फेज थ्री
फेज थ्री
दुपारचं आवरून रिमा कपाटकडे वळली, काहीतरी शोधायचं होतं, नीटसं आठवत नव्हतं पण आवडीचे गाणे गुंणगूणतच तिचं पसारा आवरणं चालू होतं, नाही म्हणायला बाई आवरून गेलेली पण आज कसा मूड बनलेला बाईसाहेबाचा वाचनाचा, पेपरच्या पुरवण्या त्यातलं तिचं पूर्वी आवडीचे पान पेज थ्री ,page 3.
या दरम्यान पाच सहा फोन कॉल्स, कुंणीतरी कुरिअर, गॅसवाला ,शेजारीण यांच्या तावडीतून सुटून ती जराशी विसवणार होती,त्यात या निशांतचं लग्न ठरल्यापासून खूपच गडबड चालू होती.
हातातले पुस्तक टेबलावर ठेऊन हळूच रूम मध्ये मस्त रूम फ्रेशनर मारत तिचा हात कपाटाडे वळले. नेहमीचा आवडीचा कप्पा ना तिचा,! मग आनंद तर होणारच उघडताना, , पहिलं ग्रीटिंग, सुकलेले पान, गारगोट्या, समुद्री खडे, शिंपले, पुस्तके ,कोणी गिफ्ट दिलेली मासिकं ,फोटो, ओss फो... पत्रांचा गठ्ठा ,
किती तो पसारा कोंबलेला अस्ताव्यस्त असायचा, एक आवडीचा खरपूस असा हवाहवासा सुगंध दरवळायचा या कप्यात,जो तिला मोहरून टाकायचा, भान विसरून ती एकेक पान कुरवाळत हळू हळू उलगडत जायची.
हळवी रीमा कधी तशी कुणाला उलगडलीच नाही. अगदी जीवनाचा अर्थ ,माणसं कळेकळेपर्यंत लग्न आवडीच्या जोडीदारासोबत झाले.
दोन सुंदर फुले उमलली संसार वेलीवर,अजून काय मस्त मजेत रिमा आणि रिमाची दुनिया.
पत्रांची दुनिया एक वेगळीच असते नाही का, शब्द शब्द मनातले उमटत जातात, तेंव्हा कुठं ते काळजाला भिडतात असाच पत्रप्रपंच असायचा तिचा आणि सिमाचा .
सीमा रिमा ची बालमैत्रिणी.म्हणायला मैत्रीण, पण अखंड ही तिच्यात ती हिच्यात वास्तव्य , एकजान,एकदील.
नुसत्या खोडकरच नाही तर अत्यंत हुशार समजल्या जाणाऱ्या या दोघी ,रक्तगटापसून ते वर्गाची तुकडी सुद्धा एकच,
रिमा चा आज जुन्या ठेवणीतले पत्रं वाचनाचा मुड होता, कारण ही तसेच होत,निशांत टीना साठी खास काही शोधायचं होतं आणि आणि....
, रिमाला सीमा च्या भुतकाळातून बाहेर पडणे जमत नव्हते, पत्रांचा गठ्ठा काढून ती वाचत बसली होती.
सीमा ला त्या अघटित धक्क्यातून तिनेच तर सावरले होते .
काही वर्षापूर्वीची गोष्ट जशास तशी रिमा च्या डोळ्यापुढे तरळून गेली
नेहमीप्रमाणे नुकत्याच लग्न झालेल्या माहेरवाशीण मैत्रिणी भेटायला निघाल्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी ,
एकमेकींना चिडवायचे, एकमेकींची खूप खूप खेचायची असे मनोमन पक्के ठरवून आनंदात गोरमोऱ्या झालेल्या .
सीमा ,रिमा तशा दोघींच्या घरी लाडक्याचं, सुखासीन मनासारखी जोडीदार ,सुखी संसार एखाद्या स्त्रीच्या तनामनावर लगेचच उमटत जातो .तसंच अगदी.
सीमा ने तिची बाईक काढली ,मस्त रिमासाठी आवडीचे परफ्युम आणलेले ते पर्स मध्ये टाकले आणि स्वारी संध्याकाळी पार्कवर सुसाट निघाली. अचानक आडवळणाने जाताना पाठलाग करणारे काही तरुण पाहून न घाबरता तिने गाडीचा स्पीड वाढवला ,तसे घोळका अजूनच चेकाळला...ती बावरली,
काहीच मिनिटात सीमाच्या गाडीचा ब्रेक करकचून लागला, आणि तिची ओढणीही खेचली गेल्याचा भास तिला झाला, काही समजायच्या आतच अचानक झालेल्या हल्ल्याने सीमा निर्विकार झाली, पार गळून पडली, हतबल सीमाला नराधमांनी लुटताना सीमाला रिमाची सतत आठवण येत होती, आर्त स्वरातल्या तिच्या किंकाळ्या ऐकायला आजूबाजूला कोणीच न्हवते.सर्वत्र गंभीर शांतता...
ईकडे रीमा ची घालमेल वाढली ,काय ही बावळट ,अजूनही अशीच दमवते ,वाट बघायला लावते ,आली की अशी गच्ची पकडुन तिची खबर घेणार ना, जाम वैतागत रीमा तिच्या दिशेने चालत सुटली.
रस्त्याच्या आडोशाला ओळखीची ओढणी, चपला पाहून क्षणभर रीमा थरथरली .काहीच न सुचून तिने सीमाच्या दिशेने धाव घेतली आणि तिला घट्ट मिठी मारून आधी पाणी पाजले. विमनस्क अवस्थेतील सीमाला कशीबशी स्वतःच्या घरी आणताना तिच्या सर्वांगाची लाहीलाही होत होती. त्या नराधमांची ओळख काहीच विचारणे सध्या योग्य न्हवते, झाला प्रकार कळेतोवर रात्र उलटून गेली .सीमा
शुद्धीवर यायला तयार न्हवती आणि रिमाचे अश्रू काही केल्या थांबत
नव्हते.
अत्यंत वाईट अवस्थेतून ,मानस्थितीतून तिला जाताना पाहून रिमाने निश्चय केला तो सीमा ला बरे करण्याचा.त्यातून बाहेर काढण्याचा. दोन्ही घरची अवस्था बिकट होती ,पोलीस केस आणि तपास चालू असला तरी सीमा हळूहळू खंगत चालली होती.कोणत्याच उपचारांना साथ न देता निर्विकार पडून असायची, तिला रीह्याबीटेशन संस्थेत दाखल करण्यात आले होते,.अचानक झटके आणि तिचा अवतार पाहून सर्व घाबरून जायचे, पण रीमा खचली नाही.अविरत साथ ,तिची सेवा हाच तिचा दिनक्रम झाला, स्वतःचा संसार सांभाळून रिमा पूर्ण सीमा मध्ये व्यस्त होती, सीमा बोलती झाली तेंव्हा त्या नीच टोळक्यांचा शोध घेण्यात आला.सीमा ने त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद न देता पूर्वी त्यांच्याशी पंगा घेतला होता ,तोच राग धरून त्या नीच वृत्तीच्या मुलांनी असा त्रास दिला असे त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांकडून समजले.
या दोन वर्षात सीमा ने खूप भोगले, सोबतच सर्व फॅमिली सहन करत होती, त्या दरम्यान रीमा ने हार न मानात पूर्ण छडा लावून केस चा लढा जिंकला होता, त्या हरामखोरांना शिक्षा झाली तशी ती धावतच सीमा ला भेटायला आली होती. तिला मिठी मारून दोघी ढसाढसा रडल्या होत्या,
सीमा आता नॉर्मल वागू लागण्याचे कारण रिमाने तिचे पूर्ण परिवर्तन केले होते, नवऱ्या चे कौंसेलिंग करून त्याला आल्या प्रसंगाला सामोरे जाऊन सीमाला धीर देण्याचे वचन घेतले होते .हे सगळे करताना रिमाची अतिशय ओढाताण झाली होती, काही वर्षे बदलीमुळे सीमा रिमापासून दूर राहायला गेली, तोवर या दोघींचा पत्र व्यवहार आणि सीमा चे प्रॉब्लेम्स रीमा ने पत्राद्वारे सोडवले होते,तिच्यासाठी अनेक दिवस स्वतःचे रक्त दान ही दिले होते,तेवढेच आटवले होते.
सख्ख्या मैत्रिणींचे नाते निभावले होते.
एक काळ असा होता,सीमावर अतिशय गंभीर परिणाम झाला होता, तिला कुठेही जायला यायला नको असायचे, त्यातच तिच्या पतीचे काहीच वर्षात कोणत्या असाध्य आजाराने निधन झाले होते.एक मुलगी पदरात घेऊन अतिशय खचलेल्या स्थितीत ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायची तर रीमा तिला सतत धीराने मायेने समजवायची ,काही वेळा तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. तो रिमामुळे असफल झाला, सीमा तिच्या मुलीला कुठेच कधी पाठवायला तयार नसायची, सतत भीती दडपण ,त्या नराधमांना शिक्षा होऊनही तिला झालेल्या यातनाचा विसर पडणे जमत नव्हते.
सर्व ठीक होत गेले तरी काही जखमा या पिच्छा सोडत नाहीत, कालांतराने सीमा च्या मानसिक उपचारात सुधारणा झाली .मुलगी मोठी झाली तशी सीमा ची मनस्थिती पुन्हा बिघडत चालली होती, तिला कुठेच क्लासला न पाठवणे, सगळीकडून पहारा ठेवणे ,सतत कॉल करणे अशा वातावरणात टीना लहानाची मोठी झाली होती, त्यावेळी पण रीमाने पूर्ण आधार दिला होता.सावरले होते तिला आपल्या मायेने.
सालस, सुस्वभावी हुशार टीना रिमाला खूप आवडायची.निशांत आणि टिनाच्या मैत्रीचे रूपांतर असेही प्रेमात झाले होतेच आणि एका दृष्टीने सीमाला आता खूप सुरक्षित वाटायचे. या त्यांच्या सगळ्या वयाच्या तरुणपण, मध्यम वय प्रौढ आणि आता या त्यांच्या मुलांची लग्न ,अशा या फेज थ्री मध्ये येताना दोघींनी अनेक क्षण ,तास, दिवस ,वर्ष सोसली होती,सोपं नव्हतं काहीच.
अशा या रेशमी धाग्यांनी पुन्हा बंधनात बांधण्याचा योग्य निर्णय झाला होता ,दोन्ही घरं आनंदून गेली होती.
फेज थ्री दोघींच्या जीवनात एक वेगळाच आनंद घेऊन आला होता.सुखाचा समाधानाचा,जीवनातल्या काही दुःखद घटनांवर अथक प्रयत्नाने मात करून सुखाचे क्षण दिवस उपभोगण्याचा.
रिमाची ,सीमाची फेज थ्री,आयुष्याची सुवर्ण संध्या कशी बंधमुक्त होती. अनेक समस्या फेस करत करत करत त्यांनी वयाच्या या अशा मोडवर फेज थ्री मध्ये प्रवेश केला होता. आता फेज थ्री त्यांच्या जीवनाची संध्याकाळ नाही, तर नवी सोनेरी पहाट बनून आली होती.