दोन तासाचे अनुभवलेले बालपण
दोन तासाचे अनुभवलेले बालपण


सहृद संस्था बदलापूर आयोजित भातुकली प्रदर्शन लहानमुलांसाठी क्ले पासून भातुकली बनवणे स्पर्धा आणि खेळण्यांची विक्री असा दोन दिवसाचा कार्यक्रम होता .. निरनिराळ्या ठीकाणी अशी भातुकलीची प्रदर्शने भरवणे हा ह्यांचा छंद आहे .. आणि ही भातुकली देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे .. माझ्या मैत्रीणीने मला सांगितले असल्यामुळे आज तरी जाऊयात असा विचार केला आणि साधारण ६ वाजता म्हणजे वेळ रात्री ८ पर्यंत होती .. संपता संपताच पोहोचले .. पण खरच पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले .. आता शिरताच भरपूर लहान मुले पालक ह्यांची धमाल सुरु होती .. मुलांना खेळण्यासाठीही खेळणी पोहे गुळ असा खाऊ देऊन मधे जागा देण्यात आली होती .. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भातुकलीचा खेळ मांडलेला होता .. ह्यात दगडी , लाकडी , मातीची , ताब्यांपितळ्याची अशी सर्व प्रकारातली विविध खेळणी मांडण्यात आली होती .. आणि विशेष म्हणजे सर्व खेळाचे प्रकारही ठेवण्यात आले होते जे शक्य होते ते विक्रीसाठीही ठेवले होते .. ह्यात बेचकी , सागरगोटे , बिट्ट्या , विटीदांडु , डबा ऐसपैस साठी डालडाचा डबा , सारीपाट , भोवरे , भिंगर्या , काडेपेटीची आगगाडी , रबरी रिंग , काचेतून चित्रे दिसायची ती जादु असे विविध प्रकार होते .. दोन तास कसे गेले समजले नाही संपूर्ण जग आणि वय विसरायला झाले .. आणि हो लाकडी बाहुलीही होती हातपाय न हलवणारी जिच्यासोबत आमचे बालपण गेले आहे .. हे सर्व खेळच नाही तर ह्यातील जवळजवळ सर्वच वस्तू आमच्या लहानपणी आमच्या घरात होत्या त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या .. मन आनंदीत झाले आणि भरुनही आले .. आणि हे खेळ जमा करुन प्रदर्शन भरवत असल्यामुळे श्री करंदीकर ह्यांना एका संस्थेकडुन चांदीची भातुकली बक्षीस म्हणून देण्यात आली आहे .. ती देखील येथे मांडण्यात आली होती .. खरच अशी प्रदर्शन होणे खूप आवश्यक आहे .. कारण पुढील पिढ्यांना भातुकली तर माहिती नसेलच पण पुर्वी वापरात असलेली भांडीही माहिती असणार नाहीत .. मी ह्यातील खेळण्यांचा संच आणि एक लाकडी बाहुली घेऊन आनंदाने घरी परतले.