Vrushali Vajrinkar

Others

3  

Vrushali Vajrinkar

Others

Mp जरा हटके सफर part6

Mp जरा हटके सफर part6

7 mins
12K


मध्य प्रदेश मधील आमचा सर्वात महत्वाचा शेवटचा टप्पा जो पन्ना नॅशनल पार्क पासून अगदीच जवळ असल्याने बघायचे ठरले होतेच.पन्ना ची जंगल सफारी आटोपून कूच केले ते खजुराहो कडेच.

‎ खजुराहो जे प्राचीन ऐतिहासिक शहर हे झांशी पासून जवळच असून त्याचा इतिहास शहराचा एक हजार वर्षापूर्वीचा आहे.950 ते1050 या काळातील चंदेल राजवटीच्या कारकिर्दीत येथे मुख्यत्वे हिंदू व जैन मंदिर समूहाची मंदीर आहेत. छत्तरपूर जिल्ह्यात खजुराहो असून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून या शिल्पकलेला मंदिरांना मान मिळाला आहे.नगारा पद्धतीने याचे आर्किटेक्चर आहे.कंदारिया, चंदेला मंदिर,देवी जगदंबा मंदिर,,चतुर्भुज मंदिर वामन मंदिर पार्श्वनाथ मंदिर जवारी मंदिर अशी अनेकविध देवता ची सुंदर मंदिरे इथे आपल्याला दिसतील.याची सर्व आणि जास्तीची माहिती आपणास सहज उपलब्ध होते.

‎. ज्या खजुराहो मध्ये जगातील अत्यंत सुंदर शिल्पकलेची,स्थापत्य कलेचा नमुना, अद्भुत मंदिरे आहेत अशा ठिकाणी जाण्याचा दिवस उजाडला आणि उत्साहाने आम्ही खजुराहो शहरात प्रवेश केला.छोटेसे शहर आहे.पर्यटनावर व काही वस्तू व उत्पादनावर या शहराचा आर्थिक गणित चालते.

‎ प्रवेश करताना प्रवेश द्वारात कमानीवर येथील सर्व मंदिराचा दिशादर्शक लावले होते. पश्चिमी मंदिर समूह व इतर मुख्य मंदिर असे विभाग बघायचे होते. एका गाईड जो नेणे आवश्यक असतो अशा वेळी, तो सोबत घेऊन आम्ही आमच्या गाडीने पश्चिमी मंदिर समूहाची मंदिर बघण्यासाठी निघालो.जाताना त्याने मंदिर परिसरात खजुराचे उंच झाड दाखवले आणि त्यावरून खजुराहो नाव कसे पडले हेही सांगितलं.

सर्वप्रथम ज्या मंदिरात आम्ही गेलो ते ब्रम्ह देव मंदिर होते जे फारच कमी क्वचित बघायला मिळते. अतिशय वैशिष्ट्य पूर्ण रचना शिल्पकला बघतच मंदिराच्या फेऱ्या पूर्ण केल्या सोबत गाईड चे मंदिराचा इतिहास व तेथे लिहिलेली माहिती महत्वाची असते, यावर काहीच गोष्टी ध्यान्यात राहतात.काही ठिकाणी उभे राहून गाभाऱ्यातील मूर्ती पाहताना आपण आणि मूर्ती यामध्ये पाणी असल्याचा भास होतो.पाहिलं जवळ जाऊन तर ,ते पाणी नसून तिथल्या मंदिराची तशी रचना आहे हे दिसून येते .हे सगळं गाईड दाखवत असल्याने आपल्या लक्षात काय बघावे ते समजते, अगदी बारीक बारीक कलाकुसर म्हणजे मूर्तीच्या हातातील कंगवा ,आरसा व व अशा छोट्या वस्तू ,केशरचना असो की नृत्य ,शस्त्र व त्या काळातले एकूणच राहणीमान अतिशय कोरीव रेखीवपणे बघायला मिळते ते गाईड आपली नजर तिथे वळवतो व माहिती सांगतो तेंव्हाच समजते.पूर्ण वळणदार अशा कलाकृती, एकमेकांचा नक्षीचा आधार घेऊन गुंफलेली रचना याचे वैशिष्टय आहे.शब्दात मांडणे कठीणच.

इतकी सुंदर कलाकृती बघण्यात आपण ,आपल्या पूर्वजांच्या कलाकारांच्या या कलेच्या कौतुकाने भारावून जातो. इथेच इतकं भरभरून बघायला असता गाईड म्हणतो,,, मॅडम जी ,अभि तो उधर बहोत बडे मंदिर है !वो देखने मे टाइम लगेगा,,जलदी करो... जिथे आम्ही सेल्फी व शिल्पकलेची स्तुती करण्यात फोटोत मग्न असतो तिथे याच्या बोलण्याने आम्ही झटपट फोटोग्राफी वगैरे उरकले आणि मुख्य मंदिरे आहेत त्या दिशेने निघालो.

मुख्य मंदिरात जाण्यासाठी प्रवेश फी अगदी नाममात्र भरून आम्ही प्रवेश केला, सुंदर हिरवीगार बागेतून मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय सुखदायी होता. छानशी झाडे लावलेली व निगा राखलेली प्रचंड मोठी परिसर असलेली बाग बघून मन प्रसन्नतेने मंदिराकडे निघाले. डोळे विस्फारून च मंदिरे बघण्यास सुरुवात झाली .छोटी ते भव्य अशी सर्व मंदिरे बघत बघत ती शेवट बाहेर निघेपर्यंत या अवाक करणाऱ्या शिल्पकलेची काय आणि कशी स्तुती करावी असे होते.

अगदी सुरुवातीला वराह, हत्ती व इतर शिल्पकृती च्या नक्षीदार डिझाइन ने लक्ष वेधून घेतले. एकूणच बरीच मंदिरे विष्णू च्या रूपातील देवाची आहेत, देवी व वामन देवता,गणेश मुर्त्या ही अतिशय सुबक आहेत. सर्व ठिकाणी चपला बाहेर काढून मगच प्रवेश असतो.काही ठिकाणी आम्ही छोटीशी पूजाही केली गाईडमार्फत ,मंत्रोच्चार केले आणि धन्य झालो या अप्रतिम मूर्तीच्या चरणी नतमस्तक होऊन.

खजुराहो च्या प्रणयक्रीडेच्या, श्रुंगार रसाच्या शिल्पकला जगविख्यात आहेतच, त्याचा इतिहासही तिथे वाचायला मिळतो व गाईड सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या भाषेत तो उलगडून दाखवतो, त्यातले हावभाव व त्या गोष्टीरूपात उलगडत जातात, एकमेकांशी साधर्म्य साधत मांडलेली कलाकृती आहे सगळी.आपल्या भारतीय संस्कृतीत प्रणयक्रीडेच्या ,शृंगार, सेक्स बद्दल एवढ्या मोकळेपणाने बोलले जात नाही तर त्या काळात या बद्दल एवढं कसे आणि का लिहलं गेलं, ही शिल्प का कोरली गेली? याचा इतिहास ऐकताना आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान व विशेष वाटत राहते.

आम्हाला तिकडे अनेक परदेशी पर्यटक अगदी उत्साहाने वेळ काढून सर्व बघताना दिसले. तर काही भारतीय पर्यटक त्याची खिल्ली उडवताना दिसले,याचे वाईट वाटले. आपल्या दृष्टिकोन आपल्या कलाकारांच्या प्रति आपल्या कला, संस्कृती बद्दल आपणच आदर दाखवला पाहिजे, जतन केले पाहिजे हे प्रामुख्याने जाणवले.वेगवेगळ्या देशातून इथे लोक येतात त्यांनाही बघताना याचे फारच कौतुक असल्याचे जाणवले. भव्य दिव्य मंदिर आणि परिसर बघायला फार वेळ लागतो चालावे लागते.भरभरून नजरेत साठवून ठेवता ठेवता आपण अपुरे पडतो वाटत राहते तेंव्हा आपला कॅमेरा खूप उपयोगी पडतो. उंच मान करून करून बघताना मान दुखून येते .नुसते मंदिराची उंची बघायला इतका त्रास तर कलाकारांची काय अवस्था झाली असेल, ?किती सहनशीलता एकाग्रता पिढ्यान्पिढ्या हे काम करताना, हा इतिहास कोरताना समाधी लागली असेल नाही का!

आधी शांतपणे सर्व शिल्पकृती बघूनच मग आपण आपले फोटो घ्यावेत, तरच समाधान मिळते. आम्हीही तसेच केले. वेळेच बंधन नसेल तर बघायला कितीही वेळ घेतला तरी कमीच पडेल अशी मंदिरे असल्याने वेळ काढूनच जावे. इथल्या प्रत्येक मंदिराचा इतिहास मंदिराबाहेर प्रवेश करताना कोरला आहेच, माहिती आहे .शिवाय पुस्तके मिळतात त्यातही माहिती असतेच ,गुगल वर सर्व उपलब्ध असतेच आजकाल म्हणून मी काही इथे वेगळं लिहित नाहीय.

मंदीर परिसरात" light and sound "शो आयोजित केलेला असतो. तोही बघणे एक सुखद अनुभव असतो. तिथेच बाहेरच्या स्वच्छ सुंदर बागेत अंधारात केलेली प्रकाशयोजना व सोबत खास आवाजात खजुराहो च्या साम्राज्याची इतिहासाची गोष्टीरूपात अत्यंत भारावून टाकणाऱ्या वातावरणातील मांडणी आपण स्तब्ध होऊन बघत राहतो आणि दमलेल्या पायांना तासभर विश्रांतीही मिळते .

बाहेरच अनेक शॉपिंग ची दुकाने थाटली आहेत. खाणे पिणेची व्यवस्था असतेच, थोडेफार काही शॉपिंग नाही म्हणले तरी होतेच. स्त्रिया आणि काही न खरेदी करता येणे जरा अवघडच सो आम्ही आठवण म्हणून छान पण स्वस्त मेटल च्या वस्तू ज्यात मेटल जे घुबड owl विकायला दिसले बऱ्याच ठिकाणी, चौकशी करता घुबड हे लकी व शुभ असल्याने घेतात ठेवतात समजले, आमच्याकडे पूर्वीपासून प्राण्यांच्या बाबतीत असले काही भेदभाव नसल्याने मी तर घेतलेच शिवाय इतरही आकर्षक वस्तू ज्या मंदिरातील प्रणयक्रीडेच्या शिल्प कृतीशी साम्य असलेल्या विक्रीस होत्या. हेही जरा बघायला वेगळेच वाटले. भारतीयांना ज्याबद्दल बोलायला लिहायला अजूनही संकोच वाटतो त्या गोष्टी वस्तुरूपात विक्री आणि खरेदी म्हणजे एकीकडे तुम्ही आपल्या इतिहासाची संस्कृतीची अशी जपणूक करताय आणि दुसरीकडे त्यावर निंदा चेष्टा करणे असे काहीसे जाणवले..

असो.. बांबू सिल्क म्हणून साड्या स्कार्फ वगैरे घेतले आणि त्या गिफ्ट्स सर्वांना आवडल्या हेही विशेष.

त्यानंतर मध्यप्रदेश टुरिझम च्या सांस्कृतिक विभागाने mp च्या कलाकारांना संधी म्हणून एक शो ठेवला आहे तो बघण्यास निघालो त्यात नृत्य, कला ,गाणी असा संगम होताच. तोही बघण्यासारखा आहे. त्यातून स्थानिकांचे अर्थार्जन व कलेची जोपासना होत असल्याने पर्यटकांनी अवश्य जावे.

अशा सर्व मंदिराच्या अत्यंत सुंदर भरभरून आठवणी मनात कॅमेरात घेऊन आम्हला नाईलाजाने पुढच्या प्रवासासाठी पाय काढावा लागला. आजकाल गुगल सर्च वर सर्व माहिती वाचायला बघायला मिळते पण आपल्या पावलांनी चालत डोळ्यांनी अनुभवत खजुराहो जे कायम लांबणीवर पडलेलं पर्यटन स्थळ बघायची हौस फिटली.खजुराहो च्या आजूबाजूला वॉटर फॉल व इतर छोटे मोठी ठिकाणी तुम्ही वेळ काढून जाऊ शकता पण मुख्यत्वे या मंदिरांना वेळ काढून भेटी देणे हाच मुख्य उद्देश असावा.

येता जाता अतिशय रुचकर जेवणाचा आस्वाद, आम्ही आणलेली शिदोरी आणि मैत्रिणींची संगत ,गप्पा, गाणी मस्ती, प्रत्येक ठिकाणी बघून झाल्यावर त्याबद्दल चर्चा माहिती असे खाद्य असल्याने वेळ अतिशय छान जायचा.तसेच गप्पा मारताना आम्हाला तर बरेचदा तिथे असेही वाटले आपण लहानपणी मुलांना काही सेक्स विषयी योग्य ती माहिती अजूनही देत नाही ना काही बघताना योग्य माहिती सांगितली जात नाही .उलट दटावतो .तिथे खजुराहो मधील शालेय स्थानिक ट्रिप साठी या मंदिरांना भेटी नक्की देत असतील त्यावेळी या पूर्ण श्रुंगारीक शिल्पकृती बघताना शिक्षणाची, शिक्षकांची कसोटी असेल वा मुलांचा संभ्रम, कुतुहल कमी करणारे चांगले गुरू तरी असावेत.अथवा गैरसमज वाढण्याची शक्यता बळावते.

पूर्वी ज्या कारणांसाठी या शृंगार रसाच्या अतिशय पूर्णत्वास नेणाऱ्या शिल्पांची मांडणी जी त्यावेळची गरज होती. त्यात अत्यंत सकारात्मक, वैचारिक समाजभान होते. त्याच कलाकृतीला आज दृष्टिकोन बदलून विकृती ने पाहिले जाते तेंव्हा कीव येते.

इकडे एक मात्र बघायला मिळाले, लग्नासाठी या खजुराहो मध्ये अनेक छान छान हॉल व ठिकाणे आहेत त्यासाठी खास bookings असते आणि आता तो ट्रेंड झाला आहे,असे गाईड ने सांगितले शिवाय लग्न झालेली आजूबाजूच्या शहरातील नवीन लग्न झालेली जोडपी फॅमिली सहित इथल्या मंदिरात खास दर्शनासाठी येतात.आशीर्वाद घेतात ,पूजा करतात.

यामुळे आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना तेही वेगळेच वाटते आणि कौतुक वाटते.

या सर्व मध्य प्रदेशात असंख्य ठिकाणं प्रेक्षणीय असूनही निवडक व जरा" हटके टूर "आखल्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी नवनवीन बघायला ,फिरायला ,अनुभवायला मिळाले मग ते मार्बल रॉक बोटिंग असो कान्हा, पन्ना सफारी असो, जंगल walk असेल ,बैगा डान्स असेल की मंदिरे ,नर्मदा नदी,निसर्ग , शिल्पकला,कलाकुसर एकूणच सगळं अतिशय सुंदर असाच अनुभव होता.

मैत्रिणींनी मिळून माझ्या लेकीच्या मदतीने आखलेला हा टूर अविस्मरणीय असाच होता.

फक्त महिलांनी एकटीनं प्रवास करण्याच्या व्याख्या आता बदलल्या आहेत अनेक ग्रुप्स आता जातात फिरतात.आम्हीही फॅमिली सोबत जाणाऱ्या पण यावेळी फॅमिली येणे शक्य नसल्याने आणि सर्वांची मुलंही आता मोठी असल्याने मस्त प्रवासाचा बेत आखला.

एकट्या महिलाही मुलीही प्रवास करतात मात्र सुरक्षित असा प्लॅन करूनच योग्य तिथे booking व वेळेत जाणे येणे गुगल मॅप हाताशी असणे गरजेचे असते.तर काय...

या अनुभवाची शिदोरी साठवून आम्ही पुण्यास परतीच्या मार्गाला लागलो .जबलपूर हुन ट्रेन विमान असल्याने तिथेच परत येणे होते. वेळ असल्यास तिथेही खरेदी व राहिलेली ठिकाणं बघून होतात.पुणे ते कान्हा, अमरर्कंटक ,जबलपूर, पन्ना नॅशनल पार्क, खजुराहो, जबलपूर पुणे असे 10 दिवसांची ही सफर आपल्याला पुरेशी होते.

बऱ्याच गोष्टी लिहण्यापेक्षा अनुभवाने तिथे बघण्याने जो आनंद मिळतो तो माझ्याकडून शब्दात नक्कीच कमी पडला असेल. तरी मला जे सुचले अनुभवले आठवले ते सोप्या सहज शब्दात मी व्यक्त होत गेले आहे.

असंख्य क्षण हे आनंदाचे ,आरामाचे कधी धावपळीचे

कधी उत्सुकतेचे कधी आश्चर्यांचे कधी आठवणींचे, अगणित क्षणाची गणती इथे होतच नाही,

‎ते सुख तो अनुभव प्रवास करूनच घ्यावा ,

‎आमचा राम राम घ्यावा.

‎पुन्हा भेटूया नक्कीच, एखाद्या नव्या सफरीचे अनुभव वर्णन घेऊन लवकरच.....

‎धन्यवाद


Rate this content
Log in