STORYMIRROR

Kalyani Deshpande

Horror

3  

Kalyani Deshpande

Horror

जोसेफाईन भाग पाच

जोसेफाईन भाग पाच

3 mins
39


सुमित आणि सुपर्णा बाहेर डिनर साठी निघून गेले. घरात पुन्हा काहीतरी ठोकण्याचा आवाज सुरु झाला.


डिनर आटोपून सुमित सुपर्णा लॉन्ग ड्राईव्ह साठी गेले. ते झाल्यावर घरी यायला त्यांना अकराचं वाजले. दुसऱ्या दिवशी सुट्टीच असल्याने ते निवांत होते. झोपे झोपेपर्यंत रात्रीचे बारा वाजले. सुपरणा तर गाढ झोपी गेली पण नवीन ठिकाणी सुमितला काही केल्या झोप येईना. तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. थोड्या वेळाने थोडी मोकळी हवा खावी ह्या विचाराने तो त्यांच्या बेडरूम च्या बाल्कनीत मोकळी हवा खायला उभा राहिला.


सगळीकडे मस्त वातावरण होते, छान हवा सुटली होती. आकाशात चंद्र चांदण्या लुकलूकत होत्या. सुमित मस्त शीळ घालत इकडे तिकडे बघत होता तेवढ्यात......


एका ठिकाणी त्याची नजर गेली आणि तिथेच खिळली. अगदी समोर थोड्या अंतरावर असलेल्या एका बाल्कनीत एक कुत्रं अत्यंत भेसूर आवाजात रडत होतं. त्या निरव शांततेत तो आवाज फारच खराब वाटत होता. आणि त्या घराचे दारे सताड उघडे असून ढणढण लाईट्स सुरु होते.


सुमित ला ते कसंसच वाटलं त्यामुळे त्याने बाल्कनीचे दार लावून घेतले आणि तो आत बेडवर येऊन बसला. आता तो झोपण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात त्याला बैठकीतून खिळे ठोकण्याचा आवाज येऊ लागला. तो ताडकन बिछान्यात उठून बसला. हळूहळू कानोसा घेत तो बैठकीत जाऊ लागला. जसजसा तो हॉल च्या दिशेने जाऊ लागला तसतसा ठोकण्याचा आवाज कमी होतं होतं बंद झाला.


त्याने हॉल मध्ये लाईट लावून बघितले पण कशाचाच मागणूस नव्हता. तो पुन्हा बेडरूम कडे वळला आणि पलंगावर येऊन बसला. तोपर्यंत साडे बारा वाजून गेले होते.


पाच-सात मिनिट झाले नसतील कि सुमितला कोणीतरी पाय घासत येत आहे असा आवाज येऊ लागला. तो आवाज हॉल मधून येत असून हळू हळू मोठा होऊ लागला. जसे कोणीतरी हॉल मधून बेडरूम मध्ये पाय घासत येत होते.


आता मात्र सुमितची पाचावर धारण बसली. तो डोळे मोठमोठे करून बैठकीच्या दिशेने बघू लागला. तो आवाज जवळ आणखी जवळ य

ेऊ लागला. सुमितच्या हृदयाची धडधड वाढली. तो अगदी डोळे फाडफाडून समोर बघू लागला पण त्याला काहीच दिसेना. आणि एकदम त्याला त्याच्या नाकाजवळ एक उग्र दर्प जाणवू लागला. इतका उग्र दर्प कि त्याला श्वास घेणेही जड जाऊ लागलं. तो उठला आणि त्याने बेडरूम चा लाईट लावला. लाईट लावल्याने सुपर्णा उठून बसली.


"अरे! काय झालं? लाईट का लावला?", सुपर्णा आश्चर्यने म्हणाली.


थोडावेळ काय बोलावे हे न सुचून सुमित गप्प राहिला.

" अरे मी तुला विचारतेय सुमित, काय झालं? "


"अगं! काहीतरी विचित्र वाटतेय मला. झोपही येत नही आणि चित्रविचित्र आवाज येतायेत.", सुमित अडखळत म्हणाला.


" अरे नवीन जागा आहे न ही म्हणून तुला झोप येत नाही पण हळूहळू होईल तुला सवय ह्या जागेची. चल तू झोपण्याचा प्रयत्न कर. तू झोपल्यावर मी लाईट बंद करून झोपेन. झोप आता तू. ", सुपर्णा


सुमित बिछान्यात पहुडला आणि मग तो आणि सुपर्णा गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता सुमितला झोप लागून गेली. त्यानंतर सुपर्णा सुद्धा झोपी गेली लाईट तसाच सुरु ठेवून. त्यानंतर रात्रीचे साधारण दोन वाजले असतील. Sumit-सुपरणा तर गाढ झोपी गेले होते पण त्यांच्या बेडरूम ला असलेल्या बाल्कनीचे दार मात्र आपोआप उघडले. बाल्कनीत एक पांढरी आकृती उभी राहिली. संपूर्ण पांढरी फट्ट आकृती जिच्या पायापर्यंत लांबच लांब केस होते ती बघत होती थेट समोर असलेल्या बाल्कनीत उभ्या असणाऱ्या त्या काळ्या कुट्ट आकृतिकडे. जिथे काही वेळापूर्वी एक भेसूर कुत्रं रडत होतं तिथेच आता एक बुजगावण्या प्रमाणे एक काळी आकृती दिसत होती. त्या पांढरी आणि काळी आकृती एकमेकांकडे एकटक बघत होत्या. ती काळी आकृती होती जोसेफाईन डिसुझा ची तर ती काळी आकृती होती तन्मय लिमटे ची.


कितीवेळ त्या आकृत्या बाल्कनीत होत्या माहित नाही पण नंतर पहाट झाली आणि बाल्कनीच्या सताड उघड्या दारामधून येणाऱ्या गार वाऱ्याने मात्र सुमित सुपर्णा ला जाग आली. पहाटेचे सहा वाजले होते.


(क्रमश:)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror