जाईल प्राण हा निघुन
जाईल प्राण हा निघुन
रवी - अग निर्मला अग ए ऐक ना ग
निर्मला - काय ऐकु बोल जेंव्हापासुन तुझ्या प्रेमात आहे तेंव्हापासून तुझेच तर ऐकत आले आहे .. पण आज माझ्या समोर जे काही वाढुन ठेवले आहे ते
..( हुंदके देत देत .. )
रवी - मी समजु शकतो ग ये जरा अशी जवळ बस बघु .. आपल काही लव्ह मॅरेज नाही .. घरातल्यांनी जमवून केलेले लग्न .. पण किती प्रेम करतो आपण एकमेकांवर .. हे अस प्रेम कधी मिळेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते ग
निर्मला - खरच लग्नाला २७ वर्ष झाली आणि दिवसेंदिवस ह्या प्रेमपाशात आपण कसे गुंतत गेलो आपले आपल्यालाच कळले नाही .. पण परमेश्वराने माझी अशी परिक्षा का घ्यावी हो
रवी - अग तु काहीही काळजी करु नकोस सगळ काही ठीक होईल तु माझ्यासमोर फक्त हसतमुख रहा बस तेवढच हव आहे मला .. आपल्याला छान दोन मुल आपल्या प्रेमाची प्रतिक आहेत की सोबत मी का इतकी हताश होते आहेस .. ये जवळ माझ्या मिठीत ये बघु .. आणि अश्रू थांबव आधी ते डोळ्यातले निर्मला - (डोळे पुसते ) हो तुम्ही पुर्ण बरे व्हावे म्हणून मी तुम्ही म्हणाल तशीच राहिन अगदी तुम्हाला हवी तशी .. ( आणि ती रवीला घट्ट मिठी मारते ) निर्मला - स्वताच्या मनातच पुटपुटते .. ( रवी अरे तुला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे रे ).. चल मी जेवायची तयारी घेते .. तुम्ही या फ्रेश होऊन ..
रवी - वा मस्त आता तु फक्त मला अस मस्त मस्त खाऊ घालायच आणि मी खायच .. उद्या पासून केमो सुरु होतील .. ६ महिन्यात मी मस्त होतो बघ पुन्हा ..
निर्मला - अगदी तसच होऊदे .. मी नाही एकही क्षण एकटी राहु शकत तुमच्याविना .. प्रत्येक क्षणाला तुम्ही सोबत आहात माझ्या ..
रवी - yesss निराश नको ना ग होऊस .. घे चल आज मी भरवतो तुला जेव बघु मस्त ..
निर्मला - मला सगळ सगळ आठवत आहे हो आपल लग्न ठरल झाल तेंव्हापासून आत्तापर्यंत .. कधीही एकट पडु दिल नाहीत मला .. घरातल्या प्रत्येक कामात मदत केलीत .. कधीही बाजारात एकटीला जाऊ दिल नाहीत ओझ उचलु दिल नाहीत .. आणि हे अस तुम्हालाच का व्हाव ..
रवी - ए वेडाबाई नको विचार करत बसुस सगळ रुटीन आहे तसच सुरु रहाणार आहे काहीही बदलणार नाहीये .. चल रात्र फार झाल्ये झोप शांत आता तु .. निर्मला - हं उद्या सकाळी लवकर उठायच आहे पहिला केमो आहे .. मनात खूप वादळ साठत आहे ..
रवी - मनात विचार करतो ( खर आहे तुझ्यासाठी मी उत्साह दाखवतो आहे .. गळुन तर मीही गेलो आहे .. फक्त तुझ्यामुळे मी ह्याचा सामना करु शकणार आहे .. तु हसतमुख रहा बस ) तिच्या केसात हात फिरवत विचार करत बसतो .. निर्मलाला मात्र झोप लागते.
निर्मला - रवी आज तुझा ९ वा केमो आणि ऑपरेशन होणार .. ( तुझ्याकडे पहावत नाहीये रे मला आता कस सांगु मी कशी तुझ्यासमोर तुझ्यासाठी आनंदाने वावरते आहे .. )
रवी - झाले चल केमो पुर्ण झाले आता ऑपरेशन की झाल ..
निर्मला - ( ह्यांना कुठे माहिती आहे की त्यानंतर रेडिएशंस पण आहेत ) आता तर जेवणही बंद झाल आहे तुमच .. मी तुमच्याविना खरच अपुर्ण आहे हो .. रवी खूप खंगला होता .. फक्त स्पर्शातुन प्रेम व्यक्त करु शकत होता .. आणि ती ते प्रेम जाणते हे त्याला समजत होते ..( न थकता ती माझ्यासाठी सतत धावपळ करते आहे .. आणि मी फक्त पहातो आहे ..
निर्मला - आज शेवटचे रेडिएशन .. मग पाहु पुढे डॉक्टर काय म्हणतात ते .. ( आज मात्र निर्मलाचा चेहरा उतरलेला होता मन थकलेल होत ) रवी - (निर्मलाच्या खांद्यावर डोके ठेवुन ) अगदी ओढ असलेल्या आवाजात .. तु खरच खूप सेवा केलीस माझी आपल प्रेम संपूर्ण पणाला लावलस .. आणि आणि .. निर्मला - रवी आहो रवी उठा ना उठा हो तुमच्यासाठी सुप घेऊन आले आहे .. निर्मलाने त्याच्या हातावर हात ठेवला फक्त आणि रवीने हात घट्ट बंद करुन घेतला आणि मान टाकली .. आणि निर्मलानेही त्याच्या छातीवर आपले डोके ठेवून अखेरचा श्वास घेतला ...
जाऊ नको तु सोडून जाईल प्राण हा निघून.... असे हे प्रेमी युगुल एकत्रितपणेच अंतीम प्रवासाला निघाले ..