Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

कुटुंब कलह

कुटुंब कलह

5 mins
347


          एका छोट्याशा शहरातील तरुण नौकरी साठी मोठ्या शहरात नौकरी करण्यासाठी आला व तो एका आवासिय कॉलोनीत राहत होता. नविन –नविन नौकरी असल्यामुळे त्याला स्वतःचे क्वार्टर मिळाले नव्हते. तो एका वरिष्ठ कर्मच्याराच्या क्वार्टर मध्ये त्यांच्या सोबत किरायाने राहत असे. तो वरिष्ठ कर्मच्यारी पण एकटाच राहत होता. त्याचे कुटुंब आंध्रप्रदेश मध्ये आपल्या वडिलोपार्जीत गांवी राहत होते. समोर मुलांना भाषेचा त्रास व संपत्तिचे नुकसान होवु नये म्हणुन त्यांनी आपले कुटुंब तीथेच ठेवले होते.त्यांच्या शेजारी एक अजुन कुटुंब राहत होते. ती दोन्ही कॉर्टरे एका-मेकाला जोडली होती.त्या कुटुंबात पति-पत्नि आणी त्यांचे दोन गोंडस मुले होती. आजु-बाजुला सोबत राहत असल्यामुळे त्यांचे घनिष्ठ संबंध बनले होते. संबंध प्रस्थापित झाल्यामुळे नेहमीच एका-मेकांशी बोलने-चालने व गंमती होत होत्या. तरुण वयाने खुपच लहान असल्यामुळे तो शेजा-याला भाऊ आणी त्यांच्या पत्निला वहिणी म्हणुन बोला-चाली करत असे. नंतर काही दिवसा नंतर माहित पडले की त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. तसे पति-पत्निचे संबंध मधुरच होते. राजा-राणीचा संसार सुरळीतच चालत असे. पण मधे-मधे त्यांच्यात काही वाद –विवाद होत होते. त्यांच्या प्रेम प्रकरणाची वास्तविक कुंडली एके दिवसी, माझ्या अनुभागच्या वरिष्ठ सहकर्मिने आमच्या अनुभागाला सांगितली होती. ते म्हणाले अरे, कसला त्यांचा प्रेम-विवाह होता. तो तर आ बैल मुझे मार वाला विवाह होता. त्यांनी भाऊंचे पितळ उघडे पाडले होते. 


      काही वर्षा पूर्वी भाउ आपल्या आई-वडिला सोबत आवासिय कॉलोनी मध्येच राहत होते. त्यांच्या बहिणीचे लग्न झाले होते.लग्ना नंतर पहिल्या बाळांतपणाला त्यांची बहिन आली होती.तशी प्रथा आहे. आई म्हातारी असल्यामुळे त्यांच्या नात्यातील एक तरुण अविवाहित मुलगी मदतीसाठी सोबत राहत होती. ती जरी रंगाने फार गोरी नव्हती. साधारण निम्म गोरा रंग तीला प्रकृतिने दिला होता .ती नाक-नकशे ने एकदम सुट-सुटित आणी भार-दार बांध्याची व दिसायला आकर्षक होती. बहुतेक आर्थीक परिस्थिति चांगली नव्हती. ती आईला व ताईला घर कामात मदत करित होती. त्यामुळे त्या तरुणीचा संबंध भाऊशी आला होता. दोघेही तरुण असल्यामुळे ते कदाचित एकमेकाच्या पहिल्या प्रेमात पडले होते. हळु-हळु प्रेम वाढतच गेले असावे.


       तरुणी जास्त शिकली नव्हती.पन घर कामात व व्यवहारत हुशार होती. भाउंचे हाव-भाव पाहुन तीने त्यांच्या मनातील गोष्ट ताडली होती. भाऊ पाण पाहायला ठिक-ठाकच होते. वरुण त्यांना सरकारी नौकरी व एकटाच मुलगा.म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबडीच. त्यामुळे तीला भाऊ म्हणजे स्वपनातील राजकुमार नक्कीच वाटत होता. डुकराच्या धन्याला गाढवाचे कौतुक नेहमीच असते. तीने भाउच्या आई व ताईची त्या कठिन परिस्थिति मध्ये खुपच सेवा केली होती. तीच्या सेवाभावामुळे आई व ताई फार भारावुन गेल्या होत्या. काखेत आहे कळसा मग कशाला विनाकरण गांवाला वळसा ?. आई-वडिलांचे काहीच बंधन नसल्यामुळे ते दोघेही मिळुन-मिसळुन राहत होते. क्दाचित तीला आपली सुन म्हणुन मनाशी आईने ठरविले होते. उताविळ नवरा अन गुडघ्याला बाशिंग. एकाच घरात राहत असल्यामुळे ती नंतर गर्भवती झाली होती. नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न. ही गोष्ट तीने भाऊला सांगितली होती.पण भाऊंनी त्या गोष्टी कडे दुर्लक्ष केले होते.ताईंना एक बाळ पण झाला होता. व नंतर ती सासरी निघुन गेली होती. तरुणी पण आपल्या घरी गेली होती. 


    आलीया भोगाशी असावे सादर. काही दिवसा नंतर तरुणी कडिल मंडळी भाऊ कडे आली होती.व हे सर्व प्रकरण त्यांनी भाऊच्या आई-वडिलांना सांगितले व आता लवकरच त्यांचे लग्न लावुन देने आवश्यक आहे असी सुचना त्यांनी दिली होती. जेव्हा हा प्रस्ताव भाऊ समोर ठेवला गेला होता, तेव्हा ते लग्नासाठी टालोम-टोल करत होते. आली आंगावर तर घेतली सिंगावर. शेवटी मुलीकडल्या मंडळीनी व काही समाजातील प्रतिष्ठित लोकांनी पुढाकार घेवुन त्यांचे लग्न आपल्या पध्दतिने लावुन दिले होते. कदाचित या प्रसंगामुळे वहिणीच्या मनात जे जुन प्रेम होते ते आटले होते.त्यांच्या भावनांना भयंकर ठेच लागली होती.प्रेम संबंधात अविश्वासाची व घृनेची ठिणगी पडली होती. याचा ठ्सा वहिणीच्या मनावर आणी त्यांच्या गर्भात वाढणा-या बाळावर पण झाला होता. अडला नारायण गाढवाचे पाय धरी. भाऊच्या मनाविरुध्द पण ही गोष्ट झाली होती.पण सामाजीक प्रभावामुळे ते चुप झाले होते. तिरस्काराची गाठ दोघांच्या मनात पडली होती. त्यामुळे मधे-मधे काही कारणास्तव त्यांच्या मधे तंटे होत होते. पण ते वादळी पावसा सारखे येत-जात,सिमित होते. प्रत्येक घरीच मातीच्या जुली असतात. भांडण हे पति-पत्निचे एक सुखी संसाराचे व्यंजन आहे असे घरचे व समाजातिल वडिल मंडळी व मित्र मंडळी थट्टा करतांना सांगतात. भाऊंचे दोन्ही मुले आता मोठी होनुन शाळेत जायला लागली होती.त्यांचा छोटा आणी सुखी संसार होता. दुरुन डोंगर साजरे. भाऊंच्या व्यवहाराचा वहिणी गर्भवती असतांना त्यांच्या व बाळाच्या मनावर चुकिचा ठसा कायमचा ऊमटला होता. त्याचे दुःख कदाचित वहिणींना जेव्हा कधी त्यांच्या मधे वाद निर्माण झाला की क्दाचित त्या दुःखाची सारखी उजळणी होत असावी. म्हातारी मेल्याचे दुःख नव्हते पण काळ सोकावत होता. मुलांच्या भविष्यासाठी कदाचित वहिणी काणा-डोळा करत होत्या. कोल्हा काकडीला राजी. आणी सर्व विसरुन आपल्या सुखी संसारात रमत होत्या. मुले मोठे झाल्यावर, भाऊंचे घरात फारसे चालत नव्हते. संसाराची गाडी आता बरेच लांब पोहचली होती. तिचे आपल्या गंतव्य स्थानावर पोहचने हे जवळ-जवळ निश्चितच झाले होते. भाऊ या गाडिचे चालक असल्यामुळे त्यांना ही गाडी आपल्या गंतव्य स्थानावर पोहचवनेचं होते. आता त्यांच्या जवळ काही दुसरा मार्ग उरला नव्हता. पण भाऊंच्या मनात जी दरी किंवा खाई पडली होती. ती कदाचित सारखी खोल रुंदावत असावी. आपालेच ओठ व आपले दात ,त्यामुळे त्यांना आपण कुठे तरी चुकलो याचा सारखा भास होत होता. तेच त्यांच्या दुःखाचे व नाराजीचे मुळ कारण असावे. तुझे माझे जमे ना अन तुझ्या शिवाय करमेना अशी परिस्थिति भाऊ व वहिंणीची झाली होते.


         जसे करावे तसे भोगावे, एक दिवस भाऊ घरी असतांना फार गंभीर विचारात होते. कदाचित वहिणी सोबत काही शिलक कारणावुन वाद्विवाद झाला असावा. संध्याकाळी जेवनाला उशिर होता आहे, हे पाहुन भाऊ घरुन वेळ घालवण्यासाठी आवासिय कॉलोनीच्या बाहेर पडले होते. त्यांच्या सोबत कोणीच नव्हते. फिरता-फिरत व कोण्यात्या तरी विचारात ते हाईवेला जावुन भिडले होते. हाईवे वर अंधार होता. तरी भाऊ त्या हाईवेनी फिरायला लागले होते. अंधारात भाऊंना एक ट्रकने धडक दिली. व भाऊ तिथेच अंधारात रस्त्याच्या एका बाजुला पडुन राहिले होते. मध्यरात्री पोलिसंच्या पेट्रोलिंगच्या वेळेस ते झळकले होते. पोलिसांनी त्याची संपूर्ण तपासणी केली होती. त्यांच्या जवळ ओळख मिळेल असे काहीच पुलिसांना सापडले नाही. ते कोण आहे ? याचा काहिच सुगावा लागला नाही. शेवटी पुलिसांनी ते शव मेडिकला नेले होते. तीथे त्यांना, भाऊचा मृत्यु झाल्याचे सांगितले होते.व ते शव मुर्दाघरात ठेवण्यात आले होते.


        इकडे घरी त्यांची सर्वजन वाट बघत होते. मगा बराच उशिर झाल्यामुळे घरच्या व आजु-बाजुच्या शेजारांना आता चिंता वाटु लागली होती. त्यामुळे त्यांचा शोध घेने सुरु झाले होते. त्यांच्या सर्व मित्रांना आणी नाते-वाईकांना याची सुचना करण्यात आली होती. पण भाऊ कुठेच उपलब्ध नव्हते. कदाचित ते रागाच्या भरात आपल्या बहिनी कडे जवळच्या गांवीच गेले असावे असे गृहित धरल्या गेले होते. व उद्या कामा वर जाण्यासाठी सकाळी येतील असे सर्वांना वाटत होते. पण भाऊ दुस-या दिवशी पण आले नव्हते. त्यामुळे याची तकरार पुलिस स्टेशनला करण्यात आली होती. काखेत कळसा व गांवाला वळसा. तकारारी वरिल माहिती वाचल्या वर पुलिस खात्याने सबंधीत लोकांना सांगितले कि एक शव परवा रात्रा हाईवेने मिळाले आहे. त्याची तुम्ही मेडिकलला जावुन शिनाक्त करुन घ्यावी. नंतर आम्हाला पुढचा तपास करायला सोयीस्कर होईल !. तेव्हा त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी मेडिकला गेले होते. त्यांना शव दाखवण्यात आले. ते शव भाऊंचे होते याची खात्री पटली होती. व नंतर प्रेताला ताब्यात घेवुन त्यांचा विधिवत अंतिम संस्कार करण्यात आला होता.एक सुखी संसार छोट्याशा शिलक कारणा वरुन कसा सुरळीत दिसणा-या धावा पट्टी वरुन खाली घसरतो.व आश्रीतांचे जीवन कसे उधळले जाते !


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy