Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

BIPIN SANGLE

Horror Others


3  

BIPIN SANGLE

Horror Others


कजाग

कजाग

1 min 12K 1 min 12K

मी निवांत बसलो होतो. चंद्या आला. शंकर गेल्याचं सांगायला.

शंकर आमचा जवळचा मित्र. निर्व्यसनी माणूस. आमच्यासारखं नव्हतं! अन असा माणूस एकाएकी गेला होता. खूप वाईट वाटलं.


आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. लोक जमले होते. रडणाऱ्या बायका. त्यात त्याचीही बायको.

नंतर आम्ही बाहेर जाऊन शांतपणे बसलो. लोकांची बडबड आणि गडबड पाहात! थोड्या वेळाने सारं पार पडलं. आता निघायचं -

आणि त्याच्या बायकोने आकांत मांडला. ते पाहवत नव्हतं.


“बघ, कशी रडते साली! आयुष्यभर नवऱ्याला रडवलं आणि आता स्वतः रडतेय. कजाग बाई!“ चंद्या म्हणाला.

मी मान डोलवली.


बायका असंच करतात. अहो खरंच! मी गेलो होतो - तेव्हा माझीही बायको अशीच रडली होती. पार माझ्या अंगावर पडून!


Rate this content
Log in

More marathi story from BIPIN SANGLE

Similar marathi story from Horror