लग्नाचा वर्धापन दिन
लग्नाचा वर्धापन दिन




विधूर प्रदीप प्रधान आपल्या आयुष्यातील संध्याकाळ एकटेच घालवत होते. वंदना आणि प्रदीप या दोघांनी बरीच वर्ष एकत्र घालवली. तीची कमतरता त्यांना आता खुप भासत होती. दोन वर्षापुर्वी त्यांची बायको वारली. त्याना ती गेल्यापासुन काहीतरी हरवल्या सारख वाटत होत. त्यांना आपल्या बायकोने बनवलेले सर्वच आव़डायच . विशेषतः कोंबडी करी तिच्यासारखी चिकनकारी अगदी तीच करायची . खूप दिवसांपासून चिकनकारी खाण्याचा विचार मनांत आला ,पण आता सांगणार कुणाला ? जेव्हा सुनेने स्वताहून विचारलं तेव्हा त्यांना नकार देताही आला नाही.
प्रदीपना हे माहित होते की आज, त्यांच्या मुलाच्या लग्नाचा वर्धापनदिन आहे, त्याचा मुलगा नंदीश आणि सून शैलजाका यांनी बाहेर जाऊन जेवायचं हे आधीच ठरवल होत. त्याची काटकसरीने घर चालवणार्या सूनेने दुपारचे जेवण बनवून गप्प बसली. त्याच्या कार्यक्रमात रात्रीच्या जेवणाचा समावेश होता. पण सासर्याच्या जेवणाच तिला भानच राहिल नाही . मुलाचा फोन येताच सूनबाई नटुन-थटुन बाहेर आली आणि जाताना इतकी म्हणाली, " बाबा, बाळ पाळण्यात झोपला आहे, जरा बघा. नंदीशचा फोन आला, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांनी मला फोन करुन बाहेर बोलावल आहे. तुम्हाला काही तरी हवे असेल तर सांगा ,आम्ही घरी येताना घेऊन येऊ." प्रधानजी म्हणाले“ ठीक आहे सूनबाई, येताना माझ्यासाठी चिकनकरी आणि पाव घेऊन ये. ”“ ठीक आहे, बाबा ” म्हणुन ती बाहेर आली आणि रिक्षाने रॉक्सी थियेटरकडे गेली. नंदीश तिथे 6 ते 9 ची तिकीट देघुन बायकोची वाट पाहत उभा होता.
काही वेळाने बाळाचा आवाज ऐकू आला. ते जागे झाले आहेत हे पहाण्यासाठी धावत धावत बाळाकडे गेले. त्याला उचलुन घेतले सुनेने पाळण्याजवळील ठेवलेली दुधाची बाटली उचलुन . बाळाला दूध पाजले .नंतर त्यांनी बाळाला खांद्यावर घोऊन हळु हळु अलगत हाताने धोपटु लागले. काही वेळाने बाळ पुन्हा झोपी गेले . त्याला पाळण्यात पुन्हा झोपवून, ते हॉलमध्ये आले आणि आरामात बसले. टीव्हीवरील बातम्या पाहण्यात काही वेळ घालवला. त्यांना वाटले की मुलगा व सून काही खरेदी करतील, खाऊन परत एक ते दोन तासांत परत येतील, चार तास झाले पण ते परत आले नाहीत. ते आता येतील याची वाट पहात राहिले. त्यांना पिच्चरबद्दल काही सांगितले गेले नाही. त्यांना याची कल्पना पण नव्हती.
हे दोघे जगाचं विसरुन बसले आणि ते स्वतःच्या मजेत मस्त होते ,पिच्चर पाहून झाल्यावर हॉल मधून बाहेर पडले. आता त्यांनी मॉलमधे खरेदी सुरू केली. जोडप्यासाठी लग्नाच्या वर्धापनदिनंच्या भेटवस्तू ही खरेदी. त्यांच्या आवडत्या वस्तूंसाठी संपूर्ण मॉल स्क्रॉल केले आणि नंतर या जोडप्यांना गिफ्ट देण्यास काहीतरी आवडले. तत्याची खरेदी केली .आतापर्यंत त्यांना खूप भूक लागली होती. दोघेही फाइव्हस्टार हॉटेलमध्ये जातात. दोघे छान आप-आपल्या आवडीचे डीश मागवुन जेवले. सुनबाई आपल्याच तंद्रीत होती.
प्रदीप यांनाही घरी खूप भूक लागली होती. साडेअकरा वाजले होते. ते दोघे अजून आले नाहीत.भक त्यांना आता सहन होईनाशी झाली . त्यांनी चिकन करीची वाट पहायच सोडुन . घरात असलेल्या जेवणावर वेळ काढायचा विचार करत ते स्वयंपाकघरात आले. दुपारच काही शिल्लक राहीलं असेल . पण प्लॅटफॉर्म अगदी स्वच्छ होता. गॅसच्या चुलीवर काही नव्हते. म्हणून फ्रीज उघडला तेव्हा काही ही दिसले नाही. खुप शोधल्यावर त्यांना एका कवर मध्ये काही स्लाईसचे तुकडे दिसले. त्यांना विचार पडला की आता कश्यावरोबर खाणार ? जॅमची बाटली पण रिकामी होती. त्याला वाटले की कॉफी बरोबर ब्रेड खाऊ या. पण दुधाच्या भांडयात दूध नव्हते. , सूनबाईची काटकसर पाहुन ते आश्चर्यचकित झाले. आता वंदनाची कमतरता आणखी भासू लागली. त्यावेळी अशा प्रकारच्या समस्यांचा त्यांना कधीही सामना करावा लागला नाही. कधीकधी विनोदाने तीला छेडण्यासाठी काही तरी चुक काढण्याची चेष्ठा केली जात होती, परंतु मनपासून ते कधीच काही बोलत नव्हते. मग ती रुसायची आणि ते तिला पटवून घ्यायचे. असा सर्व विचार करीत होते. बाळाच्या रडण्याचा आवाज आला त्यांना त्याच्याकडे जाण्यास भाग पडले.. तिथे जाऊन पाहिले तरबाळ बेडवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होता. ते धावत गेले आणि बाळाला उचलल्यानंतर त्याला थोडे पाणी दिले. मग थोडा वेळ फिरवल्यानंतर तेही कंटाळल आणि आराम खुर्चीवर बसले. बाळाला आपल्या छातीवर थोपटत-थोपटत बाळाबरोबर ते पण उपाशीच झोपी गेले .