कळ (अलक)
कळ (अलक)
ती झोपेतून उठली ,तशी मानेतून सळसळ... कळ आली. आई ग! तशीच कामाला लागली...
तोही उठलाच नंतर ...अळोखेपिळोखे देत,सवयीने मोबाईल हातात घेवून... gm, good day ,likes करत सुटायला...
तिनेही चहा ठेवला .पाणी तापवले ,दूध उकळले ,नाष्टा बनवला.
आता अजून दुखणे वाढत गेले ,तसे ती पुटपुटत पुन्हा बेडवर येऊन झोपली .
तो तेवढ्यात आवरून घड्याळकडे बघत आनंदाने म्हणाला ;अग' बघ !या माझ्या मैत्रिणीला अवॉर्ड मिळाले आज!जायचंय मला आज तिकडे!
तेवढ्यात ती नाराजीतच उठून म्हणाली; तुला मैत्रिणीचे पडलंय? मी बघ किती कळवळतीय सकाळपासून,लक्षच नाही तुझे!
त्यानेही घाईत अंघोळीला जात जात तिला सांगितलं "अग"तुला आठवते का? तिला हात नाहीयेत ती, रिटा!,तिच्या चित्रकलेला आज फर्स्ट prize मिळालं आहे!
ती ;निःशब्द;!!
हाताने पेन बाम घेऊन मानेला चोळतच ती कामाला लागली.