End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Vrushali Vajrinkar

Others


1  

Vrushali Vajrinkar

Others


म प्र भाग3 अमर कंटक

म प्र भाग3 अमर कंटक

3 mins 744 3 mins 744

आपला भारत देश आयुष्य भर पुरून उरेल असाच आहे, आजमितीला आपण अजून खूप काही बघायचं राहिलं वाटत असतआणि मग अशा शोधक नजरेच्या ,भ्रमंतीआवड सवड काढून भारतातील काही आवडीचा भाग भटकायची लहर पूर्णत्वास येते आणि समाधान आनंद मिळवून देते. अशीच मागच्या सफारी ची तृप्तता आणि पुढच्या ठिकाणाला भेट देण्याची अभिलाषा घेवून निघालो सफरीला...


पुढचा प्रवास धार्मिक अध्यात्मिक अशा निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच amarkantak अमर कंटक या नर्मदा नदीच्या उगमस्थान ला भेट देण्याचा.नर्मदा नदी आणि तिचे पात्र, महात्म्य भारतीय संस्कृतीचा वारसा इतिहास आणि श्रद्धा स्थान.

याआधी लिहालयप्रमाणे कान्हा सफारी जंगल या wish पूर्ण करून अध्यात्मिक ओढ असलेल्या मैत्रिणी साठी अमर कंटक चा प्लॅन केला.

तो प्रवास जसा सुरू झाला तसा वातावरणात एक वेगळीच आनंदी ,प्रसन्न लहर ,सुखद गारवा जाणवला. तो प्रवासातील दुतर्फा निलगिरीची आणि उंच साल वृक्षांची जणू खास मांडणी हिरवेगार सुंदर रस्ते पाहून हा मार्ग खरेच नर्मदेच्या पवित्र उगमस्थान कडे जाण्यासाठी आहे हे जाणवले.

अतिशय भारावून जाणारी ही सफर तनामनाला प्रसन्न करून गेली.छोटंसं गाव वजा शहर Amarkanatak ला प्रवेश करतानाच वाटेत एक पाटी दिसली ;"संत कबीर कुटी "आणि त्या सुंदर परिसरात जाण्याची इच्छा आपोआप सर्वांना झाली.

त्या निसर्गरम्य कुटी ,समाधी स्थानात प्रवेश करताच समाधान लाभले .कबिरांचे सुंदर दोहे लिहले होते .त्यांच्या पादुका आणि छोटीशी आठवणी ठेवल्या होत्या.परिसरात

अतिशय छान बाग ,फुलं झाडे यांनी सजवली होती. स्वच्छ शांत परिसरआणि दर्शनाने मनाला प्रसन्न वाटले.

‎तिकडेच प्रसादाचे अतिशय चविष्ट जेवण भात अख्ख्या गवारीची भाजी अक्षरशः पुन्हा मागून घेऊन खाऊन आम्ही तृप्त झालो.आणि काही अवधीत च आम्ही amarkantak या पवित्र तीर्थक्षेत्री प्रवेश केला.

स्वागताला नर्मदेच्या असंख्य धारांनी शुभ्र दुधासारखा कड्यावरून कोसळणारा "दुधधारा "धबधबा डोळ्यात समावताना अनुभवताना त्या ठिकाणच्या सकारात्मक wibes जाणवल्या.

फारच सुंदर प्रवेश झाला होता या धार्मिक निसर्गरम्य अमर कंटकचा.

ठरलेल्या ठिकाणी जाण्याआधी गावातले जैन मंदिर चे अतिशय सुबक भव्य शिल्पकलेनि नटलेली मंदिराची घडण चालू आहे. तिथे दर्शनासाठी गेलो. भव्य अष्टधातूंची जैन तीर्थंकराची मूर्ती आणि मंदिराची भव्यता प्रचंड आवडली.

काहीच वेळात बुकिंग केलेल्या "टेंट "सदृश रिसॉर्ट मध्ये आलो. अतिशय स्वच्छ सुंदर मोठा राहण्याचा फुलझाडांनी नटलेला परिसर, खाण्याची व्यवस्था व एकूणच विश्रांतीसाठी योग्य असेच ठिकाण माझ्या लेकीने निवडले होते आमच्यासाठी.

अमर कंटक येथील मंदिर ही बहुतांशी शंकर विष्णू अवताराची आहेत. सगळीकडे त्यांचा इतिहासाच्या खुणा दिसतात.मंदिरात मुर्त्या, त्यांची रचना इतिहास मांडलेला असतोच.धार्मिक पूजा अर्चा, शंख नाद ,आरतीचे आवाज याने संबंध परिसर दुमदुमत असतो.भारावून जाणारं नर्मदा नदिच उगमस्थान त्या पाण्याच्या लहरीतून मिळलेले आशीर्वाद, तो नदीच्या पाण्याचा स्पर्श सुखद वाटला. जणू परीक्रमां करत आहोत असेच वाटले. नदीची आरती ,शंख नाद, पूजा आणि सगळं

वातातावरण वेगळ्या विश्वात नेऊन ठेवते .. एका ठिकाणी शिवलिंगाचे मोठी भव्य मूर्ती आणि परिसर विलोभनीय होते.

सोनिटका असो की विष्णू मंदिर की एखादी बाग, आणि अनेक विविध मंदिर बघण्यात आपणही अगदी तल्लीन होऊन जातो. "कल्याणस्वामी आश्रम" असेच सुंदर अनुभूती देणारा परिसर, शांत सुंदर स्वच्छ .भक्तांची राहण्याची, अध्यात्म शिक्षणाची सोय असलेलं ठिकाण अगदी भरभरून बघितलं पूजेचा तिथल्या आरती आणि दर्शनाचा लाभ घेतलासुंदर अनुभूती,.गुरूंचे आशीर्वाद घेऊन प्रसन्न मनाने अमरकंटक चे वास्तव्य सफल झाल्याचे समाधान अनुभवले.

भारतीय असल्याचा अभिमान वाटला. एवढ्या विविध प्रदेशात आपली संस्कृती अजूनही आपले स्थान टिकवून आहे याचे समाधान वाटले. थोडीफार स्वछता असणे गरजेचे आहे असे वाटले, त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करून प्लास्टिक मुक्त नदी परिसर राखला पाहिजे. हीच खरी नर्मदा मा ची भावपूर्ण पूजा असेल.

विश्रांती ,मौजमजा ,गप्पा, आठवणी खाणं हा भाग तर न लिहता सांगता आम्ही अनुभवत होतोच .(तो लिहल्यास लेख फार वाढेल)

क्रमशः


Rate this content
Log in