि मी थेट निघालो.

तिला सगळ काही खर सांगणार होतो. की मीच तो मॅडी बीच या नावाचा कॅनडीयन वेबसाईटवरचा फेक आयडी.... आणि मीच तिच्याशी त्या डेटिंग वेबसाईटवरती चॅट करत होतो. आयरा आणि तिला भेटलो त्याच्या आदल्या दिवशी जाईने म्हणजेच पॉलाने मला भेटण्यासाठी बोलावल होत. ती जास्तच हट्ट करत होती. खरतर मला पण तिच्याशी चॅट करायची सवय लागली होती. पण अश्या कॅनडियन, क्युबेक मधील कोणा मुलीशी प्रत्यक्ष भेटून रिलेशनशिप वाढवावी अशी माझी अजीबात इच्छा न्हवती. मी एक फेक आयडी आहे, हे कळल्यावर ती कशी रिएक्ट होईल हा तर एक मुद्दा होता. डोक्याला जास्त ताप नको म्हणुन मी (तिच्यामते मॅडीने) तिला ब्लॉक केल. आणि ती ( माझ्यामते पॉला) हे ऑनलाईन चाललेल चॅट वेगरे एवढ मनावर घेईल याचा मी एकदाही विचार केला नाही. माझा मुर्खपणा आणि निष्काळजीपणा याचा एवढा मोठा फटका बसला होता. त्या दिवशी पासुन ऑनलाईन गोष्टीचा तर मी धसकाच घेतला.

बास ! आज काहीही होवो. तिला सगळं खर सांगणार आहे. शिवाय गेली काही वर्षे माझ तिच्यावर एक तर्फी प्रेम आहे हे सुद्धा सांगणार. त्यावर तिची जी काही प्रतिक्रिया असेल ती ऐकण्याची तयारी होती.

सगळ मनाशी अगदी पक्क ठरवून मी हॉटेल मध्ये एन्ट्री केली. आणि नेहमी प्रमानेच या वेळेस देखिल माझा अंदाज चुकला होता. ' काय चाललय काय च्या मारी ? ही आयरा इथे कशी काय. आणि जाई बरोबर बसलेले हे अनोळखी महाशय कोण बर ? '


" अरे सिद्ध ! ये... तुझीच वाट बघत होतो आम्ही. " आयराने अगदी हसत माझे स्वागत केले.

मी अजुनच बुचकाळ्यात पडलो. त्या दिवशी ढसाढसा रडणारी जाई आज चक्क हसते, आणि आयरा पण हॉपी मुड मध्ये आहे. मी स्वप्नात तर नाही ना ? या मुलींचा काही नेम नाही हेच खर.


" नक्की प्रकार काय आहे ? " मी सरळसरळ प्रश्न केला.


" तुझ्यासाठी एक गुडन्युज आहे. बर आणि... " हलकेसे स्मित करत जाईने माझ्या कानात हळूच कुजबुज केली.


" आधी काय गुडन्युज ते सांग." म्हणत उसन हसु चेहर्‍यावर दाखवत मी बळेच ओढून-ताणून स्माईल दिली. खरतर मी सरप्राईज द्यायला इथे आलो होतो आणि आत्ता सरप्राईज होण्याची वेळ माझी होती.


" meet my fiancee किवी. डॅड नी माझ्यासाठी पसंत केलेला मुलगा. घरी सुद्ध्या सगळ्यांना आवडलाय. मुख्य म्हणजे आमचे विचारही जुळतात. आम्ही लग्न करतोय. नेक्ट विक मध्ये एन्गेजमेन्ट आहे. तुला यायच आहे ह. " जाईने एका दमात सगळ काही सांगून टाकल होत.


' मी फक्त आवासुन बघत राहीलो. त्या किवीच तोंड बघुन त्याची कीव येईल एवढा कडवट चेहरा.... कडवट कसला ? आंबट, तुरट, खारट (अस मला एकट्यालाच वाटत असाव बहुतेक ). आणि माझी जाई, अगदी फुला सारखी. जणू नाजुक परी. पण या सगळ्यात माझा झालेला पोपट पाहून मला माझीच कीव आली. किवीचा हेवा आणि माझी कीव करत मी congratulations म्हणत तिथून अक्षरशा पळ काढला. नेहमीच्या सवयी प्रमाने निघताना एक तिरका कटाक्ष जाईवर टाकला.... तिच्या चेहर्‍यावर दिखाऊपणाच हसू अगदी स्पष्ट जाणवत होत. तेच ते घारे डोळे वरती करुन, बळेच गोरे-गोबरे गुलाबी गाल फुगवत, तीने बाS बाय करत मान डोलावली. माझ्या दिवा स्वप्नातली परी ती. लव्हेंडर कलरचा बटरफ्लाय टॉप आणि व्हाईट चुनिदार बारीक फुलांचा पायघोळ असा स्कर्ट...... अशी तिची छबी मी डोळ्यात साठवून घेतली. कदाचीत शेवटची ?'


०००००


" जाईने डॅडच्या सांगण्यावरुन लग्नाला होकार दिला तर ! "


' माझ्या मॉम-डॅडने तर केव्हाच सांगून टाकल आहे. " तुला आवडेल त्या मुलीशी लग्न कर. पण या वर्षी तरी सुनबाई घरी घेऊन ये. " आणि इथे मी गेली काही वर्षे एक प्रपोज केव्हा करायच, आणि कस करायच याची प्रॅक्टीस करतोय. अब तो, वो भी नसीब मे नही. यार माझ्या बरोबरच अस का होत ? कदाचीत या आधी तीला हे सगळ सांगितल असत तर ? तीचा नकार एकवेळ मला पचवता आला असता. पण यामुळे तीने जर आमची मैत्री तोडली असती. तर मला ते पचवण अवघड गेल असत. याला घाबरुन कधी हिम्मत केली नाही, कारण नाती टीकवण्यावर भर देणारी आमची संस्कृती आहे. मला खरच आवडते ती... अगदी मनापासून. नाही विसरु शकत मी तिला.'


' जाई मला खुप आधी पासुन आवडते. saveur de l'inde ला आयरा ला भेटण्याच्या निमीत्ताने आम्ही तिघे खुप सार्‍या गप्पा-ठपा करायचो. त्या दोघी तासनतास बडबड करत बसायच्या. आणि मी आपला हेड फोन्स लावून गाणी ऐकत त्यांच्या गपा बघायचो. त्यांच्या हेअरस्टाईल वरुन , शॉपिंग वरुन आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीज या सारख्या चर्चेमध्ये मला काही कळायच नाही.... खर तर जाईला बघण्यासाठी मी तिथे थांबलेला असे , ती बोलायची आणि मी ते ऐकतोय अस दाखवत तासनतास तिचे हावभाव, तिच हसन आणि रुसन, बोलण्याची पद्धत हे सार काही फक्त बघत बसायचो. त्या दोघीना वाटायच, मी मन देऊन ऐकतोय, पण ते फक्त वाटण्यापुरतच मर्यादीत होत.  '

' एकदा अश्याच त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या, मी आपला हेडफोन्स कानात घालून मोबाईल ची गाणी ऐकत होतो. बोलता-बोलता आयराने मला टाळी दिली. मी सुद्ध्या ऐकतोय अस दाखवत तिला टाळी दिली. खरतर टॉपीक काय हे मला माहीत नव्हत.... वर मी ' वॉव अमेझिंग ! ' अशी टिपणी पण केली. त्यावर जाई एवढी चिडली की, तिची आवडती नागा चिकनची डिश तशीच टाकून तरातरा निघूनही गेली.

नंतर आयराकडून समजले की, जाई सांगत होती... ' ती एकदा क्युबेकच्या स्ट्रिटवरती पडली होती आणि तिचा ड्रेसही थोडा फाटला होता. तेव्हा पासुन ती त्या स्ट्रिटवरती जात नाही. तिला खुप वाईट वाटल.' आणि तू या टॉपीक वरती वॉव अमेझिंग म्हणालास, तर ती निघून जाणार नाहीतर काय करणार !

यावर आम्ही दोघे तेव्हा खुप हसलो होतो. अगदी पोट दुखेपर्यंत.


बर्‍याचदा " करी खुप हॉट आहे." अस काहीतरी ती बोलून जायची, आणि मी " सो स्विट ना. " अशी टिपणी करायचो. हेडफोन्सचा परिणाम दुसर काय ! पण हळूहळू तिला कल्पना येऊ लागली की, मी त्यांच्या टॉपीक मध्ये इंटरेस्टेड नसतो. '

खुप सार्‍या आठवणी होत्या. खुपसारे किस्से. तिला Eris चे फुल आवडते म्हणुन मला आवडायला लागले. तिला त्रास व्हायचा म्हणुन मी स्मोकिंग सोडून दिल. तिच आवडत रेस्टो म्हणुन आम्ही तिघे इथे भेटायचो.. खरतर मला हे हॉटेल केव्हाच आवडल नाही. या सार्‍या गोष्टी तिला केव्हा जाणवल्या नाहीत, आणि मी सांगण्याचा प्रयत्नही केला नाही.

सार काही संपल होत, मी खरच हरलोय का ? की अजुन काही आशा आहे ?


०००००

" प्याल दिवाना तोता हे,

मत्ताना तोता हे,

हल खुशिशे हल गमशे बेदाना तोता हे !

ला ssलालाss लाs, लाs ला sलाs, ललss लाला ssलालाss लाs."


' आज कितीतरी दिवस मी नशेतच आहे. उतरली रे उतरली, की परत एक पेग...ना ऑफिस...ना मित्र... दिवसातले ८-१० तास तर मोबाईल बंद असायचा. हल्ली मी कोणाचा कॉल घेत नाही. सगळ्याना सांगून टाकल आहे की, मी सिडनीला ट्रिपला जातोय. वेळ मिळणार नाही, कॉल करु नका. आणि सिडनीची ट्रिप एक पेग, दोन पेग, करत इथेच चालू ठेवली होती. पॉला म्हणजे जाईचा कॉन्टॉक्ट परत अ‍ॅड केल. पण आत्ता तिने मला स्वत:हुन ब्लॉक केल होत. आत्तापर्यंत तर तिने लग्न सुद्धा केले असेल. डोक्यात हजार विचार येत होते. आणि आज जरा जास्त चढली होती. मधेच जाईचा राग येत होता. त्या किवीला सांगू का ? ' मला जाई आवडते म्हणुन , ' या विचारात मी त्याचा नंबर डाईल केला. हात थरथरत होते. पुढे हिम्मत होईना. रिंग वाजली की नाही, माहीत नाही. मी लगेच कॉल कट केला. मी एवढी प्यायलो आहे हे त्याला समजले तर ? नको ! कॉल नको. मेसेज करतो. काहितरी टाईप करत होतो, पण डोक गरगरल्या सारख झाल आणि मी बसल्याजागी खुर्चीत आडवा.'


(क्रमश)


©सर्व हक्क लेखिकेस्वाधीन

(माझे कोणतेही लिखाण इतरस्त्र कोठेही पोस्ट करताना या नावासकट टाकावे ही विनंती - )


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance