कौटुंबिक कलह
कौटुंबिक कलह
एका ऊर्जावान, प्रतिभावान मुलाचा जन्म एका वायुसेना अधिका-याच्या कुंटुंबात झाला होता. वायुसेना अधिकारी हा एका साधारण गांवातला मुलगा होता. तो आपल्या कर्तृत्वाने वायुसेना अधिकरी बनला होता. त्याचा एका लष्करी मोहिमेमध्ये, त्याचे अपत्य अगदी लहान असतांनाच अकाली मृत्यु झाला होता. त्याने आपले मौल्यवान जीवन देशासाठी अर्पण केले होते. आता परिवारात त्याची विधवा पत्नी, मोठी मुलगी व लहान मुलगा होता. आई शिकली होती. आलेया भोगासी असावे सादर. ती एका शुर-वीर सैनिकाची पत्नी असल्यामुळे तीने आलेल्या संकटाला तोंड दिले आणी मुलांच्या भविष्यासाठी आपले जीवन पणाला लावले होते. मुलांना योग्य वळण आणी शिस्त लावुन, त्यांना या महान देशाचे उत्तम नागरिक बनवण्यात आपले बहुमुल्य योगदान दिले होते. आईने घेतलेल्या कष्टाची परता फेड म्हणुन दोन्ही आपत्यांनी चांगले शिक्षण प्राप्त केले होते. मुलाने विज्ञान शाखेत स्नातोकत्तरची पदवी मिळवली होती. मुलीला अचानक चांगले स्थळ चालुन आले होते. तेव्हाच योग्य निर्यण घेवुन तीचे हात पिवळे करुन दिले होते. तीने एक महत्वाची जवाबदारी पार पाडली होती.
मुलाने सुरुवातीला प्राध्यापकाची नौकरी करणे सुरु केले होते. त्याची महत्वाकांक्षा एक प्रथम श्रेणीचा अधिकारी होण्याची होती. प्रयत्नांती परेमेश्र्वर. त्याने संघ लोक सेवा आयोगाच्या परिक्षेची तैयारी केली होती. त्याला त्यात लगेच यश मिळाले होते. त्याची प्रथम श्रेणी अधिकारी पदावर भारत सरकारच्या एका वैज्ञानिक विभागात नियुक्ती झाली होती. त्याची नियुक्ती दिल्ली मुख्यालयात झाली होती. जन्मजात अत्यंत प्रतिभावान ,ऊर्जावान,कर्मठ असल्यामुळे त्याच्या कार्यामुळे विभाग प्रमुख त्याचे प्रखर प्रसंशक बनले होते. देशात सुचना प्रौद्योगिकीचे युग शुरु झाले होते. त्या मधे जगात, भारताचा सुचना प्रौद्योगिकीचा डंका वाजत होता. त्या अधिका-याची योग्यता पाहुन विभाग प्रमुखाने त्याला विभागाच्या संगणकीकरण करण्याचे महत्वपूर्ण कार्य सोपवले होते. विभागाच्या संगणकीकरणा सोबतच विभागाची वेबसाईट त्याने बनवली होती. त्या वेबसाई्ट वर दैनंदिन कार्यालयन कार्याची महत्वाची जनहितकारी माहिती देण्यात येत होती. त्यामुळे विभागाची उपयुकता आणि प्रतिष्ठा जनमानसात वाढली होती.
मुलगा होतकरु असल्यामुळे अनेक नातेवाईक मुलासाठी अनेक स्थळ मुलाच्या आईला सुचवत होते. त्यातील काही स्थळे आईच्या लक्ष्यात आली होती. तीने काही प्रस्ताव मुलाला सुचवले होते. मुलाला पण त्यातील एक स्थळ फारच पसंद आले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मुला विषयी बरिच चांगली माहिती वधु पक्षाला मिळाली होती. ते फक्त वर पक्षाच्या होकाराची व सहमतिची प्रतिक्षा करित होती. मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला होता. मुलाच्या मनी-ध्यानी जी अर्धांगीणी विषयीची रुपरेखा बिंबलेली होती. प्रत्येक्षात ती खरी उतरली होती. घरानेपण नावाजलेले होते.त्यात ती अतिसुंदर आणी शिकली सर्वगुण संपन्न असल्यामुळे मुलाने लगेच होकार दिला होता. व तो नंतर लगेच बाहुल्या वर चढला होता. नविन जोडपे आनंदाने आपला संसार सावरत व चालवत होते. अधिकारी कार्यालयन कामाच्या व्यापामुळे सकाळी जावुन उशिरा संध्याकाळी घरी येत होता. त्यामुळे त्याची पत्नि घरी बसुन कंटाळवाणी होत होती. तीने एका शाळेत शिक्षकेची नौकरी पतिच्या सहमतीने धरली होती.त्यांना दोन आपत्य पण झाली होती.
काही वर्षा नंतर कुंटुंबाने आपला गृह शहराच्या जवळ-पास जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अधिका-याने प्रयत्न पण सुरु केले होते. पण त्यात त्याला अर्धवट यश मिळाले होते. त्याला आपल्या गृह राज्यात, पण पुण्याला स्थानांतर मिळाले होते. चोर नाही तर चोरांची लंगोटी सही, यातच त्यांनी समाधान मानले होते. त्यांनी तीथे एक फ्लॅट पण घेतला होता. पण मुलांच्या शाळेच्या अडचनीमुळे ते कार्यालयाच्या वसाहतीतच राहत होते. संपूर्ण कुंटुंब आनंदाने राहत होते.
अधिका-याच्या अनुभागात त्याच्या हौद्याची कनिष्ठ अधिकारी तैनाती वर आली होती. दोघेही फार हुशार असल्यामुळे त्यांच्यात चांगला समन्वय घडुन आला होता. दोघांनी एका नविन प्रोजेक्टवर काम करण्याचे ठरविले होते. त्यासाठी ते मेहनत पण करित होते. प्रोजेक्टमुळे त्यांच्यात एकदम निकटता दिसत होती. इतर सहकार्यांना त्यांनी लावलेल्या चष्मामुळे वेगळेच दृष्य दिसायला लागले होते. कामाच्या ओझ्यामुळे अधिकारी नेहमीच व्यस्त व तनावग्रस्त दिसत होता. त्याचे घरात विशेष लक्ष्य राहत नव्हते. याची सारखी त्याची पत्नि तकरार पण कर होती. पण तो अधिकारी त्याकडे विशेष लक्ष्य व्यस्ततेमुळे देत नव्हता. पत्निचा गैर-समज सारखा वाढतच गेला होता. गैर-समज वाढवण्या साठी वसाहती मधील लोक खत पाणी सारखे घालत होते. तीने समस्याचे निराकरण करण्याचे बरेच प्रयत्न आपल्या परिने केले होते. पण अधिका-याला प्रोजेक्ट यशस्वी करण्याची लत लागली होती. त्यामुळे नेहमी सारखे तो तीच्या तकरारी कडे कान-डोळा करित होता . शेवटी तीने टोकाचा निर्णय घेतला होता. ती आपल्या मुलांना घेवुन जिथे तीचा भावाची कर्मभूमि होती तीथे निघुन गेली होती. तीथे तीने एका प्रख्यात शाळेत शिक्षकेची नौकरी धरली होती. तीचे मुलपण त्याच शाळेत शिकत होती. महिला अधिकारीचे त्या दरम्यान विवाह झाला होत.
अधिकारी आता एकटा पडला होता. त्याने प्रयत्न करुण आपली बदली तीथे करुण घेतली होती. तीथे त्याने एक नविन फ्लॉट पण घेतला होता. पण त्या फ्लॉटमधे तो आणी त्याची आई फक्त राहत होती. त्याने मुलांची संपूर्ण जवाबदारी घेतली होती. त्यासाठी तो अहोरात्र प्रयत्न करित होता. त्याच्या प्रयत्नाला यश पण आले होते. मोठया मुलाचे आय.आय .टी मधे निवड झाली होती. छोटा मुलगा पण त्याच मार्गावर लागला होता. दोन्ही मुले वडिलासारखे हुषार व गोंडस होती. पण ती मुले आई-वडिलांना एकत्र आणु शकले नव्हते. तो आपल्या पत्निचा गैर-समज मिटऊ शकला नव्हता. त्याच्या सोबत जी अधिकारी होती. तिने पण आपल्या पहिल्या पतिला घटस्पोट दिला होता. तीने दुसरे लग्न केले होते. ती आपल्या दुसरपण्या पतिसोबत विदेशात निघुन गेली होती. त्या अधिका-याला पुन्हा पदोन्नती मिळाली होती. तो शेवटी तैनाती वर पुण्याला निघुन गेला होता. जीवन हे मुल्यवान असते. ते हेकेखोरपणा करुन वाया कधीच घालवयाचे नसते. जीवनात जेव्हा अकारण काळाच्या ओघाने तडा बसत असतो. तेव्हाच काही तडजोड करने गरजेचे असते. तडजोड करणे म्हणजे आत्मसम्मान गमावने असे कधीच नसते. तो मुल्यहिन अंहकार बाजुला ठेवुन सार्थक जीवन जगण्याचे सुत्र असते. आता पुन्हा केव्हा त्याच्या जीवणात सुखी आनंदाचा सुर्योदय होईल हे तर नियतीलाच माहित असनार !.
