The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Tejashree Pawar

Tragedy

3  

Tejashree Pawar

Tragedy

कुमार

कुमार

4 mins
15.4K


संध्याकाळची वेळ होती. कुमार मागच्या आवरत शांत बसला होता. उद्या त्याची रिमांड होमी मधून सुटका होणार होती. गेल्या पाच वर्षात त्याच्यात बराच बदल झाला होता. आता तो शांत, समजूतदार, विचारी बनला होता. या पाच वर्षात तो लिहायला वाचायला देखील शिकला होता. इथून बाहेर पडल्यावर कहीतरी काम करायचा, नव्याने आयुष्य सुरु करायचे हे ठरले होते; परंतु ह्या सगळ्या सोबतच तिलाही शोधायचा, आपली सगळी स्वप्ने पूर्ण करायची हे मात्र तितकंच पक्क होतं.

ती म्हणजे कुमारची गौरी. कुठे असें ती, अवस्थेत असें , हे विचार त्याला नेहमीच हैराण करून सोडत. तिची आठवण आली आणि भूतकाळाच्या सर्वच आठवणी ताज्या झाल्या. 'कल्याणी नगर 'ची ती झोपडपट्टी, कुमार गौरी सारखीच कितीतरी मुले, सलीम शेठ आणि असे खूप काही...... रोज पहाटे शिव्या खात उठायचा, जे काही पिशवीत देतील ते घ्यायचा आणि आपल्या ठरलेल्या सिग्नल वर जाऊन उभा राहायचा. ऊन वर पाऊस सगळं सहन करून, दिसेल त्याच्या हात पाय पडून जमेल तितका विकायचा. दिवसभर त्या भिरभिरणाऱ्या गाड्या, ती सूट बुटातली माणसं अन वारंवार जाणाऱ्या इमारती पाहून सातच्या नशिबाला कोसायचा. रात्री परतल्यावर हाती आलेली सगळी कमाई सलीम शेठच्या हातात द्यायची, पैसे कमी असोत व जास्त पोटभरून शिव्या खायच्या अन शांत जाऊन आपल्या जागेवर उभा राहायचा. हे सगळं मुकाट्याने सहन कारणही भाग होता. ह्या सगळ्याच्या बदल्यात दोन वेळचं जेवण अन रात्री झोपायला मिळत होता. आई बापाचा पत्ता नाही, सगे सोयरे माहित नाहीत, मग माणसांनी भरगच्च झालेल्या आत या शहरात इतक्या सुविधा मिळणंही मोलाचंच होता.

गोष्टी सगळ्याच आवक्याबाहेरच्या होत्या. ह्या सगळ्यातून बाहेर पडावं असं कधी वाटायचा प्रश्नच नाही. दिवसांमागून दिवस चालले होते; अन मग एक दिवस रात्री परतल्यावर एक गोंडस बोलक्या डोळ्यांची पण भीतीने पूर्णपणे कोमेजून गेलेली एक मुलगी समोर दिसली. आजच तिला इथे आणल्याचा कळलं. तिला एकदाच पहिला अन कुमारच्या चेहऱ्यावर नकळत हसू झळकला. मनात काहीतरी येऊन गेलं. म्हणजे भरपूर काही.... गौरी काही दिवस हिरमुसलेलीच होती, म्हणजे कोणाशी बोलायची नाही. काही खायची प्यायची नाही. काही दिवस हे सगळं पहिला अन मग सलीम शेठ ने तिला बेदम मार दिला. त्याच्या एवढ्या दिवसांच्या वाया गेलेल्या कमाईचा हिशोब लावायला !! कुमारला हे समजलं अन संतापाने त्याचे डोळे लाल झाले. इतक्या दिवस स्वतासोबतही हेच होऊन कधीही याची चीड आली नव्हती, संताप तर दूरच. आज मात्र कुमार फारच वेगळ्या आवेशात होता. काहीतरी करून सलीम शेठला धडा शिकवायचा एवढं मात्र त्याने ठरवलं. तो प्रथम गौरीकडे गेला. भरपूर वेळ तेथेच बसला. सुरवातीस काहीच बोलला नाही. परंतु थोड्या वेळाने ती शांत झाली अन दोघांच्या गप्पा रंगल्या. दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमली. कुमारला एक मैत्रीण मिळाली होती अन गौरीला एक आसरा . दुसऱ्या दिवसापासून तिला आपल्या सोबत घेऊन जायचे कुमारने ठरवले. दोघेही दररोज सोबत जाऊ लागले. हळूहळू दोघांची मैत्री जास्तच घट्ट बनत चालली. दिवसभराच्या वनवणीनंतर चौपाटीवर बसायचं. मनसोक्त गप्पा मारायच्या आणि मग रात्री परतायचं. दिवस असेच चालले होते अन दोघांचाही एकमेकांशी लळा वाढतच चालला होता. चौपाटीवरच्या गप्पांना आता अर्थ सापडला हॉता. पुढच्या आयुष्याची स्वप्ने आता त्यात रंगवली जात होती. खरच छान दिवस होते ते. आता रात्री ऐकाव्या लागणाऱ्या शिव्या किंवा कधीतरी मिळणारा मार क्षीण वाटत होता. कारण दुःखावर मलम लावणारा सोबती भेटला होता !!

परंतु हे सर्व असेच चालणार नव्हते. नियतीला काही वेगळेच हवे होते. एवढ्या एकाच कामावर सलीम शेठ चे पोट भरत नव्हते. इतरही अनेक उद्योग त्याचे चालू होते. आपल्याजवळ असलेल्या मुली म्हणजे त्याच्या उत्पन्नाचा एक मोठा घटक होता. दर दोन तीन महिन्यातून एखादया दलालांचा चक्कर होतच असे. बोलणी उरकून सौदाही लगेच पक्का होत असे. भरगोस रक्कम शेठला यातून मिळत असे. आज सकाळी कुमार जायला निघाला पण गौरी सोबत येणार नसल्याचे त्याला समजले . उलट प्रश्न करण्याचा काही सवालच नव्हता म्हणून मुकाट्याने तो तिथून निघून गेला. कसाबसा दिवस संपला अन रात्री कुमार परतला. जेवणाआधी गौरीला शोधू लागला. ती कुठेही दिसेना. सगळीकडे शोधून झाले. गौरीचा काहीच पत्ता नाही. सर्वांना विचारले कोणी काहीच सांगेना. कुमार मात्र आता पुरता अस्वस्थ झाला होता. रात्रभर त्याच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ मजला होता. दोन दिवस असेच गेले अन त्या दिवशी परतल्यावर दोन मुलींना गौरीविषयी बोलताना त्याने ऐकले.तो धावतच तिकडे गेला अन विचारपूस करून लागला. भरपूर विनवणी केल्यावर एकदाचे उत्तर मिळाले.

'सलीम शेठ ने गौरीला विकली' !!! कुठे काय काहीच माहित नाही. हे वाक्य ऐकले अन कुमार पुरता बावरला. त्याचा संताप अनावर झाला. किती दिवसांपासून त्याच्या डोक्यात धुमसत असलेली गोष्ट आता पूर्ण होणार होती. कुमार धावतच सलीम शेठ जवळ पोहोचला. रागाने लालबुंद होऊन आवेशात नको ते करून बसला. गौरी बद्दल काहीच कळले नाही . पण सलीम शेठचा मात्र अंत झाला. आपले भान कुमार पूर्णपणे हरवून बसला होता. दुसऱ्या दिवशी डोळे उघडले तर ह्याच रिमांड होमच्या खोलीत तो झोपलेला होता.


Rate this content
Log in

More marathi story from Tejashree Pawar

Similar marathi story from Tragedy