STORYMIRROR

Priyanka Bhasme

Abstract Others

2  

Priyanka Bhasme

Abstract Others

जेव्हा एकांत बोलतो..

जेव्हा एकांत बोलतो..

1 min
120

कधी कधी होते श्वासांची घुसमट आपल्याच माणसात राहून.. न व्यक्त होणार मन न 

...न समजून घेणारं कोणी..मग सारंच काही नकोस वाटतं.. यातून निष्पन्न झालेला एकांत हात धरून चालायला शिकवतो अाणि नेऊन सोडतो विचारांच्या गर्दीत..मग परत तीच भीती.. आता यातून बाहेर कसे पडायचे.. म्हणजे ज्या एकांतांने आपल्याला हात धरून इथंवर चालायला शिकावलं.. त्यानेही काही काळानंतर आपले रंग दाखविलेच की...पूर्वीसारखी माझी तीच धडपड..त्या विचारांच्या गर्दीतून बाहेर पडायची.. मग लगेच माझ्यातल्या "मी" चा आवाज येतो.. माझ्याशी बोलतो..बाहेरच्या पोकळ जगातले काही नमूने डोळ्यासमोर दाखवितो..मग मात्रं मला बाहेरच्या गर्दीपेक्षा या विचांराची गर्दीच जास्त जवळची वाटू लागते..कुठंवर माघारी जायचे ना.. म्हणून मी रमून जाते इथल्याच गर्दीत.... मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात मला कधीतरी का होईना...माझं अस्तित्व सापडेल... या आशेत.. 

अन् आजही ती धडपड सुरूच आहे...कदाचित सुरूच राहील निरंतर...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract