रामदासी सर

Action Inspirational

3.5  

रामदासी सर

Action Inspirational

झुले उंच माझा झोका

झुले उंच माझा झोका

2 mins
259


    कोकण आणि महाकाय सागर, खळखळत्या लाटा, आंबा, काजू, फणसाच्या बागा या सर्वांचे अतूट समीकरण... आणि याच कोकणामध्ये देवरुख या गावात राहणारी मनाली एका बाळबोध घराण्यात वाढलेली एक सामान्य मुलगी... स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झुलणारी.. प्रचंड वाचनवेडी..M.A.च्या प्रथम वर्षाचा अभ्यास करत होती..तेवढ्यात आई ची खालून हाक आली.. मनाली... अग.. ए मनाली...काय ग आई ... अग आज लक्ष्मीपूजन आहे. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ एक्या जागी बसून वाचून पूर्ण करशील का? चांगला नवरा मिळेल बग तुला... काय ग आई, नवरा नवरा लावले आहेस.. मला अजून खुप शिकायचे आहे. नोकरी करायची आहे. बरोबर आहे तुझे पण करुन तर पाहूया ना.झाला तर फायदाच होणार आहे न आपला..

   त्या दिवशी तिने आई चे ऐकले.. आणि वाचून काढला कि ग्रंथ... आणि खरंच बोलायला आणि फुलायला गाठ पडावी तसें अवघ्या पंधरा दिवसात मला स्वानंद देशपांडे यांचे स्थळ सांगून आले.. मोठे घराणे होते. ते एका नामांकित शाळेत शिक्षक होते.. प्रचंड हुशार, हरहुनर्री व्यक्तिमत्व होते.. त्यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटे से खेडेगाव होते. पण त्यांचे बहुतांशी वास्तव सिंधुदुर्ग मध्ये होते.. घरी एकत्र कुटुंब होते.. शेतीवाडी, घरदार सारे काही होते.. कशाचीच कमतरता नव्हती.पत्रिका पण योग्य गुणांनी जुळली..मग काय आमच्या घरचे झाले कि तयार..आणि त्यांच्याही...दाखवण्याचा कार्यक्रम ठरला..पसंता पसंती झाली.. साखरपुडा ठरवला गेला.... आणि एका नवीन वळणाला सुरुवात झाली...मोरपीसाप्रमाणे सप्तरंगी उधळण झाली दोघांच्या आयुष्यात. फोनाफोनी, भेटीगाठी सुरु झाल्या..लांबची तारीख ठरली होती लग्नाची. खुप वेळ मिळणार होता एकमेकांना समजून, जाणून घेण्यासाठी..कळलेच नाही कसा एवढा मोठा कालावधी निमिषात निघून गेला.. आली लग्नघटी समीप...खुप धूमधडक्यात झाले हो लग्न... सगळे खुप सुखावले होते.. दोघेही एकमेकाला अनुकूल होते.. समजून उमजून घेत होते.... सासर -माहेर दोन्हीकडची मंडळी खूपच सहकार्य करणारी होती.. अनुभवाने प्रगल्भ होती... एकमेकांच्या अडी अडचणीला मदत करणारी होती...संसारवेल हळू हळू फुलत होती..  मनालीचे शिक्षण खुप झाले होते पण तिला नोकरी नव्हती..हे एकच शल्य तिला सतत त्रास देत असायचे.पण स्वानंदने तिला समजावले आपण नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनायचे.. आणि दोघांनी मिळून त्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केली...सोबतीस माझा सखा.. घेई कवेत आकाश..झुले उंच माझा झोका.. याप्रमाणे स्वानंद ने मनालीला मनापासून साथ दिली... सोपे नव्हतेच ते काम.. खुप अडचणी आल्या..यश अपयशाचे अनेक गड सर करावे लागले.पण सगळ्यांनी मिळून एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवले.संस्कृत बाल आणि प्रौढ शिक्षण देणारा एक तास त्यांनी सुरु केला... खूपच मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळत गेले.... अवघ्या 16 मुलांवर सुरु झालेला क्लास आज हजारो मुले संस्कृत प्रशिक्षण घेऊन संस्कृत प्रसार प्रचाराचे काम करत होते. ...संस्कृत घराघरात पोहोचण्यासाठी स्वानंद आणि मनाली ने आपले तन-मन -धन अर्पण केले होते.आणि आज त्याची स्वतःची संस्था दिमाखात उभी आहे...एखाद्या महाकाय वटवृक्षाप्रमाणे.... स्वतःची पर्वा न करता लोकांना मदत करण्यासाठी...


Rate this content
Log in

More marathi story from रामदासी सर

Similar marathi story from Action