Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Mohini Limaye

Others

1  

Mohini Limaye

Others

वृद्धाश्रम आनंदयात्रा

वृद्धाश्रम आनंदयात्रा

2 mins
442


वृद्धाश्रम म्हटले की अंगावर काटा उभा रहातो. ज्यावेळी आपण प्रथम एखाद्या वृद्धाश्रमाला भेट देतो. त्यावेळी बऱ्याच गोष्टींचा मनात घोळ होऊ लागतो. खरच गरज आहे का अशा वृद्धाश्रमांची? आत्ताच्या काळाची गरज म्हणून नक्कीच आहे पण आई वडील जड झाले म्हणून नाही.. पण सध्या आई वडीलांशी पटत नाही म्हणून वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे.. हे दुर्दैव.. का पटत नाही तेही बघायला हवं ना.. तुमच्या आई वडिलांनीही पुर्वीच्या वाईट परिस्थितीत ठेवलेलं का त्यांच्या आई वडीलांना वृद्धाश्रमात. तुम्ही लहान असताना केलेले त्यांचे कष्ट आठवत नाहीत का? त्यांनी त्यांची हौस मौज बाजुला ठेवुन घरातील अनेक अडचणींना तोंड देत तुम्हाला मोठे केले आहे शिक्षण दिले आहे वळण लावले आहे ते हे दिवस पहाण्यासाठी का? जनरेशन गॅपचे कारण दिले जाते ती तेव्हाही होती तशीच आत्ताही आहे फरक काय आहे.. त्यावेळी त्यांनी तुम्हाला समजुन घेतले होते मग आता तुम्ही त्यांना समजुन घेण्याची वेळ आहे. आणि अशाच वेळी तुम्ही त्यांना वृद्धाश्रम दाखवता आणि हे प्रमाण मुल असणाऱ्यांमध्ये जास्त आहे मुली असणाऱ्यांत नाही...


मुलींनीही समजुन घ्यायला हवं आहे की आपले आई वडील तसेच आपल्या नवऱ्याचेही.. वर मी म्हटलं तसं काळाची गरज तर आहेच पण ती कोणाला? ज्यांना अपत्य नाही किंवा मुलं परदेशात आहेत तिथे तब्येत, वयानुसार राहु शकत नाहीत अशांना.. आणि असेही आश्रम आहेत की.. की तुम्ही जर ४/८ दिवसासाठी कुठे बाहेर जात आहात तर एकटे सोडु नये म्हणून किंवा वयस्कर माणसांना घरात करमत नाही एक बदल म्हणून समवयस्क सोबत्यांसोबत ४/८ दिवस घालवावे म्हणून त्यांना तिकडे सोडावे.. पण ज्यांना मुलं आहेत अशांनी आपल्या माता-पित्यांना अशा आश्रमाची पायरी दाखवणे म्हणजे हातात बांगड्या भरुन पुरुषत्व नाकारल्यासारखेच आहे.. खरंच विचार करण्यासारखे आहे आज आपण करतोय तेच उद्या आपली मुलंही आपल्यासोबत करतील तेव्हा काय जनरेशन गॅप तेव्हाही असणारंच ना..


आजचे आईबाप लागले आहेत छपाईच्या मागे. मुले घरात एकटी पडतात त्यांना संस्कारांची गरज आहे.. दुधावरच्या सायीला जपणारे मायेची उब देणारे आजी आजोबा घरात असावेत ना.. तरच घराला घरपण राहिल घर परीपूर्ण होईल आणि आपल्या आयुष्याला, संसाराला पुर्णत्व येईल. आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर लेकरांची माया लागते तेव्हाच का रे मग आई वडिलांना वृद्धाश्रमात जावे लागते...


Rate this content
Log in