Vrushali Vajrinkar

Others

2  

Vrushali Vajrinkar

Others

कान्हा सफारी next

कान्हा सफारी next

2 mins
700


वाघ बघायचा म्हणलं की ,तेही ...त्यांच्या राज्यात जाऊन... मुक्त फिरणारा जंगलाचा राजा, पट्टेरी वाघ आणि त्याचा रुबाब याचसाठी सगळा असतो पर्यटकांचा अट्टाहास.

जशी खबर लागली तशी आमची जिप्सी calling च्या दिशेने निघाली, माकडांची उंच झाडावरून आवाजाची वेगळीच लकब, हरणांचे कान टवकारून एकाच दिशेने स्तब्ध उभे राहून बघत राहणे, पक्षी आणि एकूणच जंगल त्या वाघाची तिथे उपस्थिती असल्याची पुरेपूर जाणीव करून देत असतात. तेवढीच जिस्प्सीची लागलेली रांग,पर्यटकांची हळुवार कुजबुज आणि स्तब्धपणे त्या वाघाची चाहूल लागण्याची वाट पाहताना स्वतःचा  श्वासोच्छवास ऐकू येत असतो एवढी धडधड वाढलेली जाणवते आणि सगळेच श्वास रोखून त्याच्या येणाऱ्या दिशेकडे डोळे कॅमेरे सरसावून नजर लावून बसतात.

अचानक हालचाल दिसते आणि कोणाला तरी वाघाची पुसटशी चाहूल लागते .जो तो त्या दिशेने बघायचा प्रयत्न करतो ,त्यात आम्हीही एकमेकीला आनंदाने उत्साहाने एकमेकांना तो कुठून येतोय हे दाखवताच सगळ्या जणी डोळे विस्फारून त्या राजबिंड्या जंगलाच्या राजाला न्याहाळत डोळ्यात आश्चर्यकारक भाव आणि हातात कॅमेरा घेऊन त्याची प्रत्येक अदा टिपत राहिल्या. या सफारीचे सार्थक झाल्याचे समाधान आणि किती कसे कोणी बघितला याबद्दल तिथे बोलता येत नसल्याने

बाहेर पडताच त्यावर भरभरून बोलायला सुरुवात केली. याची डोळा याची देही जंगलातला मुक्त संचरणारा वाघ बघितला बाई एकदाचा अशीच जणू मैत्रिणींची देहबोली दिसत होती.

त्याची एन्ट्रीच तशी दौलदार होती, तुमच्या विश्वाशी बेखबर असलेल्या या वाघोबाचे नावही तितकेच सुंदर आहे 'उमर पानी ', जबरदस्त पिळदार, हेल्दी, गुटगुटीत ,जवान 'उमरपानी' आपल्याच तोऱ्यात आमच्या जिप्सी समोरून त्याच्या हक्काच्या राज्यातून मस्त डुलत रुबाबदार पणे चालत निघाला होता आणि आम्ही सारे थक्क होऊन ते दृश्य बघत होतो. त्यांची राखण् करणाऱ्या लोकांचे विशेष कौतुक वाटले.

तो त्याच्या वाटेवर मार्गस्थ होत जाताना त्याच्या प्रत्येक अदा, चाल तो शेवटच्या दिसेनासे होईपर्यंत प्रत्येक जण डोळे लावून असणार याची जाणीव झाली. माझ्या नजरेत तर तो रुबाब अजूनही लिहताना डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. इतर प्राणी, पक्षी, फुलांची झाडांचे तर भरभरून दर्शन झाले.

कान्हा नॅशनल पार्क कान्हा conservation टायगर reserv म्हणून आरक्षित आहेच 2,त्याची भोगोलिक माहिती आपल्याला आजकाल छान उपलब्ध आहे, या कान्हा नॅशनल पार्क चा फक्त 20 टक्के भाग सफारी साठी राखून ठेवला आहे ,मुक्की, कान्हा किसली, खटिया अशी काही मुख्य गेट ने तुम्ही जंगल सफारी साठी प्रवेश करू शकता.(याचे नियम आरक्षण आणि इतर माहिती आजकाल नेट वर उपलब्ध आहेत.)

बाकी80 टक्के जंगल हे मुक्त प्राणी पशुपक्षी यांचेच राज्य आहे. आपला हस्तक्षेप लुडबुड खूप महागात पडते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या, नियमात राहिले वागले की आपलं आणि जंगलाच ,तिथल्या जीवसृष्टीच मस्त जमून येत.अशी ही सफारी आटोपून पुढच्या वेगळ्या डेस्टिनशन चे प्लॅन करत करत तयारीला लागलो.

क्रमशः


Rate this content
Log in