Suhas Bokare

Fantasy

3  

Suhas Bokare

Fantasy

स्वतंत्र विवेकपूर!

स्वतंत्र विवेकपूर!

5 mins
186


एकदा काय झालं, एक होता राजा. त्याच्या राज्याचे नाव विवेकपूर आणि राजा होता विवेकसिंह. विवेकपूर च्या शेजारी भ्रष्टपूर होते. तिथे भ्रष्टसिंह नावाचा राजा राज्य करत होता .दोन्ही शेजारी राज्यांचे संबंध कडू गोड असे होते.


भ्रष्ट सिंहच्या एकदा मनात आले आपल्या राज्याचा एक मोठा प्रश्न सोडवायचा. 'भांडी कशी घासावी?', हा तो प्रश्न. त्याच्या राज्यात लोकं भांडी घासायला जुनाट पद्धत वापरायचे. जळालेल्या लाकडाची राख घ्यायचे आणि भांड्यांवर लावून भांडे स्वच्छ करायचे. राजाने दवंडी पिटवली की जो भांडे घासायची योग्य पद्धत सांगेन त्याला बक्षीस मिळेल. त्या भ्रष्टपूर मधे एक माणूस राहायचा, नाव होते गणू! गणू मोठा हुशार. त्याने काही दिवसात भांडे घासायला एका भुकटी चा शोध लावला. छान चोपडी भुकटी, बुडबुडे तयार करायची आणि भांडे आरशा सारखे स्वच्छ करायची. भ्रष्टपूरमधे इतर ही किती तरी विद्वान लोकं होती. राजा भ्रष्टसिंह ने विद्वान लोकांना आपल्या मुठीत ठेवले होते. त्यांना अमिष दाखवून, त्यांच्या कडून वाट्टेल ती कामं करवून घ्यायचा.


त्या विद्वानांचा उपयोग करून बाहेरील राज्यातल्या मंत्र्यांना फितवून, बारीक सारीक माहिती काढून लाखो चा फायदा करवून घायचा. त्यामुळे सर्व विद्वान लोकं सोकावली होती. आप आपल्या ज्ञान क्षेत्रामध्ये अजिबात लक्ष न घालता, राजाला खूष करणारी क्षुल्लक फायद्यांची कामं करत आपले दिवस काढायची. ह्या भ्रष्ट विद्वानांचा म्होरक्या होता, 'गुंगे महाराज '. गुंगे महाराज मुका होता आणि तो फक्त इशाऱ्याने बोलायचा !


तिकडे, गणू ने शोधून काढलेल्या भुकटी बद्दल राज्यात चर्चा सुरू झाली. मग काय, राजाने गणू ला बोलवणे पाठवले. गणू ने राजा ला त्या भुकटी चे प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले. पण गुंगे महाराज आणि इतर भ्रष्ट मंडळी मात्र निराळाच विचार करत होती. गुंगे महाराजांनी राजाला इशाऱ्याने सांगितले की बाहेरच्या राज्यात ह्या भुकटी चे एक दोन पुडके लाख रुपयाला विकावे. इतर विद्वानांना ते पटले.राजाला ते पटलं. नंतर गुंगे महाराज म्हणाले की भुकटी ला चांगली किंमत मिळेल तर तिचा प्रसार सामान्य लोकांमध्ये नको. राजा ला आणि इतरांना तेही पटलं. पुढे गुंगे महाराजांनी राजाला इशारा दिला की आपल्याला भुकटी चा जर धंदा करायचा आहे तर गणू कडून भुकटी चे ज्ञान घ्या आणि नंतर गणू ला मारा. नाहीतर तो भुकटी बद्दलचे ज्ञान सर्व सामान्य लोकांपर्यंत पोचते करेन आणि भुकटी ची किंमत कमी होणार. सर्व मंत्री मंडळ, राजा आणि विद्वान लोकं गुंगे महाराज जे सांगत होते त्याला होकार देत होती कारण डोळ्यासमोर खुळखुळणारा पैका दिसत होता.


विद्वान मंडळींनी बाहेरच्या राज्यातल्या पटवलेल्या मंत्र्यांना ही भुकटी विकली. त्यामुळे गणू ची भुकटी काही कामाची नाही अशी वार्ता विद्वान मंडळींनी स्वतः च्या राज्यात म्हणजे भ्रष्टपुरात पसरवली. गणू बिचारा अख्या राज्यात अपमानित झाला . तो वैतागलेल्या अवस्थेत रात्री आकाशा कडे बघत अंगणात झोपून होता. तेवढ्यात, गुंगे महाराज तिथे आले. गुंगे महाराजांच्या हातात तलवार होती. गुंगे महाराज आपल्या घरी आलेले पाहून गणू ला खूप आश्चर्य वाटले.


"तुम्ही इथे कसे?", गणू ने गुंगे महाराजला विचारले.

"शू.... गप्प! आवाज करु नकोस!", चक्क गुंगे महाराज बोलले.

"तुम्हाला बोलता येतं! तुम्ही कोण आहात नेमके! आमच्या राजाचे सल्लागारच आहात ना?", गणू गुंगे महाराजांच्या हातातल्या तलवारी कडे बघत चाचरला.

"हे बघ गणू... मी खरा विवेकपूर राज्याचा हेर आहे! तुमचा राजा भ्रष्ट आहे. आणि तो मूर्ख थोड्या पैश्या करता तुला मारणार आहे. तेव्हा तू लगेच माझ्या सोबत चल. तुझी मी विवेकपूर ला रवानगी करतो. तिथे तू तुझ्या बुद्धी चा प्रयोग करून भरपूर सुखाने राहशील ". गुंगे महाराज एका दमात बोलून गेले.

गणू राज्य सोडून निघून गेला. विवेक पूर राज्यातल्या इतर हेरांनी गुंगे महाराजांच्या सांगण्या वरून गणू ला आपल्या राजा विवेकसिंह कडे रुजू केले . तिथे गणू ने भुकटी वर आणखी प्रयोग केलेत . आता विवेकपूर ला गणू नावाचा एक डोकेबाज वैज्ञानिक मिळाला होता .


गणूने नवीन प्रयोग करून विवेकसिंह ला आणखी एक मोठा शोध लावून दिला. त्याची आता नवीन तयार केलेली भुकटी शस्त्र संसाधनांना गंज चढू देईना. त्याचा परिणाम असा झाला की विवेकपूर ची शस्त्र खूप टीकायला लागली. शस्त्रांचे आयुष्य वाढले. त्या राज्याचा शस्त्रसाठा वाढत गेला. व शस्त्रांवर लागणारा वार्षिक खर्च कमी झाला कारण नवीन शस्त्र तयार करायची गरज कमी भासत होती . जुनीच शस्त्र गणू च्या भुकटी मुळे नवीन सारखी असायची. शस्त्रखर्च आटोक्यात आल्या मुळे पैसा इतर जागी उपयोगी पडायचा . त्यामुळे विवेकपूर श्रीमंत झाले . त्या नवीन भुकटी चे नाव ठेवण्यात आले "गणू शस्त्रभुकटी."


इकडे भ्रष्टसिंह चं आपलं जुनंच पालुपद . लहान सहान भ्रष्ट उपचार करत लाखो कमवायचे आणि आपल्या विद्वान मंडळी समवेत आनंद उपभोगायचा. पण एक बदल झाला होता. भ्रष्टसिंह राजाची मुलं मोठी झालेली होती आणि आता बराचसा राज्य कारभार भ्रष्टसिंह ची मुलं स्वतः बघायला लागली होती. त्यात, भरुंगराज नावाचा एक राजपूत्र राजाच्या भ्रष्ट मंडळीच्या वाईट संगतीत फसला होता. गुंगे महाराज सर्वांच्या नकळत, नेहमी प्रमाणे,शांत पणे भ्रष्टपूर ला आतून पोखरत होता.


गुंगे महाराज च्या नजरेतून राजपूत्र भरुंगराज च्या वाईट चालीरीती सुटल्या नाहीत. त्याने भरुंगराज ला फीतवले आणि श्रीमंत विवेक सिंह राजासोबत संधी करायला सांगितले. भरुंगराज राजपूत्राला गुंगे महाराज चे म्हणणे पटले आणि तो चुपचाप रवाना झाला विवेकपूरकडे. विवेकपूर मंत्रीमंडळ भरुंगराज ची वाट बघत थांबलेले होतेच. विवेकपूर मंत्रीमंडळात, गणू आता मोठा वैज्ञानिक म्हणून नियुक्त झालेला होता.

 गणूने आता त्याने तयार केलेल्या 'गणूशस्त्र भुकटी' वरती 'उलटे' प्रयोग केले होते. ही नवीन उलटवलेली भुकटी काही वेळातच शस्त्र साठ्या ला गंजवून टाकण्यात सक्षम झालेली होती . त्या नवीन भुकटीला नाव देण्यात आले, "गणू-निशस्त्र भुकटी."


भ्रष्टपूरचा राजपूत्र विवेकपूरला पोचला. गुप्त खलबतं झाली. विवेकसिंहने भरुंगराजला भ्रष्टपूर चा राजा करेन अशी ग्वाही दिली. मात्र अट एकच होती की त्याला गुंगे महाराजचे ऐकावे लागेल. भरुंग राज ने ते मान्य केले. मग गणूने "गणूशस्त्र भुकटी" चे प्रयोग राजपूत्र भरुंगराज ला दाखवले. काही क्षणात सगळी शस्त्र चमकायला लागली. नंतर गणूने एक पुडका भरुंगराज च्या हाती दिला आणि म्हणाला ह्या पुढक्यातील भुकटी राजपूत्र भरुंग ने भ्रष्टपूर च्या शस्त्रगारात शिंपाडावी. राजपूत्र भरुंगने "गणू शस्त्रभुकटी"चा कमाल स्वतःच्या डोळ्यादेखत बघितला होता. ते पुडके घेऊन तो भ्रष्टपूरला परतला. गुंगे महाराज त्याला आग्रह करु लागलेत की भरुंग ने ते आणलेले पूडके भ्रष्टपूर च्या शास्त्रगारावर शिंपडावे.


गुंगे महाराज इशाऱ्यांनी भरुंग ला समजावण्यात यशस्वी झालेत की, जर का उद्या भरुंग ला भ्रष्टपूरचा राजा व्हायचे आहे तर जरुरी आहे की भ्रष्टपूर चे शस्त्र सुद्धा विवेकपूर सारखे सक्षम असावयास हवे. शेजारी राज्य जर बळहीन असेन तर विवेकपूर चा राजा का म्हणून भरुंग ला राजा बनायला मदत करेन? भरुंग ला गुंगे महाराज चे म्हणणे पटले. भरुंग ने स्वतःच्या राज्याच्या शस्त्र साठ्यावर गणू ने दिलेल्या पुडक्यातील भुकटी शिंपडली! त्याला नव्हते माहीत की ही भुकटी गणू ने नव्याने तयार केलेली " गणू-निशस्त्र भुकटी " आहे म्हणून!


भ्रष्टपूरचा सर्व शस्त्र साठा काही दिवसात त्या भुकटी ने गंजवून टाकला. त्या गोंधळात विवेकसिंह ने भ्रष्टपूर वर स्वारी केली आणि पूर्ण राज्य स्वतःच्या हातात घेतले. भरुंग राज ला मात्र काहीच मिळाले नाही, त्या उलट भ्रष्टसिंह राजाच्या संपूर्ण घराला, राजपूत्र भरुंग राज सकट विवेकसिंह ने तुरुंगात टाकले.


विवेक सिंह शेवटी भ्रष्ट सिंहला म्हणाला, "वेड्या, रडतो काय! तू तर तुझे राज्य भ्रष्ट कारवायांच्या हवाली फार आधीच केले होते. तुझे स्वातंत्र्य तू तेव्हाच गमावले होतेस. त्यात तू खूप आधी बंदिस्त झाला होतास. त्या अदृश्य सळाखा होत्या ज्याच्यात तुझी विवेकबुद्धी बंदिस्त होती.आता तर फक्त खऱ्या लोखंडी सळाखा तेवढ्या तुझ्या करता उभ्या केल्या आहेत! "


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy