Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Anuja Dhariya-Sheth

Inspirational


4.5  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational


लेकीने बनवले "सुपरमाॅम"...

लेकीने बनवले "सुपरमाॅम"...

5 mins 121 5 mins 121

मावशी... तू ना मला खूप आवडतेस.. किती मस्त एन्जॉय करतेस तुझे लाइफ तू.. नोकरी करतेस..तुझी आवड जपतेस.. घरात पण किती छान छान वस्तू करतेस? तुमच्या घरी आले ना कि मला जावंसं वाटतच नाही बघ.. हि बाग.. झोपाळा.. अंगण खूप मस्त वाट्त.. मावशीकडे राहायला आलेली सिद्धी मावशीचे खूप कौतुक करत होती.. तू खरच सुपर मॉम आहेस.. नाहीतर माझी आई..


सिद्धीचे हे बोलणे ऐकून वर्षा मावशी म्हणाली काय बोलतेस सिद्धी? ...


काही नाही ग सोड... मावशी तू आई पेक्षा मोठी आहेस ना तरी पण तू इतकी यंग.. इतकी फ्रेश कशी राहतेस.. माझ्या आईला सांग ना.. आई बघ ना किती काकूबाई राहते.. मला आणि बाबांना तिच्या सोबत जायला कससेच होते बघ... १५ वर्षाची सिद्धी आपल्या बहिणीला वैशूला असे काही बोलते ऐकून वर्षाला खूप वाईट वाटले... वैशूचे डोळे भरून आले...


वैशू, अगं सिद्धी अशी काय बोलते? वर्षाने काळजीने विचारले...

अगं ताई काही विचारू नको.. हे असे बोलतात त्यामुळे सिद्धी पण.. वैशू म्हणाली..

वैशूचा स्वभाव लहान असल्या पासूनच असा होता.. तिला कोणाला नाही म्हणण जमतच नसे.. सासरी याच स्वभावाचा गैरफायदा घेतला गेला.. नवरा, सासू आणि आता मुलगी पण.. घरातले प्रत्येक काम तिने केले पाहिजे असा आग्रह असायचा त्यांचा.. त्यात आता लॉक डाउन पासून तर हे दोघ बाप-लेक घरात त्यांना वाटायचं ऑनलाईन काम करतात अभ्यास करतात म्हणजे किती दमतात घरातले कामं कधी त्यांना दिसलीच नाहीत..

वर्षा म्हणाली, वैशू बसं आता.. स्वभाव बदल.. अशाने तुझे अस्तित्व तें काय? मी तूला किती वेळा बोलले.. नाही म्हणायला शिक.. आता तूला सर्व गॄहीत धरतायत.. बरं आता मी सांगतें तें ऐक.. तू आजच्या आज आपल्या घरी जा.. विनोदला मी कळवते.. तो तूला न्यायला येईल स्टॉपवर...


अगं ताई का पण?... वैशू

मी सांगते म्हणून.. वर्षा जोरातच रागाने म्हणाली.. सिद्धीला आठ दिवस इथेच राहूं दे.. अनुप आणि अक्षताचे वागण बघून तिच्यात बदल होईल..

स्वभावाप्रमाणे ती नाही म्हणू शकली नाही.. अन् वैशू सिद्धीला काहीच न सांगता भावाकडे गेली..

दुसऱ्या दिवशी सिद्धी उठली.. आई... आई.. जोरात हाक मारत होती..

किचन मध्ये बघितलं तर काय अक्षू चहा करत होती.. तिने सांगितल आग मावशीला मामानी बोलावलं काम आहे काहीतरी...

तूला चहा हवायं का सिद्धी?... अक्षता

ताई मला कॉफी हवे.. सिद्धी

ओके.. अक्षता

हे काय ताई? तू करतेस चहा, कॉफी? मावशी कुठे गेली.. सिद्धी


आई ना.. सकाळी योगाला जाते.. बाबा येतील आता वॉकला गेलेत.. त्यामुळे हि माझी ड्युटी... अनुप तुझे दूध घे... अक्षताने आवाज दिला...


आलो ताई... अनुप म्हणाला..


दादा हे काय किती घाम आलाय तूला...? सिद्धी


हो आग सकाळी सकाळी पूर्ण बाग साफ़ करतो.. म्हणजे घाण नसते काही जास्त.. थोडीफार साफसफाई झाली की झाडांना पाणी घालतो.. फुले काढून आणतो.. अनुप सांगत होता..

तेवढ्यात काका आलेले बघून तिने अक्षताला आवाज दिला..

हॅलो काका, गुड मॉर्निंग.. सिद्धी म्हणाली..

गुड मॉर्निंग बेटा.. काका म्हणाले..

काका कॉफी आणते, मी पण थांबले तुम्ही येताय म्हणून.. असे म्हणत सिद्धी कॉफी आणायला गेली.. तोपर्यंत काका आत आले, हाताने पाणी घेऊन प्यायले.. सिद्धीला आपले बाबा आठवतात.. घरात हि सर्व काम आईच करते.. हे तिला आठवते..


तेवढ्यात मावशी येते.. काका मावशीला कॉफी देतात.. नंतर सर्व आवारायला जातात.. सिद्धी मात्र विचारात हरवली असते.. मावशी आवरून किचनमध्ये येते तरी सिद्धी तिथेच असते..

सिद्धी तूला काही हवंय का?... मावशी

नको मावशी.. सिद्धी

काका अंघोळ करून येतात मावशी पूजेची तयारी देते, दादाने आणलेली फुले, मावशीने दिलेली तयारी घेऊन काका अगदी मनापासून पूजा करतात.. घरातले हसत-खेळत वातावरण बघून सिद्धीला आपल्या घरात रोज सकाळी असणार चिडके, रागाचे वातावरण आठवते.. तिची चूक समजत असते.. मावशी सर्वांना नाश्ता, डबा बनवते.. ताई येऊन तिला नाश्ता वाढण्यास मदत करते सर्व एकत्र खातात गप्पा मारतात.. सिद्धीला खूप छान फ्रेश वाट्त असते.. आपल्याकडे आई एकटीच जेवते हे तिला आठवते..


आठ दिवसात बर्याच गोष्टी ती बघते आणि त्यातून तिला सर्व चुक समजते..

दोन दिवस झाले, सिद्धी तू शांत आहेस... काय झालं? मावशीने विचारल...

तसे मात्र सिद्धीचा बांध फुटला... मावशीच्य‌ा गळ्यात पडून ती खूप रडली... मावशी मला आईची आठवण येते ग.. तूला काका, ताई, दादा किती मदत करतात.. म्हणुन तू बरच काही करू शकतेस.. आम्ही काहीच मदत करत नाही ग.. म्हणजे लहान असल्या पासून मी जे बघते तसेच वागले.. मला आता माझी चूक समजते.. आता आईला मी बदलवेन नुसती कामात नाही तर तीच्या सर्व आवडी-निवडीत मी तिची मदत करेन आणि तिला सगळ्या गोष्टीत खर्या अर्थाने सुपर मॉम बनवेन..


मावशी हसुन म्हणाली, वेडा बाई रडू नको.. तूला चूक समजली हेच खूप आहे.. तुझ्या आईला मेहंदी, रांगोळी खूप आवडते.. आपण तिला तेच परत चालु करायला सांगू... सिद्धीला मावशीची आयडिया आवडते, आईला फोन करून सॉरी बोलते, घरी आल्यावर आईला प्रत्येक कामांत मदत करते.. हट्ट करून मेहंदी, रांगोळी यांची परत सुरुवात करायला सांगितली..

लेकीमधला हा बदल बघून वैशूला खूप आनंद झाला..

सोशल मिडियावर तीने तीच्या रांगोळी, मेहंदी.. यांचे फोटो टाकले.. लोकं ऑर्डर साठी विचारू लागले तेव्हा सिद्धीने पुढाकार घेऊन घरात विषय काढला आणि आपल्या आईसाठी ती खंबीरपणे उभी राहिली... वर्षा मावशी सोबत फोनवर बोलताना आता ती आईचे खूप कौतुक करायची.. वैशू मुळात हळवी.. आपल्या लेकीच्यात हा बदल पाहून ती आनंदाने रडायची... खुश व्हायची..


सिद्धीच्या कॉलेज मध्ये एकदा पालकांसाठी स्पर्धा होती.. तिने वैशूचे नाव दिले आणि जेव्हा वैशू ती कूकिंग स्पर्धा जिंकली तेव्हा सर्व कॉलेज समोर तिने वैशूचे खूप कौतुक केले..

मुलांना घडवताना साम,दाम,दंड याचा करते ती वापर...

तेव्हा ती ठरते आई हिटलर.....

तेवढेच करते लाड आणि जोडीला पुरवते हट्ट.....

मोठे झाल्यावर समजतात तिने केलेले कष्ट.....

प्रेम, संस्कार, शिस्त याची घालून सांगड.....

बनवून देते आयुष्य सुखकर....

तेव्हा मिळते तिला एक नाम ते म्हणजेच "सुपरमाॅम".

माझी आई "सुपरमॉम" आहेच असे म्हणत विनींग क्राऊन तिला घातला...


खरच प्रत्येक मॉम सुपर मॉम असते....

हा पण त्याला घरच्यांची साथ नक्कीच महत्वाची असते..मतरंच ती सुपर वुमेन पण होऊ शकते.... पण घरातले काम करण्यासाठी नाही तर स्वतःला वेळ देऊन, स्वतःचे छंद जोपासून, तिच्या आवडीच्या कामात तिला सुपर वुमेन होऊ द्यायला हवे.. असे सिद्धीने सर्वांना सांगितले.. जोरात टाळ्या वाजल्या सर्वांनी दोघी मायलेकींचे कौतुक केले.. वर्षा मावशी तुझ्या मुळेच हे शक्य झाले ग.. असे म्हणतं सिद्धीने मावशीला स्टेजवरून धावत जाऊन मिठी मारली..

कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

 

 अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.  सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.Rate this content
Log in

More marathi story from Anuja Dhariya-Sheth

Similar marathi story from Inspirational