लक्ष्मीहरण
लक्ष्मीहरण
एक घर प्रमुख आपल्या कुटुंबासाठी वडिलोपार्जित शेतीचा गांवातील धंधा सोडुन शहरात वास्तव्य करण्यासाठी येतो. या प्रमुखाचे वडिल महामारी स्पेनिश फ्लूचे शिकार झाले होते. एकदम लहानपनीच वडिलांचे छत्र नसल्यामुळे त्यांना वडिल भाऊ व आईचा फक्त आधार उरला होता. त्यांनी गांवात जवळ्च्या शाळेतच इयत्या आठवीं पर्यंतचे आपले शिक्षण प्राप्त केले होते. शालांत परिक्षा वर्धा इथुन उत्तीर्ण केली होती. अनेक महापुरुषांचे जीवन चरित्र शाळेत वाचले होते.महात्मा फुले यांच्या कार्याचा त्यांच्या वर प्रभाव झाला होता.कॉग्रेसची स्वातंत्र्याच्या लढाई ने पण प्रभावित झाले होते. पण कुटुंबाच्या जवाबदारी मुळे विशेष सक्रिय प्रत्यक्ष योगदान स्वातंत्र्य चळवळीत कराता आले नाही. त्यमुले घरप्रमुखाने कमीत-कमी इंग्रज सरकारची नौकरी नाही करायची असे ठरविले होते.
कुटुंबाची जवाबदारी सारखी वाढतच चालली होती. शेतीमध्ये काही मनासारखे समाधानकारक उत्पन्न होत नव्हते. खायला कोंडा अन झोपायला धोंडा अशी कुटुंबार परिस्थिति येत होती. त्यात वरुन दुष्काळ म्हनजे दुष्काळात तेरावा महिना. त्या काळात पडलेल्या दुष्काळा मुळे आर्थीक परिस्थिती बिगडत चालली होती.जरी देशात सर्वत्र आनंद व उत्साहाचे स्वातंत्र मिळाले म्हणुन वातावरण होते.परंतु घरचे आर्थीक वातावरन सारखे बिगडत चालले होते. मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी सारखी वाढत होती. मुलांच्या भविष्यासाठी त्यांना शिक्षण देने अत्यंत जरुरी होते. समोर चार मुले व दो मुली असल्यामुळे शेतीच्या वाटण्या होने ठरलेच होते. शेति काहीच फायदा नाही हे त्यांच्या ध्यानात आले होते . कसले काय अन फाटक्यात पाय. सर्व प्रयत्न करुनही आर्थिक परिस्थिती सांभाळत नव्हती. परिवारासाठी काही चांगले करायचे असेल तर गांव सोडने आवश्यक आहे. म्हनुण घर प्रमुख गांव सोडुन आपल्या परिवारा सोबतच जवळ्च्या शहरात आला होता. शिक्षण असल्यामुळे त्यांना लगेच निजी बैंकेत कशिअरची नौकरी मिळाली होती. आपाली शेति त्यांनी आपल्या वडिल भावाकडे दिली होती.त्यामुळे वडिल भाऊ दरवर्षी कुटुंबाला लागणारे अन्नधान्य पुरवत होते. व नौकरी असल्यामुळे मुलांचे शिक्षण व घर खर्च चालत असे. त्यांचे सासरे पण त्यांची पत्नि लहान असतांना मरन पावले होते. त्यांची सासूपण बहुतेक त्यांचा सोबत राहत असे. सासूचे दीर त्यांचा वहिणीला वर्षाचे काही रोख रक्कम देत होते. कारण् वडिल भावाची शेति पण त्यांच्या ताब्यात होती. कारण त्यांच्या वडिल भावाला मुलगा नव्हता.फक्त दोन मुलीच होत्या.रुढीनुसार काकाच संपत्तीचे मालक बनले होते .
आपली मुलगी किरायाच्या घरात राहते. तीचे पण घर असावे,म्हणुन त्यांच्या सासूने एक प्लॉट घेवून दिला होता व काही वर्षानी सासू मरण पावली होती. स्वातंत्र्यानंतर देशात बऱ्याच घडामोडी होत होत्या. त्यात एक महत्वची घटना देशात घडली.ते म्हणजे बैंकांचे राष्ट्रीीकरण झाले. त्यात नंतर सर्वाच बैंकेचे विलीनीकरण झाले होते. घरप्रमुखाच्या बैंकेचे पण राष्ट्रीयीकरण झाले होते. नंतरच्या काळात कर्मच्या-याना मधे-मधे वेतन वाढ मिळत होती. त्यामुळे घर प्रमुखाची आर्थीक परिस्थिती सुधरत गेली व सघन झाली होती. नंतर त्यांनी आपले स्वतःचे घर शहरात बांधले. हळु-हळु संसारात स्थाईत्व येवु लागले होते. मुला-मुलींचे शिक्षण सुरु होते. घर बांधल्यामुळे सर्वच खुश होते. पण त्यामुळे घर प्रमुखावर थोडे कर्ज व उधारी होती.पन नियमित उत्पन्न मिळत होते. त्यामुळे या सर्व समस्या हळूहळू कमी होत होत्या.
अधिक उत्साह अन त्यातून फाल्गुन मास, दिवाळी नवीन घरात जोमाने साजरी करन्याचे प्रयत्न सुरु होते. तशी तैयारी घरातील सर्वच सदस्य करित होते. दिवाळीचा सन प्रारंभ झाला होता. लक्ष्मीपूजन म्हणजे खरी दिवाळी असते. त्या दिवशी सर्वच भारतीय आप-आपल्या परिने दिवाळी म्हनजे लक्ष्मीचे पुजन करतात. बहुतेक कर्मच्या-याना त्या दिवशी दिवळीची सुट्टी असते.पण लक्ष्मी म्हणजे धन, म्हनजे पैसे, म्हणुन त्या दिवसाला बैंकेला सुट्टी नसते.घरी लक्ष्मी पुजनाची तयारी जोर-यात सुरुच होती. घरातील सर्वच जन घर प्रमुखाची सारखी वाट पाहत होते. त्यांना उशिर होऊन राहिला होता. म्हणुन त्यांचा एक मुलगा बैंकेत गेला होता. बैंकेत गेल्यावर तो आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जाणार होता. तितक्यात त्याच्या ओळखीचे बैंकेतील काकांनी त्याला मध्येच थांबवले होते. ते म्हणाले तुमच्या बाबांना यायला आज उशिर होवु शकते. कारण रोजची कॅश कमी पडुन राहिली आहे. कदाचित कोणाल ती जास्त किंवा डबल देण्यात आली असेल, त्यामुळे त्याची चौकशी करने सुरु आहे. तबल पाच हजार रुपए कमी भरल्या जात आहे.त्या काळात पाच हजार म्हणजे कर्मचा-याचा जवळ-जवळ एक वर्षाचा पगार होता. शेवटी कॅश मिळाली नाहआता ही रक्क्म त्यांना भरुन द्यावी लागेल हे निश्चित होते. म्हातारी गेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. घर प्रमुख शेवटी बैंक बंद करुन घरी परत आले होते.घरी सर्वत्र निराशाचे वातावरण पसरले होते. कसे –बसे लक्ष्मी पुजन संपन्न करण्यात आले होते. व त्या वर्षीची दिवाळी फारच निराशाच्या वातावरणात साजरी करण्यात आली होती. करु गेले काय आणी वरती झाले पाय असा प्रकार कुटुंबा वर आला होता.
शहर फार मोठे नव्हते. ही बातमी पूर्ण शहरात पसरली होती. सगळ्या धंधेवाल्यांना पण याची भनक लागली होते. त्यांचे कॅशिअर सोबत नेहमीचे चांगले सलोख्याचे मधुर सबंध होते. सर्वाना असे वाटत होते की कॅश कोणाला तरी जास्त वाटन्यात गेली असावी. पण इतक्या वर्षाच्या अनुभवा वरुन त्यांचा यावर विश्वास बसत नव्हता. मुख्य कॅशिअर सोबत एक साहयक कॅशिअर पण काम करत होता.तो जेव्हा कधी त्या काळात कोण्या दुकात व्यवहार करण्यासाठी जात असे तेव्हा भुगतान करतांना शंबरची नोट देत असे. त्या काळात एखाद्या व्यक्तीजवळ सारख्या शंभरच्या नोटा असणे जरा नवल करण्या सारखेच होते. तेव्हा लॉटरी हा प्रकार अस्तीतवात नव्हता. नंतर मुख्य कॅशिअरच्या लक्ष्यात आले की त्यांना साहेबांनी काही कामासाठी बोलवले होते. तेव्हा त्यांनी मोजलेली पाच हजाराची गड्डी लॉक न करता तीथेच वर टेबलवर ठेवुन गेले होते. दोन्ही कशिअर एकाच कॅबिन मधे बसत असत. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी लक्ष्मीचा प्रसाद म्हणुन त्याने ती गड्डी लंपास केली होती. कदाचित तेव्हाच पोलिसा मध्ये जर तकरार केली असती तर काही सुगावा लगला असता.त्य काळात विश्वास व प्रामाणिकता जीवंत होती.त्यामुळे बैंकेतील सहकर्मियान वर अविश्वास दाखवने फार कठिन कार्य होते.पण कणिष्ठ कॅशिअर हे फार चतूर, मृदू भाषी होते. विहीण बाई लई गुणाची माणिक मोत्यांची, ते आपले काम करुन घेत असे. कनिष्ठ कॅशिअर ने आपली करामत दाखवली होती.
वेळ निघुन गेल्या नंतर काही उपयोग नव्हता. नंतर त्याचे पितळ उघडे पडले होते. हे प्रकरण लक्ष्यात येताच त्याची बदली करण्यात आली होती. चिंध्या वेचलेल्या अन गोदडया शिवुन कशी तरी परिस्थिति सावरली होती. पण या आलेल्या अचानक संकटामुळे मुख्य कशिअर व परिवार आर्थीक तंगी भोगत होता. ती रक्क्म त्यांच्या पगारातुन व्याजा सोबतच कटत होती. अशा प्रकारे मानवी मूल्यांचे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पतन झाले होते.सोबत लक्ष्मी विराजमान होण्यापूर्वीच तिचे त्या दिवशी हरण म्हणजे लक्ष्मीहरण झाले होते.
