Mohini Limaye

Others

1  

Mohini Limaye

Others

*मला भावलेले पुस्तक*

*मला भावलेले पुस्तक*

2 mins
3K


ललितलेख आत्तापर्यंत अनेक पुस्तके वाचनात आली .. काही आवडली काही मनात ठसली काही मनाला भावली .. त्यातील एक पुस्तक पुस्तक नसे नुसते .. भव्य इतिहास डोळ्यासमोर वसे .. थोर लेखक ते ना . सं इनामदार .. अनेक पुस्तके ह्यांची वाचाया मिळाली .. शिकस्त, झुंज, प्रतिघात, झेप ..अत्यंत गाजलेलेली कादंबरी *राऊ*.. मनाला भावली .. मनी ती कोरली .. वाचली असे ८ ते १० वेळा .. उलगडला इतिहास प्रत्येक वेळी निराळा .. वाचतो जणू कल्पीत नायक जीवनपट त्याचा असा होई भास .. पण .. नसे हे कल्पित एका इतिहास घडविणाऱ्याचे असे हे जीवन .. मुखपृष्ठही रेखीव .. श्रीराम जाधव यांचे .. तळपती तलवार .. त्यावर काळाला तडपायला लावणारी .. बाजीराव मुठ .. हातात अंगठी रत्नजडित .. कादंबरीचे मुख्य पात्रे थोरले बाजीराव पेशवे,भाऊ चिमाजी आप्पा,आई राधाबाई,पत्नी काशीबाई,मुलगा नानासाहेब, सुन गोपिकाबाई आणि मस्तानी .. ह्यांच्याच भोवती सारी कथा फिरे .. शनिवार वाडा वास्तुशांती उत्सवाने पुस्तकाची सुरुवात .. पेशवाईतीलल पेशवे .. नाहले श्रीमंतीने .. छत्रपती शाहु महाराजांना .. दिल्लीचा ही तख्त राखण्याची दिलेली शपथ . . रहात नसे ही फक्त प्रेमकथा बाजीराव जीवनी समर सळसळता .. पुस्तक जातसे पुढे मधेमधे ललितलेखन ही मिळे .. नातेसंबंधांने गोड सुरुवात .. काशीबाई थोर लाभलेली पत्नी .. घेई समजुनी आपल्या पतीला .. बाजीराव निडर असे तत्वनिष्ठ .. छत्रपतींना दिलेला शब्द जिद्दीने सांभाळीला .. बुंदेलखंडातील मस्तानी सौंदर्यवती .. प्रेम केले बेभाम बाजीरावाने तिच्यावरी .. पुढे समोर येते .. दिल्लीचे राजकारण . मस्तानी वरील प्रेम .. त्यासाठी वापरलेली अतिशय मनमोहन शब्दांची खाण .. ४८३ पानांचे अभ्यासपुर्ण पुस्तक .. नजर नाही हटत वाचतांना .. पुस्तकासाठी मदत केलेल्यांचे मानलेले ऋणनिर्देशांक खूप महत्वाचे .. बाजीरावाचा जीवनप्रवास , प्रेमपट , प्रेम कथा जाणून घेण्यासाठी प्रत्येकानेच वाचावे असे हे पुस्तक .. मस्तानीशी विवाह केला .. समशेर पुत्र झाला .. त्याचे मौंजीबंधन झाले .. ह्याचे सुंदर वर्णन .. अखेर बाजीरावाचा मृत्यू झाला .. *राऊ* मस्तानी पलीकडीलही बाजीराव होते .. अशी सुबुद्धी समाज मनास येवो .. हीच असे प्रार्थना .. गजानन चरणी .. असे हे माझ्या मनाला भावलेले पुस्तक ..


Rate this content
Log in