Kalyani Deshpande

Horror

3  

Kalyani Deshpande

Horror

जोसेफाईन भाग चार

जोसेफाईन भाग चार

3 mins
22


आज बऱ्याच महिन्यांनी त्या प्रसिद्ध सोसायटीतील त्या 1002 फ्लॅटचे दार कर करत उघडले.

ठसका लागत खोकलत खोकलत काहीजण फ्लॅटची एकेक खोली साफ करू लागले. सगळीकडून फ्लॅट मध्ये कुबट वास येत होता. सगळ्या खिडक्यांना जळमटे झाले होते. संपूर्ण दिवस घालवून तो फ्लॅट स्वच्छ करण्यात आला. कारणही तसंच होतं. आता नवीन बिऱ्हाड त्या फ्लॅटमध्ये राहायला येणार होते.


बरेच महिने तो फ्लॅट रिकामाच होता. अनेक कुटुंब त्यात राहून गेले पण टिकले एकही नाही. कारण एकच जोसेफाईन!!


जोसेफाईन चे अस्तित्व कोणालाही तिथे टिकू देत नव्हते.


अनेकांना जोसेफाईन चे पिशाच्च त्या फ्लॅट मध्ये भटकताना दिसले होते.

आता ह्या बिऱ्हाडाला काय अनुभव येणार होता काय माहित?


एका शुभ मुहूर्तावर घरी पूजा वगैरे करून सुबोध आणि सुपर्णा त्या 1002 फ्लॅटमध्ये राहायला आले. एक दिवस तर पूर्ण सामान लावण्यातच गेला. पाहता पाहता संध्याकाळ झाली. सुपर्णा ने संध्याकाळ चा देवाजवळ दिवा लावला आणि ती प्रत्येक खोलीतील लाईट्स लावायला गेली. सुबोध खाली काही सामान आणायला गेला होता. सगळ्या खोलीतील दिवे लावल्यावर ती बैठकीत येऊन बसली. खोलीतील दिवे लावताना तिचे लक्ष नव्हते नाहीतर तिला तिथल्या आरश्यात जोसेफाईन 


चे पिशाच्च नक्कीच दिसलें असते, उलटे लटकलेले, केस पारंब्यांसारखे लोम्बलेले. असो.



सुपर्णा ने तिचे नेहमीचे काही स्तोत्र म्हंटले. अचानक आतल्या बेडरूम मध्ये काहीतरी पडल्याचा तिला आवाज आला म्हणून ती आत जायला वळली तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर दारात सुबोध सामानाच्या पिशव्या घेऊन उभा होता. तिने लगेच त्याच्या हातातील काही पिशव्या घेतल्या आणि आत किचन मध्ये ओट्यावर ठेवून दिल्या. तेवढ्यात त्यांना आतल्या बेडरूम मध्ये काहीतरी ठोकण्याचा आवाज आला.


"कशाचा आवाज येतोय काय माहित? मघाशी सुद्धा काहीतरी पडल्याचा आवाज आला होता. मी जाऊन बघून येते.", सुपर्णा म्हणाली.


सुपर्णा आत बघायला गेली पण तिला काहीच दिसलें नाही आणि दिसणार तरी कसे कारण तिचा देवगण होता. नाहीतर तिला दिसलें असते कि उलटी लटकलेली जोसेफाईन भिंतीला खिळे ठोकत होती.


सुपर्णा बाहेर येत म्हणाली,"काही नाही रे, दुसरा कुठला तरी आवाज असेल."


"बरं ते असू दे, मला सांग आज आपण डिनर साठी बाहेर जायचं कि घरीच बनवायचं", सुबोध 


"मला वाटते उद्या पासून घरी बनवू आज बाहेरच जाऊ. चल मी माझं आटोपते ", असं म्हणून सुपरणा बेडरूम मध्ये गेली जिथे जोसेफाईन आधीच खट्ट सावधान पवित्र्यात उभी होती पण हातावर कारण ती उलटी होती. तिचे केस खाली लोम्बत होते, तिने मोठे झुमके घातले होते. भरपूर काजळ आणि लिपस्टिक लावले होते परंतू काजळ तिने ओठांना आणि लिपस्टिक पांढऱ्या शुभ्र डोळ्यांना लावले होते. त्यामुळे ती अत्यंत भयावह दिसत होती. जिवंत असताना जोसेफाईन ला मेकअप ची भारी आवड होती. अगदी खाली दुकानात जायचं म्हंटल तरी ती खूप मेकअप करून जायची.


सुपर्णा ने साडी बदलली आणि नंतर ती आरश्यात बघून वेणी घालू लागली तेवढ्यात तिच्या नाकाजवळ एक उग्र दर्प जाणवला. ती मोठ्याने सुबोध ला ओरडून म्हणाली

"बापरे! किती उग्र सेंट लावलायेस"


"अरे मी तर केव्हाचा सोफ्यावर बसलेलो आहे. मी नाही कुठला सेंट लावला.", सुबोध


कमाल आहे मग वास कुठून येतोय हा असा विचार करून ती पुन्हा वेणी घालू लागली. आरश्यात मात्र अत्यंत भीषण चित्र होतं. इकडे सुंदर सुपर्णा वेणी घालत होती आणि तिच्या चेहऱ्याजवळ म्हणजे अगदी जवळ जोसेफाईन चा बटबटीत काजळ लावलेला भरपूर लिपस्टिक लावलेला पांढरे शुभ्र डोळे असलेला, मोठा काळा चष्मा असलेला डोक्यावर एकही केस नसलेला अत्यंत विद्रुप चेहरा होता आणि तो सुपर्णा कडे एकटक पाहत होता. 




Rate this content
Log in

Similar marathi story from Horror