Jyoti gosavi

Tragedy

2  

Jyoti gosavi

Tragedy

लहान मुलांचे शोषण एक सामाजिक स

लहान मुलांचे शोषण एक सामाजिक स

2 mins
995


 आपल्या देशासमोर किंबहुना जगाच्या समोरच अनेक सामाजिक समस्या आहेत. त्यामध्ये प्लास्टिक आहे, पर्यावरण आहे, पाणी समस्या, गरीबी ,दुष्काळ आणि अनेक .परंतु अशी अजून एक जी समस्या आहे. child abusing आज या समस्येला मी हात घालायचे ठरवले आहे. हा एक मोठा सामाजिक विषय आहे.

खरे तर मुले ही देवाघरची फुले म्हणतात म्हणजे जसा आपण फुलांना जपतो ,तसंच आपण मुलांना जपायला पाहिजे .

सर्व समस्यांपासून, आजारांपासून, रोगांपासून ,ते इतर बाहेरील जगापासून सुद्धा.

 मुलांच्या आजारांविषयी बरीच जनजागृती झालेली आहे त्यासाठी मिळणारे लसीकरण सरकारी दवाखान्यात मोफत मिळते व लोक त्याचा फायदा घेतात.


Child abusing अशी समस्या आहे जी बराच वेळा पालकांच्या लक्षात येत नाही तुमचे मूल तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते .पण तुम्हाला ते समजत नाही आणि या समस्येमध्ये 80 टक्के घटना घरातच घडत असतात. काका ,दादा मामा ,बाजूचा काका, बाजूचा मामा, इतकेच काय पण कधीकधी मुलीचे वडील किंवा आजोबा सुध्दा त्यांचा फायदा घेऊन मुलीशी प्रताडणा करतात. अशावेळी शहानिशा केल्याशिवाय त्या व्यक्तीवर आरोप देखील ठेवता येत नाही

आमच्या नात्यातील एक मुलगी आहे, तिला पहिली मुलगी आहे. दुसरा चान्स घेण्यासाठी तिने खूप बोलकी समस्या मांडली ती म्हणाली "मला मुलगा होवो, मुलगी होवो, काही होवो त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही परंतु जर मुलगी झाली सगळ्या जग दुनियेमध्ये दोन-दोन मुलींचे संरक्षण मी कसे काय करू? एक आता कुठे मोठी झाली, तिच्यासाठी मी चार वर्षे माझं करिअर सोडलं. दुसरी तर मुलगी झाली तर पुन्हा चार वर्षे घरात बसून मला परवडणार नाही.

काही पालक समाजातील या विकृतीमुळे मुल जन्माला घालायला घाबरतात .ही समस्या फक्त मुलींबाबत नसून छोट्या मुलां बाबत देखील आहे .

 child abusing रस्त्यावर राहणारी, रोडवर झोपणारे, हॉटेलमध्ये काम करणारी किंवा कोणत्याही ठिकाणी जिथं त्यांना कोणी वाली नाही किंवा जी मुलं कमकुवत आहेत अशा मुलांबाबत ही समस्या उद्भवते. अशा मुलांना गोड बोलून ,धाकदपटशा दाखवून, खाऊ देण्याच्या आमिषाने अशा गोष्टी केल्या जातात मी तर एका हॉस्पिटलमध्ये मोठा रुग्ण छोट्या छोट्या मुलांची काळजी घ्यायचा नंतर त्यालाच आम्ही mentally retarded मुलाबाबत असं वागताना पकडलं होतं

आजकाल माणूस माणसाला ओळखत नाही म्हणतात ना कलियुगात माणसे जनावरांप्रमाणे वागतील व पाच वर्षाची कन्या भ्रतार मागेल एकतर टीव्ही मोबाईल कॉम्प्युटर सोशल मीडिया या साऱ्या गोष्टींमुळे मुलांमधली निरागसता केव्हाच संपवली आहे .त्यांना नको त्या वयात ,नको ते कळतं पण परिणाम समजत नाही .अशावेळी आपल्या घरातील मुला-मुलींना या गोष्टींबाबत आपण सजग केलं पाहिजे.

याबाबत लहान मुलांना कसं काउन्सलिंग करायचं ,यासाठी आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो अत्यंत उपयोगी आहे.

मुलांना व स्पेशली मुलींना आधीच समजावून सांगायचं की, कोणता एक काका, मामा, दादा यांच्याबरोबर एकटच जायचं नाही .त्यांनी दिलेलं चॉकलेट, आईस्क्रीम, खायचं नाही त्यांना आपल्या प्रायव्हेट पार्ट ला हात लावू द्यायचा नाही. पप्पी घेऊ द्यायची नाही .काही वाटलं काही त्रास झाला तर लगेच येऊन आपल्या आई-वडिलांना सांगायचं.

शाळेमध्ये शिपाई, गाडीचा ड्रायव्हर ,टीचर या सर्वांपासून देखील अशा बाबतीत लांब राहायचं कारण वरून सभ्य दिसणारी मंडळी पण त्यांच्या मनात काय आहे ते कोणी सांगू शकत नाही यामध्ये जनजागृती मुलांचे कौन्सिलिंग हाच उपाय आहे


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy