kanchan chabukswar

Inspirational

4.0  

kanchan chabukswar

Inspirational

झाले मोकळे आकाश

झाले मोकळे आकाश

5 mins
403


रोहिणी श्रेया सिमरन विधि आणि मी [नीता] आमची घट्ट मैत्री. कॉलेज मग युनिव्हर्सिटी, सगळं बरोबर. जोडीदाराचा देखील तपशील एकमेकींना माहित. जरी आमच्या फॅकल्टी वेगळ्या असल्या तरीपण आमचं भेट- भेटणं होतच असे.

रोहिणी आर्किटेक्ट, श्रेया आणि सिमरन जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनी, विधी आणि मी इंग्लिश मधले ग्रॅज्युएट. काय कोणास ठाऊक, जशा त्या तिघीजणी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला अहमदाबादला गेल्या, आम्ही पण तिथल्या युनिव्हर्सिटी मध्ये एम बी ए साठी ऍडमिशन घेतली.


  आमच्या सगळ्यांचे जोडीदार आम्ही जमवलेले, कॉलेज पासून ची मैत्री आणि पुढे सहवासामुळे दृढ झालेली.


आमच्या सगळ्यातली सुंदर जोडी म्हणजे रोहिणी आणि रमेश, म्हणूनच त्यांच्यामधल्या बेबनावा मुळे आम्ही सगळेच खूप दुखी झालो.  झालं असं, म्हणजे जसं रोहिणी म्हणाली, की जेव्हा ती अचानक पणे रमेश च्या केबिन मध्ये शिरली होती तेव्हा रमेश आणि त्याची सेक्रेटरी तिला विचित्र अवस्थेत दिसले. रमेश च म्हणणे," त्याच्यात विचित्र काहीच नाही. एकत्र सोप्यावर बसून कॉफी प्यायल्याने काही कोणी एकमेकांच्या प्रेमात पडत नाही." रमेश म्हणणं धुडकावत रोहिणीने त्याचं घर सोडलं.


   आई-वडील दुबईला, भाऊ अमेरिकेत, म्हणून रोहिणीला जवळच्या म्हणून आम्ही सर्वजणी होतो. तडकाफडकी रमेश घर सोडल्यानंतर रोहिणी आपल्या आई-बाबांच्या चाळीमधली खोलीमध्ये आली. रोहिणीच्या बाबांनी चाळीतल्या जागेला तशीच ठेवली होती, परत भारतात आल्यावर राहायला ठिकाणं पाहिजे म्हणून.

तशी चाळीतली जागा पण तीन खोल्यांची आणि स्वतंत्र होती पण चांभार चौकशी आणि चोंबडेपणा करणारे चाळकरी मात्र आजूबाजूला होते.


  वहिनी ,गोखले काकू, मीराताई यांनी रोहिणीची मनस्थिती समजून घेऊन तिच्या भानगडीत न पडण्याचे ठरवले.

दर शनिवारी आमच्यापैकी एक मैत्रीण तिच्या सोबत राहिला किंवा गप्पा मारायला म्हणून जात होती, आम्हाला पण आमचे संसार होते ना. रविवारी मात्र रोहिणी कुठल्यातरी संस्थेमध्ये जायला लागली होती.


रमेश नि आम्हाला सगळी परिस्थिती समजावून सांगितले, तिला जे दिसलं तो एक गैरसमज आणि अक्सिडेंट होता पण रोहिणी कोणाचंच ऐकायला तयार नव्हती.  रोहिणीने पुण्याच्या आर्किटेक्चर कंपनी कडे नोकरीसाठी अर्ज केला आणि ती मुंबई सोडून सरळ पुण्याला निघून गेली, आता तिच्या आणि आमच्या भेटी कमी व्हायला लागल्या.


एक दिवस मी हट्टाने तिच्या पुण्याच्या घरी शनिवारी जाऊन थडकले. रोहिणी एकटीच होती, घरपण साधंच होतं, फर्निचर च्या नावाखाली एक खुर्ची आणि एक पलंग दिसत होता, बाकी सगळं सामान पेटी मध्येच होतं. घरावर एक उदास छाया पसरली होती. काय करावे म्हणजे रोहिणी माणसात येईल असा मी विचार करू लागले, शेवटी मी तिला घेऊन बाजारामध्ये गेले. इतर वेळी शॉपिंग म्हणजे रोहिणीचा अगदी वीक पॉइंट होता पण आज तिला कशातच रस नव्हता, या नाकारल्या गेलेल्या मुलीला जितकं दुःख होतं त्याच्यापेक्षा शतपटीने दुःख वेदना रोहिणीच्या चेहऱ्यावर तरळत होत्या. मी बळेबळेच तिला दोन ड्रेस घ्यायला लावले, ताबडतोब आम्ही टेलर कडे जाऊन ते शिवायला देखील टाकून दिले. रोहिणीला घरामध्ये कोणाची तरी कंपनी असणं अतिशय आवश्यक होतं. तिच्या आईचा कायम आम्हाला फोन असायचा की आम्ही रोहिणी ची काळजी घ्यावी.


  आर्किटेक्चर असल्यामुळे रोहिणी अतिशय कलासक्त होती, बाजारातून चालताना एका स्टेशनरीच्या दुकानातून मी तिच्यासाठी कॅनव्हास कलर ब्रशेस असं सामान घेतलं आणि तिच्या हातात बळेच ठेवलं." कोणासाठी करू ग?" रोहिणीच्या घशातुन हुंदका फुटला. " तुझ्यासाठी कर, माझ्यासाठी कर , मी माझ्या घरात लावीन हो तुझे पेंटिंग, तू पेंट कर स्वतःचं मन रमव."

एका महिन्यानंतर विधि जेव्हा रोहिणी कडे गेली होती तेव्हा पेंटिंग चे साहित्य तसेच कोपऱ्यात पडलेल्या तिला दिसल. याचा अर्थ रोहिणीला कशातच रस उरला नव्हता.

एवढी सुरेख रोहिणी एवढी हुशार कलासक्त हळव्या मनाची उच्चशिक्षित तिने आपल्या आयुष्याला असं नाकIराव का?


नंतरच्या महिन्यामध्ये सिमरन आणि श्रेया दोघीजणी रोहिणी कडे गेल्या, सहज म्हणून त्या तिला बागेत घेऊन गेल्या, बघितल्या नर्सरीमध्ये फिरत असताना सुरेख नाजूक फुलांची झाडं याच्याकडे रोहिणीचा जणू लक्षच नव्हतं. सगळीकडे उडणारी फुलपाखरे छोटी छोटी लांब चोचीची पाखरं कशाकशात देखील रोहिणी चे मन रमत नव्हतं. काही म्हटलं की ती सतत म्हणायची," माझ्याच वाट्याला अशी दुर्दशा का?" खरं म्हणजे तिचा झालेला गैरसमज आमच्या सगळ्यांच्या लक्षात आला होता पण कितीही समजून सांगितलं तरी रोहिणीचा हेका कायमच होता, ती तर आता रमेशला घटस्पोट देण्याबद्दल विचार करत होती.


  बागेतून फिरताना अचानक सिमरन चा पाय कोणीतरी फेकलेल्या गुलाबाच्या फांदीवर पडला, तोंडातून," सस" आवाज करत सिमरन खाली बसली, तिच्या पायातला काटा रोहिणीने अलगद काढला आणि ती गुलाबाची फांदी आपल्या हातात धरून ठेवली. जाड फांदी वरती एकही कळी दिसत नव्हती. कुठूनसा माळी बुवा तिथे प्रकट झाला," पायात घुसला काटा तुमच्या? गुलाबाला या फुलं येत नाहीत म्हणून उपसून टाकला होता. एक फूल नाही मात्र काटे बघा की एवढे मोठे मोठे!" माळी बुवा वैतागून सांगत होते. 


रोहिणीने न बोलता गुलाबाची फांदी आपल्या पिशवीत टाकली आणि आम्ही सगळे घरी आलो.


  नाहीतरी रोहिणी फोनवर जास्त बोलायच नाही म्हणून आम्ही तिच्याकडे ये-जा करत होतो.

मध्यंतरी माझ्या सासुबाईंचे तब्येत बिघडली म्हणून मधले दोन महिने मला काही तिच्याकडे चक्कर मारता आली नाही, मी ठरवलं या दिवाळीला तिला फराळ घेऊन जाऊ या. मागच्या वर्षीची दिवाळी आठवली, सर्व जणींचा धुमधडाक्यात दिवाळसण झाला होता केवढी आनंदात होतो आम्ही, आपल्याला मिळालेल्या गिफ्ट, दागिने हे दाखवताना प्रत्येकीचा चेहरा किती उजळून निघाला होता.

 गुरुवारीच सुट्टी घेऊन मी रोहिणीच्या घरी जाऊन धडकले.


रोहिणी हसून प्रसन्न चित्ताने माझं स्वागत केलं, तिच्यातला बदल नक्कीच स्वागतार्ह होता. तिने घराला रंग देखील दिला होता, फर्निचर काही वाढवले नव्हतं पण मी दिलेल्या कॅनवास वरचा पेंटिंग भिंतीवरती गेलं होतं. शोभेच्या फ्लावर पॉट मध्ये थोडीफार फुले ठेवली होती, आश्चर्याची गोष्ट म्हणजे खिडकी मधल्या गुलाबाच्या रोपट्याला 2,4 कळ्या आल्या होत्या.

  मी येणार म्हणून रोहिणीने मस्तपैकी इडली चा बेत केला होता, इडलीच्या बशा घेऊन आम्ही खिडकी मधे उभा राहिलो,

" तुला पण खायची का रे इडली"? रोहिणीने प्रेमाने गुलाबाच्या झाडाला विचारले. मला आश्चर्यच वाटले.

मी जरी घरामध्ये होते तरी बराच वेळ रोहिणी त्या झाडाशी बोलत होती. जणुकाही ते झाड म्हणजे तिची पाचवी मैत्रीण झालं होतं. बरोबरच होतं, झाडाकडून कुठले प्रश्न नाही, कुठले जाब जबाब नाही, कोणालाच अडचण नाही आणि काहीच नाही.


रोहिणीला कुठेतरी मन मोकळ करण्यासाठी एका मुक साथीदाराची गरज होती. मधली दोन महिने आमच्यापैकी कोणीही मैत्रीण तिच्याकडे न गेल्याचा तिला जणू काही फायदाच झाला होता. कधीकधी माणसाला एकटे राहायला का आवडतं हे मला त्या दिवशी समजले. एक तर एकटे राहिलं की माणूस स्वतःच्या मनामध्ये डोकावून बघतो, चूक,बरोबर ,खरं, खोटं, अपराध सगळे विषय चाचपून पाहिले जातात.

रोहिणी चा नवीन फर्म मधला प्रोजेक्ट देखील जोरदार चालू होता याच्या बातम्या आमच्या कानावर येतच होत्या.


मधले दोन महिन्यांमध्ये तिच्या डिझाइन्समध्ये नाविन्य आले होते, , कुठेतरी स्वतःच्या मनावर चढलेली मरगळ तिने फेकून दिली होती. असं काय झालं होतं बरं?


  संध्याकाळी कॉफी पीत असताना अचानक बेल वाजली, बघितले तर काय, समोर रमेश उभा होता.

नेहमीच्या सवयीने तो आत आला जसं काही आधी काही घडलेच नाही. माझ्या प्रश्नार्थक भुवया बघून रमेशने डोळ्यानेच मला सगळं काही आलबेल झाल्याचं सांगितलं. आणि एक लांब श्वास घेत त्याने सुस्कारा सोडला.

बोलताना त्यानी तो रोहिणी ला न्यायला आला आहे हे सांगितलं.

रोहिणीच्या प्रसन्नतेचे कारण मला कळलं.

एकटी असताना त्या वठलेल्या गुलाबाच्या फांदीने रोहिणीला मनोमन साथ दिली. फांदी पण वठली होती जसं रोहिणी च मन. दोघांनी पण एकमेकांना साथ दिली, रोहिणीचा बोलणं तिच्या मनातली अर्थ भावना गुलाबाला जणूकाही कळत होती, पण ज्या दिवशी रोहिणीच्या काळजीने गुलाबाने स्वतःवरती कळी फुलवली, त्यादिवशी रोहिणीच्या मनामध्ये जणू काही चमत्कारच घडला.


" गुलाबाची कळी आली ना तेव्हा माझ्या मनाने मला विचारले, की तू त्या गुलाबाला एवढा वेळ दिलास मग स्वतःच्या नवर्‍याला काही सांगण्यासाठी तू वेळ का नाही दिलास"? रोहिणी मला हसून म्हटले.

आम्ही तिघंही प्रसन्न हसलो, आमच्या सगळ्यांच्या मनावरचं मळभ जणू काही दूर झाले होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational