Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vrushali Vajrinkar

Others


3  

Vrushali Vajrinkar

Others


मध्यप्रदेश हटके भटकंती (पार्ट ५)

मध्यप्रदेश हटके भटकंती (पार्ट ५)

2 mins 480 2 mins 480

जबलपूरहून पुढचा पल्ला लांबचा होता, बुंदेलखंडमधील पन्ना नॅशनल पार्कमधल्या सफारी, स्टेचे बुकिंग आधीच केल्याने मस्त आरामात प्रवास करणे आणि पोहोचणे एवढंच होतं.


प्रवासातली धमाल गाणी-गप्पा आणि खादाड खाऊ या लिहायच्या गोष्टी नाहीत ना! अनुभवायच्या फक्त!


तर छानसा प्रवास करत पन्ना येथे आगमन झाले. छोटेसे पन्ना हे फॉरेस्ट एरिया असल्याने ग्रामीण गावासारखं गाव. शांत, झाडांनी वेढलेलं कर्णावती नदीच्या किनारी वसलेल्या सुंदर रिसॉर्टला आम्ही आनंदाने उतरलो. आजूबाजूला छान झाडी, नदीचे पात्र, गार हवा अशा निसर्गात, गुलाबी थंडीत राहायला कोणाला आवडणार नाही!


मस्त जेवण, नदीकिनारी campfire भन्नाट वातावरण, गाणी यांचा जोश, रात्रीचा निसर्ग त्यात भर टाकत होता. पहाटेच्या सफारीची तयारी होतीच तशी, आणखी एक वेगळं जंगल, वेगळा अनुभव, सफारी, सगळेच एक्सइटमेंटमध्ये झोपी गेलो.


पहाटे आमच्या रिसॉर्ट ला 5 ला जिप्सी हजर. आम्हीही कमी नव्हतोच, मस्त आवरून जिप्सीने पन्ना नॅशनल पार्कच्या जंगलात वेळेत पोहोचवलं. पहिला नंबर लावल्याने एन्ट्री प्रथम मिळली हाही आनंद, त्याचे कारणही तसे असते.


आधीच्या सफारीचा अनुभव असल्याने तसा प्लॅन होता की आपण प्रथम जंगलात प्रवेश केला की जमतील तेवढे जास्त प्राणी-पक्षी बघायला मिळतात. नंतर ते आवाजाने आत निघून जातात. तर आम्हाला सुंदर जंगली प्राणी, पक्षी यांना बघून जेवढा आनंद झाला तेवढाच निसर्गाच्या विविध छटांचा अवर्णनीय आनंद घेता आला.


गोल्डन फॉरेस्ट म्हणता येईल अशी सुंदर जंगल सफारी अनुभवली. 

तिथल्या आतल्या भागात नाष्ट्यासाठी (जो आमच्या रिसॉर्टकडून मस्त पॅक करून दिलेला होता तो व इतर खाऊ खाण्यासाठी) अतिशय सुंदर उंच असे मचाण आहे. जिथून खोल दऱ्या व झाडी, जंगल अप्रतिम दिसते. जे अनुभवणे नि:शब्द, पटापट फोटो आणि शूटिंग मध्ये आपण मग्न होऊन जातो. तर या सफारीला आमच्या naturalist ने तिथली फारच छान माहिती दिली आणि आम्हीही भरभरून अनुभवली.


अशा या पन्ना बुंदेलखंड राजधानीचे एतिहासिक महत्व आहेच. आपल्या बाजीरावच्या मस्तानीचं माहेर आणि इतर इतिहास आपल्याला आजकाल सहज उपलब्ध आहेच. तिथले एक कृष्णाचे सुंदर मंदिर ताजमहालासारख्या आकारात बघायला मिळाले. इतरही परिसरात अनेक मंदिर आहेत.


इथला किल्ले आणि हिऱ्यांच्या खाणी mining साठी काही भाग प्रसिद्ध आहे. चविष्ट जेवणाचा आनंद घेत पन्नाचे वास्तव्य सुखावून गेले.


पन्ना जिकडे कुणी फारसे जाण्याचा विचार केला नसेल असा हटके प्रवास माझ्या फॉरेस्टमध्ये काम करणाऱ्या लेकीमुळे घडला.


क्रमशः


Rate this content
Log in