Suhas Bokare

Comedy Children

3  

Suhas Bokare

Comedy Children

लहानांसाठी स्किट-सोलकडी सिंगर

लहानांसाठी स्किट-सोलकडी सिंगर

3 mins
48


(एक गायक आपल्या घरी एकटा बसलाय.

त्याला मोबाईल वर एक मेसेज येतो.- ह्या मेसेजेस चे "शब्द" म्हणजे आपले कलाकार. आता कलाकार मुलगा /मुलगी म्हणजे मेसेज मधला कोणता शब्द बरे? ते त्या मुलांनी हातात धरलेल्या/ अंगावर टांगलेल्या पाटी वरून कळतं).


(आलेले मेसेजेस हे गायकाच्या मोबाईल मधून बाहेर पडतात आणि मूर्त स्वरूप धारण करतात )  


गायक (मेसेजेस कडे बघत )-

या मेसेजेस या 

आता काय म्हणता!


(पहिल्या मुलाच्या हातात (1st बोर्ड )" स्टे," 

दुसऱ्या मुलाच्या हातात (2nd बोर्ड ) "एट होम "

अश्या पाट्या आहेत )


दोन्ही मुलं - 'स्टे' 'एट होम' (दोन तीन वेळा )


गायक (वैतागलेला )- 


माहीत आहे बाबा!

कान किटले आता.

म्हणे - स्टे एट होम, स्टे एट होम. 


(गायक आता मोबाईल कडे बघतो, मेसेज टाइप करतो नि बोलतो -)

गायक -

करू काय मी? 

कंटाळा हर घडी, 

लागलीय भूक,  

द्या नं जरा सोलकडी !


(उत्तरादाखल एक मेसेज आणखी येतो. फक्त एक मुलगा एक पाटी घेऊन येतो - (3rd बोर्ड )"एन सिंग " अशी ती पाटी )


(नाचत नाचत "एट होम" ची पाटी धरलेला मुलगा "स्टे" पाटी चा साथ सोडतो. नि आता पुढ्यात येतात "स्टे" आणि "एन सिंग " किंवा 'n सिंग')


मुलं - 'स्टे' 'एन सिंग' (दोन तीन वेळा )


(मधेच "एट होम" वाला पुढे येतो )


-'स्टे' 'एट होम'


(परत जागा बदलतात )


-'स्टे' 'n सिंग'


गायक - (मॅसेज टाइप करतो )


ज्ञान देता देता 

तुम्हा राहिलं नाही भान 

मला तर हवीय 

सोलकडी छान.


(मेसेज चे उत्तर येतं )


('सो ' 'ल ' 'श ' 'डी' अशे चार वेगळे वेगळे बोर्ड नि एक ग्लास सोलकडी चा फोटो )


- चार मुलं 'सो '(4th बोर्ड ) 'ल ' (5th बोर्ड )'श ' (6th बोर्ड )'डी ' (7th बोर्ड ) सोबत सोलकडी चे चित्रं घेऊन ते गायका समोर नाचतात.


गायक (चिडून ) (उत्तर देतो )-

करताय माझी चेष्टा? 

फोटो नुसते पाठवताय !

बॅकस्पेस द्या, नीट सोलकडी लिहा- 

गाढवांनो ! 'सोलशडी' काय लिहताय !


('श' पाटी असलेला मुलगा मागे जातो (म्हणजेच backspace घेतो ) परत जागेवर येतो पण उलटा उभा राहतो. त्याच्या मागच्या बाजूला ' क' ची पाटी असते, तर आता 'श ' चा ' क ' झालाय )


(उलटा उभ्या मुला सकट "सोलकडी" हा शब्द गायका समोर नाचतो, ग्लासभर सोलकडी च्या फोटो सकट )

सर्वच मुलं - "सो ल क डी "


("सोलकडी " ह्या शब्दांसोबत इतर पाट्या ही नाचतात. कधी "स्टे " "एट होम" तर कधी "स्टे " "एन सिंग " )


(ते बघून गायक चिडतो. पण अचानक त्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात.तो मोबाईल कडे बघतो नि ओरडतो - )


गायक - या हू !

लॉकडाउन केला शिथिल !

बघा आत्ता बाहेर जातो! 

सोलकडीच काय, 

सामोसेही खातो !

हाहाहाहा !


(गायक हसतोय, मात्र काही 'अक्षरं पाट्या ' (म्हणजेच कलाकार मुलं ) तो बेजबाबदार पणे उचलून घरा बाहेर फेकतो)


("एट होम" ची पाटी मात्र घरातच राहते बाकी सर्व अक्षरपाट्या घराबाहेर जाऊन पडतात. )


एट होम पाटी - 

अरे थांब थांब मनुष्या 

नको सगळं विस्कटूस  

बाहेर चाललास तरी 

पाळायचेय रुल्स. 


(पण न ऐकता गायक घाईत घरा बाहेर पडतो)


(काही दोऱ्या ( social distancing साठी वापरतात तश्या) सोबत घेऊन मघा गायकाने जी अक्षरं बाहेर फेकली तीच अक्षरं बाहेर आडवी पडलेली आहेत. गायक तिथे पोचताच- )


(एक एक "पाटी" (मुलगा) दोरी च्या साहाय्याने गायकाच्या समोर येतो )


(त्यांचे हाल बघून गायक हसतोय. 

रेस्टारेंट मधे जेवायला बसतोय (Miming ). 


मघाचा "एट होम " आता रेस्टारेंट चा वेटर झालाय.


रेस्टारेंट मधे social distancing चे rules पाळले जात आहेत.


आणि ती उरलेली अक्षरं गायकाचा पिच्छा पुरवतात व एक एक करून त्याच्या समोर जाऊन नाचतात -)


(उरलेली अक्षरं खरं तर ही आहेत - स्टे, एन सिंग, सो,ल, क, डी )

( ते नाचत नाचत पुढील शब्द तयार करतात. 'क ' अजूनही उलटाच उभा आहे )


"सो -क -ल -डी -स्टे -एन सिंग "


(असा घोळका तयार होतो नि ते सर्व 

गायकाच्या आजूबाजूला नाचतात )


('क' उलटाच नाचतोय, त्याला त्याचे सहकारी सुलट फिरकी देतात मग कुठे त्याच्या हातात 'श ' ची पाटी दिसते )

(म्हणजेच मघाप्रमाणे हळूच आता, ' क 'चा 'श' झालाय )


आता घोळक्याने पुढला शब्द तयार केलाय -


"सो -श -ल -डी -स्टे -एन सिंग "  


(मागून संगीत लहरी नि हा शब्द गायका भोवती नाचतोय )


सगळे - 

बाहेर पडलास माणसा

पण विसरायचं नाही !

शत्रू अदृश्य आहे- 

सोशल डिस्टन्सिंग सोडायचं नाही !


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy