लोकसभा निवडणूकीची काही दिवसात आचारसंहिता लागेल व बिगुल वाजतील, त्यासंदर्भात काहींनी प्रचार सभा तर काहींनी बुत मिटींग घेणे सुरू केले. लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरू होण्यापुर्वीच आज महाराष्ट्रासह संपुर्ण देशभर विविध पक्ष व त्यांचे पक्षप्रमुख हे आपल्या पक्षाचा उमेदवार शोधण्यात गुंतले आहेत.
आचार संहिता लागू झाल्याबरोबर सर्व गोष्टीवर निर्बंध येतील. मात्र राजकीय पक्षांच्या राजकीय रणधुमाळीला सुरूवात होईल. 'तुम मुझे पैसे दो, मै तुम्हें उम्मेदवारी दुंगा...!' छुपी घोषणा पहायला मिळेल. ज्यांची नावे उमेदवार म्हणून जाहीर केली ते कामाला लागतील... आणि ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु 'निवडणूक लढवणार' आहेत त्यांची मात्र यादीसाठी शेवटपर्यंत बंडखोरांसह टांगती तलवार कायम असेल...! 'भाकरी' बदलल्या जाईल. म्हणजेच ऋतीक रोशन यांच्या एका चित्रपटातील गाण्याप्रमाणे "कभी इधर चला मै उधर चला, जाने कहा मैं किधर चला" अशी अवस्था होईल. त्यावेळी गाण्यातील शब्द हे आजच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळतील तेव्हा नवल वाटायला नको. कारण प्रत्येक कर्तव्यशुन्य व भ्रष्टाचारी लोकांनाच पक्ष व तिकिटाची गरज असते जे लोक प्रामाणिक व प्रामाणिकपणे आपले कार्य पुर्ण करतात त्यांना कोणत्याही पक्षाची अथवा पक्षाच्या तिकिटाची गरज नसते.
पक्षप्रमुखांना वटते की, आपला उमेदवार प्रंचड मताधिक्याने निवडून गेला पाहीजे. त्यादृष्टीकोनातुन ते उमेदवाराची चाचपणी करत असतात मात्र आज विचार कोला तर प्रत्येकालाच आमदार, खासदार होण्याचे स्वप्न पडताना दिसतात. कारण त्यांच्याजवळ असणा-या पैशांचा जोरावर ही स्वप्न त्यांना सतावत आहेत. आज चोहीकडे राजकारण हे पैशावाल्यांच किंवा मोठ्या लोकांच आहे असाच प्रचार - प्रसार केला जातो. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील तरुण तरूणी हे राजकारणाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वाचाळवीर, कर्तव्यशुन्य व भष्टाचारी लोकांच्या हातात सत्तेची सुत्र जात आहेत.
आचारसंहिता लागताच राजकीय पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जातील...! हा घटनाक्रम सुरू होईल. आचारसंहितेच्या अगोदरच काही पक्षी इकडून तिकडे... आणि तिकडून इकडे भुर्ररर करत उडत आहेत.' सकाळ' चा मुळ 'पक्ष' दुपारी दुसरा बदलून, संध्याकाळी तिसराच झेंडा हातात घेणारी 'जमात' अस्तित्वात येताना दिसत आहेत.
या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी भाजप मध्ये तर त्या मतदासंघाचे शिवसेनेचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात तर राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रतिनिधींचे वेगळे काही म्हणता येत नाही. त्यांची पण तीच अवस्था आहे. ज्यांचे हात रक्तरंजित किंवा भ्रटाचाराने बुरसटेले आहेत ते लोक सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात त्यामुळे त्यांचे आरोप उघडकीस येत नाहीत. त्यावर विरोधकांची काहीच प्रतिक्रिया नसते. म्हणजेच सत्ताधिश - विरोधक हे एकाच माळेचे मणी आहेत. कारण ते पण धुतल्या तांदळातले नाहीत, हे मात्र नक्की. मग प्रतिनिधींचे चेले किंवा विविध पक्षाचे झेंडेबहाद्दर म्हणतील की, सर्वच प्रतिनिधी सारखे नसतात तर मग त्यावेळी विरोधकही गप्प का असतात. विरोधक हे 'तेरी बी चुप्प अन् मेरी बी चुप्प' विरोधक असे म्हणून गप्प बसतात का ? हे आमच्या झेंडेक-यांना का समजत नसेल हा प्रश्न पडतो.
जर आमच्या झेंडेक-यांना राजकारण समजले तर ते भ्रष्टचार करणारे हात कलम करा ही मागणी करतील हे मात्र नक्की.
आमचे मतदार हे लोकशाहीत राजा आहेत पण आज तरी त्यांना निवडणुकीव्यतिरिक्त कवडीची किमंत नाही हे सत्य कोणताही पक्ष नाकारू शकत नाही. मग ही जाणिव आमच्या शेतकरी शेतमजूर यांच्या घरातील तरूणांना का होत नाही हा प्रश्न पडतो.
आमच्या तरूणांना एखाद्या पक्षांच्या जिल्हा, तालुका किंवा गावकमिटीचे एखादे पद देऊन त्यांचा पुर्णवेळ मोफत कार्यकर्ता म्हणून वापर करण्याची पक्की योजना या राजकीय पक्षांनी आखली आहे. याच तरूणांच्या जिवावर हे कर्तव्यशुन्य आमदार खासदार आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात जातात व स्वतःची पोळी भाजतात मात्र कार्यकत्यांच्या हातात काय तर गाजर देतात. तरीही आमच्या गरीब सर्वसामान्यांच्या घरातील तरूण बळी पडत आहेत. त्यामुळेच कर्तव्यशुन्य पक्षांचे व त्यांच्या पुढा-यांचे फावल्या जात आहे याबद्दल म्हणावसे वाटते की, जबतक चुतिये जिंदा तबतक अकलमंद भुकें नही मर सकते !.
वामनदादा म्हणत की, "संघटना हजार झाल्या नेते हजार झाले, कुणा म्हणावे आपुले, चेहरे हजार झाले, तु पाहिलेली स्वप्न पुर्ण झालीत का रे ! बाबा तुझ्या मताची माणसं मेलित का रे.!" ती माणसं शोधण्यासाठीच आपण आपल्या मताचा योग्य वापर करून वामणदादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मताची विचारांची माणसं शोधुन ते विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवायचे असतात मात्र आम्ही आपल्या विचारांचे उमेदवार शोधण्यापेक्षा त्या कर्तव्यशुन्य उमेदवाराची जात शोधून त्याला विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवतो. त्यामुळे आज चांगले वैचारीक लोक हे राजकारणापासून दूर फेकले जात आहेत.
आज प्रतिनिधींच्या हस्ते भुमिपुजन संमारभ व विकासकांमाचे लोकार्पण सोहळे हे महाराष्ट्रासह संपुर्ण देशात होत असताना दिसतात मात्र हे भुमिपुजन संपन्न होतेवेळी कोणताही शेतकरी शेतमजूर किंवा तरूण हा त्या भुमिपुजन करणा-या उदघाटकाला विरोध करून आज होणारे उदघान हे सरकारचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच का होते असा प्रतिप्रश्न का विचारत नाहीत हा प्रश्न पडतो.
उद्या काय होणार आहे हे कोणताही भविष्यकार सांगू शकत नाही किंवा ते खरे होऊच शकत नाही तर मग हे कर्तव्यशुन्य आमदार, खासदार भुमिपुजन करतेवेळी मतदारांना विविध आश्वासने देतात. त्यांचा व सरकारचा कार्यकाळ संपण्यासाठी बोटावर मोजण्याऐवढे दिवस बाकी असतानाच मतदारांवर आश्वासनांचा वर्षाव का ? म्हणजेच तहानलेल्या 'कोरडवाहू शेतीत पेरणी केल्यासारखा प्रकार होईल.' अथवा 'हरभरे खाल्ले आणि हात कोरडेच राहिले' हा राजकीय पॅटर्न आहे. हे आता आम्ही समजून घेतले पाहीजे. विकासकांमाचे भुमिपुजन करायचे होते तर सरकार स्थापन झाल्यानंतर एक - दोन वर्षात हे उद्धाटन करून त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याअगोदर हे काम पुर्णत्वास कसे जाईल याकडे प्रतिनिधींनी लक्ष दिले तर प्रतिनिधींना मतदारांकडे मतांची व पक्षाकडे तिकिटाची भिक मागण्याची वेळ येणार नाही.
हा राजकीय डाव ज्यांना समजण्यास ऊशिर झाला म्हणजेच धावण्याच्या शर्यतीत जे उशिरा धावले ते पराजित होणार...! हे ठरलेले आहे. मात्र अजून वेळ गेलेली नाही. माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील म्हणतात की, छत्रपती शिवरायांची शेतीप्रधान व सर्वसमावेशक राजव्यवस्था तसेच डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानास अभिप्रेत असणा-या शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी व मनुवाद्यांचे जहरी कट कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व बहूजनांनी एकत्र आले पाहीजे. त्यासाठी मतदान यत्रांवरील 'योग्य बटण दाबा' बस एवढंच.