काटेरी तार
काटेरी तार
नवीन-नवीन सूचना, गोष्टी,तथ्य जाणून घ्रेण्याची जिज्ञासा मानवात जन्म जातच असते. तो नेहमी आसपास घडणारया घटना कडे नेहमी बारकाई ने लक्ष्य देतच असतो. मानवा जवळ अन्य प्राण्या पेक्षा जास्त जागृत चौकस बुध्दी असल्यामुळे तो प्रकृतिने निर्माण केलेल्या प्राणी संघा मध्ये सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. या बद्द्ल कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळे आज मनुष्य रानटी युगातुन पाषाण युगात,व पाषाण युगातुन कृषियुग़ात ,आणी सध्या सुसंस्कृत आधुनिक विज्ञान युगात त्याने झेप घेतली आहे. मानवी आवश्यकता हीच खरी आविष्काराची जननी आहे. प्रत्येक मनुष्य हा काही न काही आपल्या क्षमतेनुसार काही न काही संशोधन हा करतच असतो. जेव्हा हे संशोधन वैज्ञानिक बाबी वर आधारित असते आणी त्याच्या मागे काही वैज्ञानिक आधार असते. तेव्हा हे संशोधन सर्व मानवाच्या उपयोगाचे ठरु शकते. अन्यथा ज्या संशोधनाची योग्य वैज्ञानिक तपासणी करण्यात येत नाही. आणी त्याच्या वर विश्वास करुन सारखे आपल्या वर किंवा दुसऱ्यावर प्रयोग करत राहल्याने कसे जीवा वर बेतते. हे आपण या घटनेतुन शिकणार आहो.
एक नामवंत वकिल होते.ते आपल्या वकिलीच्या व्यवसाया सोबत काही मानवी शरीरविषयक संशोधनाचा त्यांना फार छंद होता. ते आपल्या परिने आपल्या वर निर-निराळे प्रयोग करत असे. तसे पहिले तर हा त्यांचा छंद सर्वान पेक्षा विलक्षण होता. मनुष्य असे छंद भिती पाळी स्वःत वर करत नाही. आज ही मेडिकल सांयस मध्ये कोणत्याही संशोधन हे सरळ मानवार न करता उंदिरा वर केले जाते. आनी नंतरच त्याच्या उपयोग मनुष्या वर करण्यात येतो. वकिल साहेबाना स्वास्थ सबंधी कोणची ही समस्या जर त्यांना स्वःत साठी जानवली कि ते आपले प्रयोग करने सुरु कराये. मग त्यांना ताप, पोटदुःखी, डोकेडुःखी किया अन्य शारिरीक समस्या असो. हे सर्व घडत असतांना ,ते डॉक्टर कडे न जाता त्यांना त्या वेळी काय खावयासे वाटते ते पादार्थ किंवा अन्य खाद्य पदार्थ चे नेमके सेवन करायचे. त्याचा परिणाम नेहमी त्यांच्या साठी सकारात्मक असायचा.या प्रयोगा मुळे त्यांची स्वास्थ समस्या नेहमीच बरी होत असे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दिवसाने दिवस वाढतच गेला होता. हा प्रयोग ते हळू-हळू आपल्या मित्र मंडळी वर आणी शेजा-या- पाजा-या वर पण कराचे. बरेच वेळा याचे परिणाम त्यांचा बाजुनी लागायचे. अशा प्रकारे त्यांचा आत्मविश्वास सतत वाढ्तच गेला होता.
दुसरी विलक्षण गोष्ट त्यांचा बाबतीत नमुद करायची झाली तर ती म्हणजे त्यांचा ज्योतिष्य शास्त्रा वर असणारा दृढ विश्र्वास .एक नामी ज्योतिष्याने त्यांचे दिर्घ आयुष्य भाकित केले होते. त्यांचा या दिर्घ आयुष्या वर इतका विश्र्वास होता कि काही होवो आपल्या इतके वर्ष जगनेच आहे. त्यांचे ज्योतिष्याने निर्धारित केलेले आयुष्य ते कोणताही परिस्थितिच जगनार म्हणजे जगनार !. या दृढ विश्वासामुले ते आपल्या स्वास्थ संबंधी समस्या वर कधीही कोण्या डॉक्टर कडे परामर्श घेण्यास जात नव्हते.ते आपले प्रयोग आपल्या वरच नेहमी करत असायचे.आणी इतरांना पण तसा सल्ला देत राहत होते.
काही वर्षानंतर त्याना काही मोठी शारिरीक समस्या उत्पन्न झाली. नेहमी प्रमाणे त्यांनी आपले उपचार सुरु ठेवले होते. त्यांची जी खाण्याची इच्छा होत असे ते त्याचे सेवन करित असे. पण यावेळेस त्यांच्या प्रयोगाला यश येत नव्हतेच. त्यांचा आजार बराच होत नव्हता.पण ते डॉक्टरकडे जायला तयारच होत नव्हते. कदाचित याचे कारण त्यांचा असलेला ज्योतिष्यशास्त्रावरचा अंधविश्र्वास आणी आपल्या संशोधनच्या प्रति अवैज्ञानिक दृष्टिकोण. त्यांच्यात या गोष्टीमुळे निर्माण झालेल्या न्यूनगंडामुळे ते मेडिकल सायंसने केलेल्या प्रगतीचा उपयोग करु इच्छित नव्हते.
शेवटी त्यांच्या इच्छे विरुध्द त्यांच्या परिवाराने व मित्र मंडळीने त्यांना दवाखाण्यात भरती केले. परिक्षणा नंतर त्यांना पोटाचा मोठा आजार झाल्यामुळे त्यांची प्रकृति दिवसे ने दिवस बिघडतच चालली होती. आणी आजारापणामुळे व योग्य उपचार न मिळाल्याने बिमारी शेवटच्या टप्यात पोहचली होती.आता त्यांचा उपचार करणे डॉक्टरांच्या आवक्या बाहेरचे झाले होते. डॉक्टरांनी आपले हात वर केले. डॉक्टरच्या समुहाचे मुखियाने त्यांना जेव्हा प्रश्न केला कि आपण वेळेत उपचार घेण्यासाठी कां आले नाही.? तेव्हा त्यांनी आपल्या संशोधना बद्द्ल सांगितले. आणी त्यांचा असलेला ज्योतिष्य शास्त्रा वरचा विश्वास.
तेव्हा डॉकटर म्हाणले तुम्हच्या संशोधना बध्दल आम्ही पूर्ण पणे सहमत नाही. एक तथ्य आहे कि आपले शरिर काही समस्या निर्मान झाल्या वर स्वःत ठिक करण्याचा प्रयत्न करित असतो. कधी –कधी ती समस्या कालांतराने दुरस्त होत असते. पण हे सर्वच समस्या वर शक्य नसते. त्याला नेहमीची जर मेडिकल सायंसच्या संशोधनाची साथ मिळाली तर ती समस्या किंवा बिमारी लगेच दूर होऊ शक्ते. अन्यथा ती जीवावर बेतू शक्ते.जसे तुम्हच्या बाबतीत झाले आहे.
तुम्हाचा ज्योतिष्यशास्त्रा वर असणारा विश्र्वासा बध्दल आम्हाला त्याचा विरोध करायचा नाही. आपले म्हणने किंवा विश्वासा होता कि ज्योतिष्यशास्त्रानुसार आपल्याला दिर्घ आयुष्य लाभले होते. ते कदाचित सत्य पण असु शक्ते. याचा मी विरोध करणार नाही. आपन दैनंदिन जीवनात शरिर ढाकण्यासठी वस्त्र विकत घेतो. ते वस्त्र निर-निराळ्या कंपनीचे बाजारात उपलब्ध असातात. काही कंपन्या आपल्या वस्त्राची दिर्घ काळ टिकन्याची हमी पण देतात. त्यासाठी आपण अधीक पैसे पण देतो. समजा जर असे महागडे वस्त्र आपण धुतल्या नंतर चुकिने काटेरी तारे वर वाळण्या साठी टाकले .आणी सुकल्या नंतर विशेष काळजी न घेता किंवा अलगरजी पणा मुळे सरकर ओढले. तर काय होणार? असा प्रश्न डॉकटर ने आपल्या रुग्ण्याला केला?. तेव्हा रुग्ण म्हणाला. कापड नक्कीच फाटणार. नंतर डॉक्टरांनी त्यांना पुढचा प्रश्न केला. कंपनीने तर कपड्याची दिर्घकाळ टिकण्याची हमी दिला आहे .त्याचे काय? तेव्हा लगेच रुग्ण्याच्या आपली चूक लक्षात आली. आणी मी चुकलो असे दुःखाचे उदगार त्याने व्यक्त केले.
“कधी –कधी आपला आत्मविश्र्वास जर वैज्ञानिक नसला तर तो आत्मविश्र्वास आपल्या साठी धोकादायक ठरु शक्तो.”
