Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Sarita Sawant Bhosale

Tragedy Inspirational Others


3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy Inspirational Others


जाणीव आत्मतेजाची

जाणीव आत्मतेजाची

4 mins 788 4 mins 788

सौंदर्या नावाप्रमाणेच अगदी सुंदर, रेखीव,नितळ त्वचा गोरीपान, सुबक नाक, निळे बोलके डोळे,नाजूक गुलाबी ओठ, सडपातळ बांधा, उंचपुरी, लांबसडक काळेभोर केस... अगदी सिनेमा मध्ये हिरॉईन असतात तसच देखणं रूप सौंदर्याचं. सौंदर्य गर्वाला सोबतच घेऊन जन्माला येत म्हणतात ते हिच्या बाबतीत एकदम खर ठरलं. सौंदर्याला स्वतःच्या रूपाचा असा काही गर्व होता की स्वतःपुढे ती इतरांना तुच्छ लेखायची. कोणालाच किंमत द्यायची नाही. लहान मोठं कोणी असेना पण तिच्यासमोर सगळेच तिला कमी वाटायचे. ऐटीत चालणं, ऐटीत बोलणं, सगळ्यांचा तिटकारा करणं या वागण्याने तिचं जवळच अस मैत्रीण,मित्र कोणीच नव्हतं. पण या एकटेपणाला ती कधी कंटाळली नाही. ती, तिचा आरसा, मेकअप किट आणि सेल्फी साठी मोबाईल हे तिचे सोबतीदार.

यापलीकडे जग काय असत ते तिला क्वचितच माहीत असावं. कॉलेजमध्ये ब्युटी काँटेस्ट मध्ये तिच्यासारखी सुंदर मुलगी हरू शकते हे तिला सहन झालं नाही आणि त्याच रागाच्या भरात वेगाने गाडी चालवत असताना तिचा गाडीवरचा ताबा सुटतो...तिच्या रागाची भरपाई एका मोठ्या अपघातात होते...गाडीच्या समोरच्या काचा तिच्या चेहऱ्यामध्ये गेल्याने पूर्ण चेहरा छिन्न विच्छिन्न होतो. ज्या रूपावर तिला गर्व होता ते रूपच आता हरवलेलं. स्वतःसारखं कोणीच नाही अशी समजणारी ती आता स्वतःला आरश्यात बघायलाही घाबरत होती. सुंदरतेची जागा आता कुरुपतेने घेतलेली. सर्जरी करूनही चेहरा पूर्ववत झाला नाही..ती अजूनच डिप्रेशनमध्ये गेली. गर्वाच रूपांतर क्षणात चिडचिडीत झालं... समुपदेशन करूनही मी आता सुंदर नाही राहिले...मी संपले.. माझं भविष्य संपलं हा न्यूनगंड काही केल्या तिच्यातला गेला नाही.

एक दिवस तिच्या आईची मैत्रीण स्वतःची लेक मीरासोबत सौंदर्याला भेटायला आली. सौंदर्या कोणालाही अपघातानंतर भेटणं टाळत होती पण आईने खूप आग्रह केल्यामुळे ती दोघींना भेटली. ना हसणं ना बोलणं.. फक्त देहाने तिथे हजर होती. आईची मैत्रीण आणि तिची लेक मीरा गेल्यापासून सौंदर्याच्या डोक्यात मीराचेच विचार घोळत होते. मीरा तशी सावळी त्यात एका पायाने अधू म्हणजे डाव्या पायाने ती लंगडतच चालायची. लहानपणी आपण तिला तिच्या रंगावरून कधी कधी तर लंगडी म्हणूनही चिडवायचो. ती मात्र सगळ्यांच्या टीका हसण्यावर न्यायची. तीच मीरा जी आयुष्यात पुढे जाऊन एका कोपऱ्यात बसेल अस वाटलेलं तीच आज सरकारी अधिकारी झाली. ती मीरा आज समाजसेवा करून कितीतरी निराधारांचा आधार झाली. कितीतरी होतकरू मुलांची मुलींची आज ती आदर्श आहे. ती तर एका पायाने अधू असून जर इतकं आदर्श जगणं जगू शकते...प्रत्येक परिस्थितीत धीटपणे हसू शकते तर मी तर धडधाकट आहे...शारिरीक मानसिकरित्या उत्तम आहे मग फक्त चेहरा कुरूप झाला म्हणून स्वतःला निराशेच्या गर्तेत का अडकवून घेऊ?? चेहऱ्याच सौंदर्य माझ्या जगण्याची रूपरेषा नक्कीच ठरवू शकत नाही हे सौंदर्याला त्यादिवशी जाणवलं आणि अंतर्मनाला साद द्यायचं तिने ठरवलं. अपघातात स्वतःच रूप हरवलंय अस समजून खचलेल्या सौंदर्याने फॅशन डिझाइनिंगच कॉलेज अर्धवट सोडलेलं ते आधी पूर्ण केलं. कॉलेजमध्येही तिने फर्स्ट रँक पटकावला. ज्या सौंदर्याचा तिला नको तितका हेवा होता...ज्यामुळे आतापर्यंत तिने कोणाला आपलं मानलं नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने मनाचं सौंदर्य हे श्रेष्ठ असत हे आता तिला पटू लागलं होतं. तिच्या नम्र वागण्याने, प्रेमळ बोलण्याने,स्मित हास्याने कितीतरी जीवाला जीव देणारी माणसं तिने जोडली. चेहऱ्यावर खोटी स्तुती करणाऱ्यांपेक्षा ही मनाने जोडलेली नाती खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं बोलून योग्य दिशादर्शक बनतात हे तिला कळत होतं. आतापर्यंत काहीजण एकमेकांना न बघता किंवा एका नजरतेच प्रेमात कस पडू शकतात हा प्रश्न तिला पडायचा... पण ते बाह्यसौंदर्य न बघता आत्मिक सौंदर्य बघून प्रेमात पडतात आणि आयुष्यभराचे सोबती होतात हे तिला उमगलेलं. कॉलेज संपल्यावर तिने स्वतःच बुटीक चालू केलं सोबतच ज्यांना या क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती मुळे ते शक्य नाही अशांची स्वप्नं पूर्ण व्हावी यासाठी तिने क्लासेस चालू केले. तिच्या तल्लख बुद्धीने उगमास आलेल्या डिझाइन्सना मोठमोठया लोकांकडून मागणी असते. बऱ्याचश्या फॅशन शोज मध्ये ती हिरीरीने भाग घेते. स्वतःच सौंदर्य हरवलं आणि मी संपले अस म्हणणारी सौंदर्या आता शो टॉपर म्हणून देखील सहभागी होते. तिने तयार केलेल्या डिझाईन्स आणि ती स्वतः आज फॅशन आयकॉन म्हणून तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. अंतर्मनाचा ठाव तिला वेळीच लागल्यामुळे आज खरी सौंदर्या ती ठरली. चेहऱ्याच सौंदर्य हरवलं पण मनाचं तेज, आपल्या आतलं सौंदर्य चिरतरूण असत फक्त त्याला जिवंत ठेवणं आपल्या हातात असतं. स्वतःच्या मनाचं अस्तित्व न जपणाऱ्या सौंदर्याला एका अपघाताने अंतर्बाह्य बद्दलवलं.

प्रत्येकाकडे मनाचं तेज असत फक्त त्याची जाणीव स्वतःची स्वतःला झाली की त्या तेजाने चेहराही उजळतो आणि खर रूप निखरत. बाह्यसौंदर्य क्षणिक आहे याची प्रचिती येते. सरतेशेवटी या जगाला भुरळ पाडेल, या जगावर अधिराज्य करेल ते आपलं आत्मिक,मनाच सौंदर्यच....हे सौंदर्य ज्याला उमगलं तो खरा सौंदर्यवान. गुलाबाच्या झाडाला काटे जरी असले तरी मनमोहक,लोभस,अतिशय सुंदर अस प्रेमाचं प्रतीक मानलं जाणार गुलाबाचं फुल ते जन्माला घालते. निसर्गाकडे भरभरून आंतरिक सौंदर्य आहे.. निसर्गाला न्याहाळले तरी आपल आतलं तेज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडेही गुलाबाप्रमाणे झळकणारं आंतरिक तेज आहे...त्याचा साक्षात्कार होणं गरजेचं आहे. सौंदर्याने तर मनाच्या सौंदर्याची साथ देऊन आत्मिक तेज उजळवलं. तुम्हीही तुमचं तेज उजळवा मनाचं सौंदर्य अबाधित ठेवून...अंतर्मनाला साद देऊन...अंतर्मनाची साद ऐकून😊. सौंदर्यासारखे बरेच जण असतात जे अशा घटनांनी खचून जातात..ज्यांची स्वतःच्या मनाशीच ओळख नसते,आपल्याच तेजाशी त्यांची ओळख नसते त्यांना हा लेख मनाशी नात जोडायला नक्कीच मदत करेल😊. तुम्हीही झळकत राहा तुमच्या आत्मतेजासोबत😊🙏.


Rate this content
Log in

More marathi story from Sarita Sawant Bhosale

Similar marathi story from Tragedy