Vrushali Vajrinkar

Others

1  

Vrushali Vajrinkar

Others

म प्र जरा हटके भाग 4

म प्र जरा हटके भाग 4

2 mins
528


भारताची समृद्धी भारतीय परंपरेने जाणली जाते तसेच नैसर्गिक संपत्ती विविधता यासाठी खूप माहिती लिहली तरी अपुरीच पडेल म्हणून अनुभवलेल्या काही प्रवासातील सहज आठवलेल्या ठिकाणा विषयी थोडक्यात लिहिण्याचा माझा प्रयत्न आहे.


अमर कंटक या नर्मदा नदीच्या उगम स्थान असलेल्या, भारतीयांच्या भक्तिरसात अखंड वाहणाऱ्या नर्मदे मातेच्या पवित्र क्षेत्रावरून प्रसन्न मनाने जबलपूर कडे प्रस्थान सुरू झाले.

जबलपूर मध्य प्रदेश मधील व्यापारी गजबज असणारे राजधानी चे ठिकाण तसेच तिथल्या एयतिहासिक आणि निसर्ग सौन्दर्यचे वरदान लाभलेले शहर म्हणून सुप्रसिद्ध आहेच शिवाय पुढच्या लांबच्या प्रवासाचा मधला विश्रांती टप्पा म्हणून जाण्याचे ठरवले.

भेडा घाट म्हणून प्रसिद्ध ,पर्यटकांनी ओथंबून जाणार ठिकाण आहे. प्रसिद्ध धुवाधार धबधबा रोप way आणि तिथला मार्बल रॉक बघण्यासाठी. अतिशय सुंदर असे शुभ्र धवल पाण्याचा प्रचंड मोठा धबधबा कोसळताना बघणे म्हणजे अतीशय विलोभनीय दृश्य होय.

रोप वे मधून खाली पाहताना सुंदर असा नजारा पाहून निसर्गाच्या मुक्त हस्ते मिळालेले वरदान किती घेऊ नको असे होते इतकं छान प्रवाही पाण्याच्या असंख्य लाटा मार्बल संगमरवरी खडकातून वाहताना हिरव्या निळ्या पांढऱ्या रंगांचा अनोखा मिलाप मन प्रसन्न करून जातो. गार हवेत रोप वे चा आनंद घेत घेत आपली तृष्णा तृप्त होते. तिथेच मार्बल रॉक मधून बोटीने एक अद्भुत सफर घडवली जाते ती वर्णावी तेवढी कमीच,अनुभवणे हाच आनंद कारण तो एक तास ,उंच उंच ,रंगीत मार्बल च्या मोठं मोठ्या आकारातल्या खडकातून ,निश्चल अशा सुंदर पाण्यातून जाताना आपण एखाद्या कोणत्या दुसऱ्या देशात आहोत असाच भास होतो. आणि आपल्या भारतमाता च्या निसर्गाची उधळण पाहून गर्व ही वाटतो आपण भारतीय असल्याचा.नावेतून जाताना तिथली माहिती हसत खेळत नावाडी देत असतो आणि आपण मनसोक्त अशा वेगळ्याच भासणाऱ्या बोटिंग चा आनंद घेत असतो. परतताना,नुकतीच सायंकाळ होत आलेली ,सूर्य मावळतीला आणि आम्ही बोटीत मस्त ,तो सर्व नजारा दृश्य भारावून जाणार होत, आजूबाजूचा परिसर सुर्यची किरण पाण्यावर खडकावर आपला सोनेरी रंग पसरर्ताना जो भास दृश्य जमेल तेवढं कॅमेरा त बंदिस्त केलं, शेवटी डोळ्यांचा, मनाचा कॅमेरात भरभरून साठलं आहेच त्याची मेमरी कधी कमी झालीच तर हे क्लीक्स उपयोगाला येतील म्हणून सारं ..

अतिशय प्रसन्न मनाने सुप्रसिद्ध "चौसष्ठ योगिनी" मंदिरा कडे आम्ही दर्शनास गेलो, माझा या मंदिरात जाण्याचा दुसऱ्यांदा योग आला याचही आनंद समाधान वाटले,अर्धगोलाकार शिल्पकला चा उत्तम नमुना आणि देवीच्या 64 रूपाचे अप्रतिम दर्शन, प्राचीन मंदिर अद्भुत भासले. अंधार पडत आल्याने वेळ देता आला नाही,वाटेत बरीच भगवान विष्णूची व इतर छान मंदिर होती त्यानाही धावती भेट दिली. सप्रसिद्ध जैन मंदिर हेही जबलपूर चे आकर्षण आहे, खरेदीसाठी मोठी बाजारपेठ आहे, तिथल्या साड्या आणि मार्बल ची कलाकुसरीच्या वस्तू ,मिठाई असे सगळं बरेचसे घेण्यासारखं आहे. आमची पुन्हा परतीला जबलपूर भेट होतीच म्हणून फारसे काही खरेदी न करता आम्ही विश्रांती घेतली, ती पुढच्या जरा हटके ठिकाणी जाण्यासाठी.मनात उद्याची स्वप्न रंगवत आम्हाला गाढ निद्रेत जायला काहीच वेळ लागला नाही.


Rate this content
Log in