DrSujata Kute

Tragedy

3  

DrSujata Kute

Tragedy

काय होतीस तू? काय झालीस तू?

काय होतीस तू? काय झालीस तू?

3 mins
757


नेहमीप्रमाणे मोहनने सकाळी सकाळी आपल्या मालकिणीच्या घराचे दार ठोठावले... अर्धा तास झाला तो दार ठोठावत होता... पण दार उघडायला कुणी येत नव्हतं.... 


मोहनच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..... काही बरं वाईट तर झाले नाही ना.... तो चाहूल घेण्याचा प्रयत्न करू लागला होता पण त्याला काहीच चाहूल लागत नव्हती.... शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील विचारून झाले... शेवटी त्याने पोलिसांना फोन लावला.. 


पोलीस आले आणि पोलिसांनी दरवाजा तोडला... आतमध्ये बेडरूम मध्ये मोहनची मालकीन ज्युलीचा मृतदेह पडलेला होता.... ती अंदाजे 35वर्ष वयाची असेल... बेडरूममध्ये संशयास्पद असं काही नव्हतं... पोलिसांनी तिचं प्रेत पंचनामा करून उत्तरीय तपासणी साठी सरकारी दवाखान्यात पाठवून दिले होते... 


तिच्या पोस्टमॉर्टम मध्ये तिने खूप जास्त नशा केल्याने तिचा मृत्यू झाला होता.... असे कळाले होते....तिचं नशेत राहणं हे तिच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी काही नवीन नव्हतं... का झालं होतं असं... ज्युलीचे घर पाहून असे वाटत होते की तिला कशाचीच कमी नव्हते... मग तरी तिचं नशेत राहणं वगैरे... 


ज्युली लहानपणापासून खूप हुशार अगदीच लाडाकोडात वाढलेली होती.... त्यांच्या घरी खूप श्रीमंती होती... कसलीच कमी नव्हती.... ज्युलीला जे पाहिजे ते मिळत होते अगदीच तोंड उघडले की सगळ्या गोष्टींची पूर्तता होत असे... 


त्यात ज्युली शाळेमध्ये अभ्यासात हुशार... वर्गामध्ये नेहमीच पहिला नंबर असायचा... त्यामुळे ती मुख्याध्यापक आणि शिक्षकांची खूप लाडकी होती...शेजाऱ्या पाजाऱ्यांची, नातेवाइकांची खूप लाडकी होती... ज्युलीला नाही किंवा अपयश हा शब्दच माहिती नव्हता.. 


ती बारावी मध्ये असतानाच ज्युली एका मध्यमवर्गीय जॉनच्या प्रेमात पडली... एकाच धर्माचे असल्याने त्यांच्या दोघांच्याही घरून मान्यता मिळाली होती ...तिला नकार माहिती नव्हता... ती प्रेमामध्ये इतकी आंधळी झाली होती की तिने शिक्षण अर्धवट सोडून लग्नाला महत्व दिले होते...आणि लवकरच ज्युली आणि जॉनचे लग्न झाले... 


ज्युली आणि जॉनचा सुखाचा संसार सुरु झाला होता... त्यातच ज्युलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला...दिवसामागून दिवस जात होते...ज्युलीची मुलगी टीना आता आठ वर्षांची झाली होती.... 


एक दिवस अचानक जॉनला ऑफिसवरून घरी येताना खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचे दोन्ही पाय कंबरेपासून निकामी झाले होते... त्यामुळे आता त्याला त्याची नौकरी गमवावी लागली होती.. 


ज्युली आणि टीना या पूर्णपणे जॉनवर अवलंबून होत्या... त्यामुळे आता त्यांचे पूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते... त्यावर उपाय म्हणून जॉनच्या वडीलांनी ज्युलीला माहेरची वाट दाखवली... 


ज्युली तिच्या सासऱ्यांना विनवणी करत होती... मी अश्याही परिस्थितीत कसंबसं राहून घेईल पण तूम्ही मला इथून पाठवू नका... त्यावर तिचे सासरे म्हणाले सगळे सोंग करता येतात पण पैश्याचं सोंग नाही करता येत.... मी तूला आणि टीनाला नाही पोसू शकत... 


ज्युलीला आयुष्यात मिळालेला हा पहिला नकार होता.... ती स्वतःच्या पायावर उभी नव्हती त्यामूळे आता या क्षणाला तरी तीला कोणावर तरी अवलंबून राहावे लागत होते... काडीमात्र इच्छा नसताना तिला टिनाला घेऊन माहेरी यावे लागले....

सासऱ्याने दिलेला नकार हा ज्युलीला पचला नव्हता... 


पहिल्यांदा काहीतरी तिच्या मनाविरुद्ध झाले होते.... ज्युली सैरभैर झाली... तिला हे आयुष्याचं खूप मोठं अपयश वाटायला लागलं... परिणामी ती पब,डिस्को, या मध्ये जाऊ लागली... धूम्रपान, मध्यपान,ड्रग, असा विविध प्रकारचा नशा करू लागली... अश्या प्रकारे तिचा दिनक्रम सुरु झाला होता... 


ज्युलीचे आईवडील सुरुवातीला ज्युली खूप दुःखी आहे म्हणून तीचे वागणे सहन करत होते.... पण दिवसेंदिवस ज्युलीचे नशा प्रकरण वाढत चालले होते.... सुरुवातीला रात्री नशा करणारी ज्युली आता दिवसाही नशा करू लागली होती... 

पब मध्ये तिची ओळख काही वाया गेलेल्या आणि गुंड लोकांशी झाली.... ती आता गुंडागर्दी देखील करू लागली होती.... कळत नकळत ती पूर्णपणे गुंड प्रवृत्तीकडे वळाली होती... 

ज्युलीच्या अश्या वागण्याने तिचा भाऊ आणि वहिनी देखील त्या घरापासून विभक्त झाले होते.... 


कसल्यातरी संशयावरून तिने भावाला मारण्यासाठी गुंड देखील पाठवले होते..... 


ज्युलीचे असे वागणे आता तिच्या आईवडिलांना देखील पटत नव्हतं... एक दिवस ज्युलीच्या आईने तिला घरी नशा करण्यापासून रोखले तर ज्युलीने आईला रागात ढकलून दिले... ज्युलीच्या आईचे डोके भिंतीला आपटले गेले... आणि त्यातच तिच्या आईचा मृत्यू झाला.. .. 


ज्युली आता एकदम रानटी बनली होती... आई गेल्याने तिच्या वागण्यात कसलाच फरक पडला नाही.... पुराव्या अभावी तीला शिक्षा झाली नाही.... पण या वातावरणाचा परिणाम ज्युलीच्या वडिलांवर आणि टीनावर झाला.... 


टिनाने वातावरणाला कंटाळून वयाच्या बाराव्या वर्षी आत्महत्या केली आणि ज्युलीच्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम होऊन सहा महिन्यांनी ते स्वर्गवासी झाले.... 

आणि..... ज्युली शेवटी एकटीच होती.... घरात मरून पडली तरी तब्बल बारा, चौदा तासानंतर ते कळाले होते... 


तात्पर्य : 1)मुलांना अपयश पचवायला शिकवा

2) मुलीने स्वावलंबी बनलं पाहिजे 3)मुलांना पाहीजे त्या वेळेस सगळ्याच गोष्टी मिळतील अशी सवय लावू नका 



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy