Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Shobha Wagle

Tragedy


3  

Shobha Wagle

Tragedy


ज्योत

ज्योत

1 min 247 1 min 247

दिव्या दिव्यांची ज्योत सांगते

तुमची आमची नाती

लोपूनी स्वतःस सांगते

उजेड तवसाठी..

पेटणारी ज्योत ही एका स्त्री जीवाचीच हकिकत असते. ह्या ज्योती सारखीच स्त्री ही स्वतः आपल्या संसाराकरता खपत असते. 


रमा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली मुलगी होती. शेतीची कामे असल्यामुळे आईवडील शेतात राबायचे व रमा छोट्या भावंडांना घरात सांभाळायाची. आईला स्वयंपाक करायला मदत करायची तसेच शेतीत ही हातभार लावायची. तिची हुशारी, कामसूपणा पाहून गावच्या संरपंचांनी आपल्या मुलाकरता तिला मागणी घातली. जोडे न झिजवता हाती आलेले स्थळ जाऊ द्यायचे नाही म्हणून लगेच तिच्या वडिलांनी तिचे लग्न ही लावले. त्याकरता त्याने आपल्या जमनीचा तुकडा गहाण टाकला होता.


रमा सासरी छान रमली. सर्वांचे मान पान राखू लागली. सासू सासरे ही चांगलेच होते पण जी व्यक्ती नीट असायला हवी ती मात्र नव्हती. ती म्हणजे तिचा नवरा शेखर. शेखर एक वाया गेलेला मुलगा होता. तो शहरात नोकरी करत होता. तो सगळ्या वाईट सवयीच्या आहारी गेला होता. याची चुणचुण त्याच्या आईबापाला लागली होती. त्याची नोकरी सुटली होती. त्याला सुधारायचे म्हणजे दोनाचे चार हात करायला हवे, म्हणून घाई घाईत त्याचे रमाशी लग्न लावून दिले. 


रमाच्या वडिलांनी फक्त आईबापाकडे पाहून मुलीचे लग्न जुळवले. शेखर सुधारण्या ऐवजी जास्तच बिघडला आणि त्या धक्क्याने त्याच्या आईवडिलांनी हाय खाल्ली. रमाला दोन मुलांसह व्यसनी नवऱ्या बरोबर संसार करताना नाकी नऊ येवू लागले. तरी एक स्त्री, एक आई, एक पत्नी ह्या नात्याने ती संसारात ज्योती सारखी तेवत राहिली. जो पर्यंत जीव असेल, तेल असेल, तो पर्यंत ती अशीच तेवत राहील.


Rate this content
Log in

More marathi story from Shobha Wagle

Similar marathi story from Tragedy