STORYMIRROR

Kalyani Deshpande

Others

2  

Kalyani Deshpande

Others

मंगरुळ नाथ माझे गाव

मंगरुळ नाथ माझे गाव

1 min
13

मंगरुळनाथ हे माझे गाव आहे.

मंगरुळनाथ हे गाव विदर्भातील वाशिम जिल्ह्यात सामावलेले आहे.

मंगरुळनाथ ह्या गावात बिरबल नाथ महाराज हे ग्राम दैवत आहेत

त्यांच्या प्रित्यर्थ दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महोत्सव आणि मोठी यात्रा असते.


यात्रेत शॉपिंग मॉल प्रमाणे अनेक दुकानं असतात.

ज्यात खाण्या पिण्याच्या पदार्थांपासून आबाल वृद्धांना आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तू मिळतात.


लहान मुलांसाठी झुले ,आकाश पाळणे,चक्री असे खेळ असतात. त्याचप्रमाणे मोठ्यांसाठी सिनेमा टॉकीज पण असतात. 


बंदुकीने फुगे फोडणे,वस्तूंवर रिंग टाकून ती वस्तू जिंकणे, अजगारांचे प्रदर्शन,सर्कस असे सर्व यात्रेत उपलब्ध असते. यात्रा साधारण एक महिना चालते.

यात्रेत सगळे जण आनंदी असतात.


मंगरूळ नाथ गावाचे क्षेत्रफळ 4.33 sq. मीटर आहे. तसेच लोकसंख्या लाखभर आहे.

गावात प्राथमिक,माध्यमिक शाळा,कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालये सुध्धा आहेत. 


गावात खालील प्रमाणे काही प्रेक्षणीय धार्मिक स्थळे आहेत.

श्री बिरबलनाथ महाराज मंदिर, मंगरूळनाथ

दादा हयात कलंदर दर्गा,मंगरूळनाथ

श्री महादेव मंदिर आणि पाण्याचे कुंड, येडशी, मंगरुळनाथ

श्री संत भायजी महाराज संस्थान, तऱ्हाळा, मंगरूळनाथ

श्री कान्होबा मंदिर,सावरगाव, मंगरूळनाथ (नवनाथांपैकी एक असलेले श्री कानिफनाथ ह्यांचे मंदिर)

श्री वामन महाराज आश्रम, कोलार, मंगरूळनाथ

मा जगदंबा भवानी मंदिर, पारवा, मंगरूळनाथ


त्याचप्रमाणे मंगरूळ नाथ तालुक्यात 

सेलू बाजार, फालेगाव, बेल्खेड, पिंपळ खूटा, मानोलि, पारडी, येडशि, सोनखास, सावरगाव, शेंदुर्जना आणि अनेक अशी गावे आहेत. 


असे हे माझे छोटे गाव मला अत्यंत प्रिय आहे.







Rate this content
Log in